MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

जिल्ह्यातील 86 ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित



राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील 86  
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक 

जनप्रवास , आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप, नमुना ब सर्व ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय स्तरावर करण्यात आला. त्याच्यावर कोणतीही हरकत दाखल झालेली नसल्याने अंतिम आरक्षण निश्चित करण्यात आल्याचे महसूल उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणे निश्चित करण्यात आली आहेत. 27 जून 2023 ते दि. 3 जुलै 2023 या कालावधीमध्ये प्राप्त होणार्‍या हरकती उपविभागीय स्तरावर अभिप्राय घेऊन दिनांक 12 जुलै 2023 रोजी अंतिम करून परिशिष्ट 16 मधील अधिसूचना, नमुना - अ दिनांक 14 जुलै 2023 रोजी अंतिमरीत्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील मौजे घोरपडी व खानापूर तालुक्यातील मौजे भेंडवडे येथील प्रत्येकी एक हरकत प्राप्त झाली होती. त्यापैकी मौजे घोरपडी आणि भेंडवडे येथील हरकत अमान्य करण्यात आली आहे. उर्वरित 84 ग्रामपंचायतीमध्ये आरक्षणासंदर्भात कोणत्याही हरकती हरकत

 कालावधीमध्ये प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे आयोगाने निश्चित करून दिलेल्या कार्यक्रमानुसार दिनांक 12 जुलै 2023 रोजी जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर मान्यता देऊन, त्यानुसार तालुकानिहाय एकूण 86 गावांचे अंतिम आरक्षण परिशिष्ट 16 नमुना अ दिनांक 14 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

अंतिम आरक्षण परिशिष्ट 16 नमुना अ प्रसिद्ध करण्यात येणारी तालुकानिहाय गावे पुढीलप्रमाणे : 

मिरज तालुका -  का. खोतवाडी, निलजी बामणी, वाजेगाव. तासगाव तालुका - चिखलगोठण, बिरणवाडी. जत तालुका - गुलगुंजनाळ, को. बोबलाद, कोणबर्गी, बिळूर, खिलारवाडी. कवठेमहांकाळ तालुका - बसाप्पाचीवाडी, दुधेभावी, गर्जेवाडी, करलहट्टी, पिंपळवाडी, रामपूरवाडी, देशिंग, धुळगाव, घोरपडी, करोली टी, कोकळे, शिंदेवाडी (जी), ढोलेवाडी, ढालगाव, कदमवाडी, कुंडलापूर, मोरगाव, जाधववाडी, झुरेवाडी. खानापूर विटा तालुका - देवनगर, भेंडवडे, साळशिंगे. आटपाडी तालुका - नेलकरंजी, वाक्षेवाडी, काळेवाडी, मानेवाडी, मासाळवाडी, मिटकी, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, बनपुरी, करगणी, मुढेवाडी, निंबवडे, पुजारवाडी आ, विभुतवाडी, औटेवाडी, कानकात्रेवाडी. पलूस तालुका - राडेवाडी, आमणापूर, विठ्ठलवाडी. वाळवा तालुका - तांबवे, शिरटे, साटपेवाडी, कारंदवाडी.  कडेगाव तालुका - वाजेगाव, चिंचणी वांगी. शिराळा तालुका - बांबवडे, वाकुर्डे बु., भाटशिरगाव, धसवाडी, करुगली, खुजगांव, मादळगाव, रांजणवाडी, रिळे, शिरशी, आंबेवाडी, बेलेवाडी, फकीरवाडी, खराळे, कुसाईवाडी, सावंतवाडी, शिरसटवाडी, चिखलवाडी, अस्वलेवाडी, चिंचेवाडी, इंगरूळ, कुसळेवाडी, मराठेवाडी, मेणी,
मोरेवाडी, पं. त. वारूण, पाचगणी, मानेवाडी, कदमवाडी.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी