MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

जिल्ह्यात 600 सेवानिवृत्त गुरुजी सेवेत येणार



945 शिक्षकांच्या रिक्त जागा, गरजेच्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती होणार 


जनप्रवास । प्रतिनिधी

 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये रिक्त जागांचा प्रश्न कायम असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, या पार्श्वभूमीवर सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर तात्पुुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. जिल्ह्यात विषय शिक्षक आणि उपशिक्षकांच्या मिळून 945 जागा रिक्त आहेत. रिक्त जागांची गरज  असलेल्या 600 ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी गटविकास अधिकार्‍यांकडून माहिती मागविली आहे. 

उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील सर्व शाळा 15 जूनपासून सुरु झाल्या आहेत. मात्र जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच नियोजित शिक्षक भरतीसंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे भरती प्रक्रियेस विलंब होत आहे. त्यामुळे पवित्र’ पोर्टलमार्फत नियमित शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळातील रिक्त जागांवर शिक्षक भरण्याची सूचना शासनाने केली आहे. 

जिल्हा परिषदेकडील शिक्षकांच्या 945 जागा रिक्त आहेत. विषय शिक्षक 295 आणि 334 उपशिक्षकांच्या जागांचा समावेश आहे. उर्वरित जागा केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांच्या आहेत. या रिक्त शिक्षकांच्या जागा सेवानिवृत्त शिक्षकांमधून भरण्यात येणार आहेत. शिक्षण विभागाकडून रिक्त जागांचा तपशील, त्यासाठी अर्ज मागाविणे, त्यानंतर अटी व नियमांची पूर्तता करणार्‍या पात्र उमेदवारांपैकी नियुक्त्या देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. शासनाने दिलेल्या आदेशानुसार 20 जुलैपर्यंत सेवानिवृत्त शिक्षकांची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत, कंत्राटी शिक्षक नियुक्तीसाठी सेवानिवृत्त शिक्षकांचे वय कमाल वयोमर्यादा 70 वर्षे राहणार आहे. त्यांना मासिक मानधन 20 हजार रुपये दिले जाईल. शिक्षणाधिकार्‍यांशी करार झाल्यानंतर नियुक्त शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिका
री नियुक्ती आदेश देणार आहेत.  

या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकार्‍यांना तातडीने शिक्षकांची पदे भरावी लागतील, त्याबाबतची माहिती तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सेवानिवृत्त शिक्षकांना नेमणुका दिल्या जाणार आहेत. आता महिनाभरातच बहुतांशी शाळांत शिक्षक नियुक्त झालेले पाहायला मिळण्याच्या आशा आहेत.

गरज असलेल्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक - शिक्षणाधिकारी 

शासनाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त्या देण्याचा शासनाचा आदेश प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात आपल्या 945 जागा रिक्त आहेत. विषय आणि उपशिक्षकांची पदे भरली जातील. शासन आदेशानुसार गरज असलेल्या ठिकाणी नियुक्तीची प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली. 


टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी