MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

सदाशिवराव पाटील पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी डिजीटल बॅनरद्वारे व्यक्त केल्या भावना





 "आता वेळ निर्णयाची"  भूमिकेकडे लागल्या नजरा


प्रताप मेटकरी : जनप्रवास विटा
 

      राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यामुळे राजकीयदृष्टया संवेदनशील असणाऱ्या खानापूर विधानसभा मतदारसंघात देखील राजकीय भूकंप घडण्याचे संकेत मिळत आहेत. माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांनी शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र कार्यकर्त्यांनी सत्तेत येण्यासाठी अजितदादा पवार यांची कास धरू, असा तगादा लावल्यामुळे भूमिका बदलण्यावरून उलट सुलट चर्चा सुरू असतानाच आता पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार, अजित पवार आणि ॲड. सदाशिवराव पाटील यांचे छायाचित्र असलेल्या डिजीटल बॅनरवर
"आता वेळ निर्णयाची, जे संकटात आपल्यासोबत आपण जाऊ त्यांच्यासोबत" अशा शब्दांत भावना व्यक्त करत राजकीय खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे या लक्षवेधी बॅनरमुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे. 
      सध्या राज्याच्या राजकारणामध्ये  धक्कादायक घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी सरकारचा कारभार सुरळीत सुरू असताना एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे भाजप सरकार स्थापन झाले. यामुळे राष्ट्रवादीची कोंडी होत होती. अशातच अजित पवार राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ होते. अजित पवार हे विरोधी पक्ष नेते असून सुद्धा त्यांनी अचानक शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळे आता गावोगावी अजित पवार गटामध्ये कोण ? व शरद पवार गटांमध्ये कोण ? याची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीमध्ये असणारे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या भूमिकेकडे मतदारसंघाचे लक्ष लागले असताना, आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर झळकू लागले आहेत. त्यावर "आता वेळ निर्णयाची, जे संकटात आपल्यासोबत आपण जाऊ त्यांच्यासोबत" अशा भावना बॅनरद्वारे कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे माजी आमदार अँड. सदाशिवराव पाटील वाढदिवसा दिवशी मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये सरकारमध्ये सामील होऊन अजित पवारांना पाठिंबा द्यायचा असा निर्णय होऊ शकतो, अशी शक्यता पाटील गटाच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
     ॲड. सदाशिवराव पाटील यांनी सन 2020 मध्ये काँग्रेसला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ताकद देण्याऐवजी पाटील गटाकडे डोळेझाक केली आहे. मागच्या चार वर्षांत राष्ट्रवादीत असून देखील अजितदादा पवार यांचा अपवाद वगळता विकासकामांसाठी कोणाकडूनही अपेक्षित मदत झालेली नाही. तर दुसरीकडे माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांनी अनेकवेळा नेत्यांसमोर जाहीररीत्या परखड आणि सडेतोड भूमिका मांडत राष्ट्रवादीचा आमदार करण्यासाठी आटपाडी आणि विसापूर सर्कलमध्ये पक्ष बळकट करून समन्वय साधण्याची वारंवार मागणी केली होती. मात्र तरीही राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेतेमंडळी आणि जिल्हा नेतृत्वाकडून डोळेझाक होत असल्याने पाटील गटाची राजकीय कोंडी होत आहे. विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी पक्षाअंतर्गत गटबाजीची व्यथा मांडूनही वरिष्ठ नेतेमंडळीकडून होत असलेली डोळेझाक आणि जिल्हा नेतृत्वाकडून न मिळणारे राजकीय पाठबळ हा कळीचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. अशा राजकारणातील बिकट परिस्थितीत राजकीय स्थैर्य टिकून रहावे आणि विटा शहरातील विकासकामांसाठी भरीव निधी मिळावा, यासाठी आणि आगामी राजकीय मोर्चेबांधणीच्या दृष्टीने बदलत्या राजकीय वाऱ्याचा अंदाज घेत पाटील गटाचे कार्यकर्ते सत्तेत येण्यासाठी अजितदादा पवार यांची कास धरू, असा तगादा लावत आहेत. त्यामुळे भूमिका बदलण्यावरून
खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या असतानाच माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांच्या 15 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित शुभेच्छा देणारा आणि "आता वेळ निर्णयाची, जे संकटात आपल्यासोबत आपण जाऊ त्यांच्यासोबत" अशी टॅगलाईन असलेला डिजीटल बॅनर लावून राजकीय पटलावर खळबळ उडवून दिली आहे. या लक्षवेधी बॅनरमुळे पाटील गटाच्या आगामी भूमिकेबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी