MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

जिल्ह्यातील कारखानदारीत तिसरी पिढी कार्यरत



दिनेशकुमार ऐतवडे, जनप्रवास

कुंडलच्या जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी मंगळवारी शरद लाड यांची निवड झाली. जी. डी. लाड यांनी स्थापन केलेल्या या कारखान्यात सुरूवातीला जी. डी. लाड, त्यानंतर त्यांचे सुपूत्र आमदार अरूणअण्णा लाड आणि आत्ता अरूण आण्णांचे चिरंजिव शरद लाड यांची निवड झाली आहे. जिल्ह्याच्या सहकारी क्षेत्रात सांगली साखर कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील, राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे चेअरमन प्रतिक पाटील आणि आता शरद लाड यांच्या रूपाने तिसरी पिढी सहकार क्षेत्रात पदार्प
ण केले आहे. तरूणांच्या हातात आता सहकार क्षेत्र येत आहे, याचेच हे द्योतक आहे.

नगरच्या विठ्ठलराव विखे पाटील यांनी भारतार सर्वप्रथम सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी सभासदांकडून प्रत्येक पाच रूपयाचे शेअर्स घेतले होते. विठृठलराव विखे पाटील यांच्यानंतर सहकार क्षेत्र महाराष्ट्रभर पसरले. सांगलीतही स्व. वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, स्व. नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, संपतराव माने, दिनकरआबा पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी विखे पाटील यांच्या पावलावर पाउल ठेवून साखर कारखान्याची निर्मिती केली. त्यांच्या काळात कारखानेही जोमाने सुरू होते. कारखान्याच्या माध्यमातून शिक्षण संस्था, सहकारी संस्था, बँका, सूतगिरणी, पाणी व्यवस्थापन संस्था आदी संस्थांची स्थापना आपसूकच झाली. या माध्यमातून सर्वांचे राजकारणात चांगलेच बस्तान बसले. राजकारण आणि सहकारी संस्था या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या. सहकारी संस्थांना कार्यकर्त्यांना, नेत्यांना संधी द्यायचे आणि त्यांचा उपयोग राजकारणात करून घ्यायचे हे नित्यातेच झाले. 

कालांतराने सहकारी संस्थांना घरघर लागली, सहकारी संस्था लयास लागल्या, भ्रष्टाचाराने काही संस्था पोखरल्या गेल्या. परंतु त्यातही काही संस्था तग धरून राहिल्या. कुंडलचे जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखानाही ही त्यापैकीच एक. संपूर्ण आयुष्य समाजवादी म्हणून वावरलेल्या जी. डी. बापुंनी आयुष्याच्या उत्तरार्धात शरद पवारांना साथ दिली. सहकारी संस्थांशिवाय राजकारण करता येत नाही, हे त्यांना उशीरा कळाले. परंतु अरूणआण्णा लाड आणि शरद लाड यांना लवकर कळाले. लाड कुंटुबीयांनी साखर कारखाना तर चांगला चालविलाच पण त्याचबरोबर  इतर सहकारी संस्थांही सुस्थितीत ठेवल्या. 

शरर लाड यांच्या रूपाने तिसरी पिढी आता कारखान्याचे अध्यक्षपद भूषविणार आहे. या अगोरदर सांगलीत स्व. वसंतदादा यांनी स्थापन केलेल्या कारखान्यात वसंतदादांनंतर त्यांचे पूत्र स्व. प्रकाशबापू पाटील, त्यांच्या नंतर माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील आणि आता विशाल पाटील चेअरमन पदावर कार्यरत आहेत. वाळवा तालुक्यातही राजारामबापू पाटील यांनीही सहकारे चांगले जाळे विणले आहे. कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी बँक, सूतगिरणी, दूध डेअरी, शैक्षणिक संस्थांचा विस्तार केला. राजारामबापू यांच्यानंतर त्यांचे पूत्र आमदार जयंत पाटील यांनी त्यात भर घालून कारखान्याच्या चार शाखा केल्या. आज राजारामबापू प्रशासनाकडे साखराळे, वाटेगाव, कारंदवाडी, जत आदी कारखाने आहेत. सध्या या कारखान्याची जबाबदारी जयंत पाटील यांचे पूत्र प्रतिक पाटील यांच्याकडे आहे. राजारामबापू नंतर तिसरी पिढी सध्या कारखान्यात कार्यरत आहे.

सहकार क्षेत्राला आता शंभर वर्षे झाली आहेत. या शंभर वर्षात सहकार क्षेत्राते नेत्यांना बरेच काही शिकवले आहे. सहकारी संस्था जर चांगल्या टिकल्या तर राजकारण चांगले करता येते. नाहीतर जनता घरात बसवते, असे अनेक उदाहरणे जिल्ह्यात आहेत. काहींनी सहकारी संस्थांच्या जिवावर आयुष्यभर राजकारण केले. काहींना सहकारी संस्था टिकविता न  आल्याने घरात बसावे लागले आहे. 

प्रतीक पाटील आणि शरद लाड नव्या उमेदीचे नेते आहेत. नवीन काहीतरी करून दाखवायची जिद्द त्यांच्यात आहे. त्यामुळे येणार्‍या काळात प्रतिक पाटील आणि शरद लाड हे आपआपल्या कारखान्याला वेगळ्या उंचीवर
नेउन ठेवतील यात काही शंका नाही.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी