पोस्ट्स

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

शेतकरी नेत्यांशिवाय ऊस दर नियंत्रण समिती

इमेज
राज्य सरकारचा कारभार : राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रघुनाथ पाटलांना डच्चू! जनप्रवास   राज्यभरातील शेतकर्‍यांच्या ऊसाला भाव मिळावा, यासाठी झटणार्‍या शेतकरी नेत्यांनाच वगळून शिंदे - फडणवीस सरकारकडून ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी नेत्यांचं राज्य सरकारला वावडं आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार, शेतकर्‍यांचं सरकार असा डांगोरा पिटला जात असतानाच ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी लढा देत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत यांना बाजूला करण्यात आले आहे.  गेल्या वर्षभरापासून ऊस दर नियंत्रण समिती नसल्याने राजू शेट्टी यांनी सातत्याने इशारा, आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधले होते. दरम्यान, ऊस दर नियंत्रण समितीमध्ये सुहास पाटील, सचिनकुमार नलवडे, पृथ्वीराज जाचक, धनंजय भोसले, योगेश बर्डे यांचा समावेश   करण्यात आला आहे. साखर कारखान्यांचे प्रतिनिधी म्हणून कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांत परिचारक, पद्मश्री विठ्ठलराव विखे - पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक कैला

जिल्ह्यातील 86 ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित

इमेज
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील 86   ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक  जनप्रवास , आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप, नमुना ब सर्व ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय स्तरावर करण्यात आला. त्याच्यावर कोणतीही हरकत दाखल झालेली नसल्याने अंतिम आरक्षण निश्चित करण्यात आल्याचे महसूल उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे यांनी सांगितले.  जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणे निश्चित करण्यात आली आहेत. 27 जून 2023 ते दि. 3 जुलै 2023 या कालावधीमध्ये प्राप्त होणार्‍या हरकती उपविभागीय स्तरावर अभिप्राय घेऊन दिनांक 12 जुलै 2023 रोजी अंतिम करून परिशिष्ट 16 मधील अधिसूचना, नमुना - अ दिनांक 14 जुलै 2023 रोजी अंतिमरीत्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील मौजे घोरपडी व खानापूर तालुक्यातील मौजे भेंडवडे येथील प्रत्येकी एक हरकत प्राप्त झाली होती. त्यापैकी मौजे घोरपडी आणि भेंडवडे येथील हरकत अमान्य करण्यात आली आहे. उर्वरित 84 ग्रामपंचायतीमध्ये आरक्षणासंदर्भात

ड्रायपोर्ट करा नाहीतर लॉजिस्टीक पार्क, पण सांगलीला काहीतर द्या

इमेज
बेरोजगार तरूणांच्या हाताला काम: शेतीमालाला मिळेल बाजारपेठ जनप्रवास  सांगली जिल्ह्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट होणार, तीन हजार तरूणांच्या हाताला काम मिळणार, शेतीमाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणार, या आशेवर तरूण व शेतकरी बसले होते. मात्र जवाहरलाल नेहरू पोर्ट अ‍ॅथॉरिटीने ड्रायपोर्ट जिल्ह्यात नव्हे तर राज्यात होणार नसल्याचे स्वच्छ पत्र दिले. आता सलगरेमध्ये लॉजिस्टीक पार्क होण्याचे नवे स्वप्न सांगलीकरांना मिळाले आहे. त्यामुळे चार हजार तरूणांच्या हाताला काम मिळणार आहे. सध्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. जिल्ह्याचा विकास देखील मागे पडला आहे. त्यामुळे ड्रायपोर्ट असो किंवा लॉजिस्टीक पार्क काही तर सांगलीसाठी करा, अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे.  खासदार संजयकाका पाटील यांनी पाच वर्षांपासून रांजणी (ता.कवठेमहांकाळ) येथे ड्रायपोर्टचा प्रस्ताव मांडला होता. याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील ग्रीन सिग्नल दाखवला होता. त्यानुसार येथील 37 हेक्टर खासगी जमीन आणि 91 हेक्टर शासकीय जमिनीवर रांजणी ड्रायपोर्टचा प्रस्ताव होता. शेळी-मेंढी विकास महामंडळाच्या जागेवर औद्योगिक क्षेत्र विकसीत करण्याचा प्रस्

जिल्ह्यातील कारखानदारीत तिसरी पिढी कार्यरत

इमेज
दिनेशकुमार ऐतवडे, जनप्रवास कुंडलच्या जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी मंगळवारी शरद लाड यांची निवड झाली. जी. डी. लाड यांनी स्थापन केलेल्या या कारखान्यात सुरूवातीला जी. डी. लाड, त्यानंतर त्यांचे सुपूत्र आमदार अरूणअण्णा लाड आणि आत्ता अरूण आण्णांचे चिरंजिव शरद लाड यांची निवड झाली आहे. जिल्ह्याच्या सहकारी क्षेत्रात सांगली साखर कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील, राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे चेअरमन प्रतिक पाटील आणि आता शरद लाड यांच्या रूपाने तिसरी पिढी सहकार क्षेत्रात पदार्प ण केले आहे. तरूणांच्या हातात आता सहकार क्षेत्र येत आहे, याचेच हे द्योतक आहे. नगरच्या विठ्ठलराव विखे पाटील यांनी भारतार सर्वप्रथम सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी सभासदांकडून प्रत्येक पाच रूपयाचे शेअर्स घेतले होते. विठृठलराव विखे पाटील यांच्यानंतर सहकार क्षेत्र महाराष्ट्रभर पसरले. सांगलीतही स्व. वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, स्व. नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, संपतराव माने, दिनकरआबा पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी विखे पाटील यांच्या पाव

सदाशिवराव पाटील पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी डिजीटल बॅनरद्वारे व्यक्त केल्या भावना

इमेज
  "आता वेळ निर्णयाची"  भूमिकेकडे लागल्या नजरा प्रताप मेटकरी : जनप्रवास विटा         राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यामुळे राजकीयदृष्टया संवेदनशील असणाऱ्या खानापूर विधानसभा मतदारसंघात देखील राजकीय भूकंप घडण्याचे संकेत मिळत आहेत. माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांनी शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र कार्यकर्त्यांनी सत्तेत येण्यासाठी अजितदादा पवार यांची कास धरू, असा तगादा लावल्यामुळे भूमिका बदलण्यावरून उलट सुलट चर्चा सुरू असतानाच आता पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार, अजित पवार आणि ॲड. सदाशिवराव पाटील यांचे छायाचित्र असलेल्या डिजीटल बॅनरवर "आता वेळ निर्णयाची, जे संकटात आपल्यासोबत आपण जाऊ त्यांच्यासोबत" अशा शब्दांत भावना व्यक्त करत राजकीय खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे या लक्षवेधी बॅनरमुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे.        सध्या राज्याच्या राजकारणामध्ये  धक्कादायक घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी सरकारचा कार

जिल्ह्यात 600 सेवानिवृत्त गुरुजी सेवेत येणार

इमेज
945 शिक्षकांच्या रिक्त जागा, गरजेच्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती होणार  जनप्रवास । प्रतिनिधी  जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये रिक्त जागांचा प्रश्न कायम असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, या पार्श्वभूमीवर सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर तात्पुुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. जिल्ह्यात विषय शिक्षक आणि उपशिक्षकांच्या मिळून 945 जागा रिक्त आहेत. रिक्त जागांची गरज  असलेल्या 600 ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी गटविकास अधिकार्‍यांकडून माहिती मागविली आहे.  उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील सर्व शाळा 15 जूनपासून सुरु झाल्या आहेत. मात्र जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच नियोजित शिक्षक भरतीसंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे भरती प्रक्रियेस विलंब होत आहे. त्यामुळे पवित्र’ पोर्टलमार्फत नियमित शिक्षण संस्थांच्या अ

निवडणुकीच्या तोंडावर खासदारांकडून ड्रायपोर्टची बनवाबनवी

इमेज
जनप्रवास  प्रतिनिधी सांगली: जिल्ह्यात कधी रांजणी तर कधी सलगरे या ठिकाणी ड्रायपोर्ट करण्याचे आश्वासन निवडणुकीच्या तोंडावर खासदार संजयकाका पाटील यांनी दिले होते. मात्र जवाहर नेहरू पोर्ट अ‍ॅथॉरिटीने ड्रायपोर्ट होणार नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे खासदारांच्या अशा बनवाबनवीला जनता बळी पडणार नाही. येणार्‍या निवडणुकीत त्यांना उत्तर देईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी खासदारांना  ट्विटव्दारे  दिला. गेल्या पाच वर्षांपासून जिल्ह्यात ड्रायपोर्ट उभारणीचा गाजावाजा सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात रांजणी किंवा सलगरे येथे डायपोर्ट होणार? अशी आशा जिल्ह्याला होती. मात्र सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर यांनी दिलेल्या माहिती अधिकार कायद्यामुळे ड्रायपोर्टचा भूलभुलैय्या उजेडात आला आहे. जिल्ह्यात नव्हे तर राज्यातील ड्रायपोर्टला स्थगिती दिली असल्याचे पत्र जवाहर नेहरू पोर्ट ट्रस्टने साखळकर यांना दिले आहे. यामुळे काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी खासदार संजयकाकांवर ट्विटव्दारे निशाना साधला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून ज

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी