MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

ड्रायपोर्ट करा नाहीतर लॉजिस्टीक पार्क, पण सांगलीला काहीतर द्या




बेरोजगार तरूणांच्या हाताला काम: शेतीमालाला मिळेल बाजारपेठ

जनप्रवास 

सांगली जिल्ह्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट होणार, तीन हजार तरूणांच्या हाताला काम मिळणार, शेतीमाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणार, या आशेवर तरूण व शेतकरी बसले होते. मात्र जवाहरलाल नेहरू पोर्ट अ‍ॅथॉरिटीने ड्रायपोर्ट जिल्ह्यात नव्हे तर राज्यात होणार नसल्याचे स्वच्छ पत्र दिले. आता सलगरेमध्ये लॉजिस्टीक पार्क होण्याचे नवे स्वप्न सांगलीकरांना मिळाले आहे. त्यामुळे चार हजार तरूणांच्या हाताला काम मिळणार आहे. सध्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. जिल्ह्याचा विकास देखील मागे पडला आहे. त्यामुळे ड्रायपोर्ट असो किंवा लॉजिस्टीक पार्क काही तर सांगलीसाठी करा, अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे. 

खासदार संजयकाका पाटील यांनी पाच वर्षांपासून रांजणी (ता.कवठेमहांकाळ) येथे ड्रायपोर्टचा प्रस्ताव मांडला होता. याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील ग्रीन सिग्नल दाखवला होता. त्यानुसार येथील 37 हेक्टर खासगी जमीन आणि 91 हेक्टर शासकीय जमिनीवर रांजणी ड्रायपोर्टचा प्रस्ताव होता. शेळी-मेंढी विकास महामंडळाच्या जागेवर औद्योगिक क्षेत्र विकसीत करण्याचा प्रस्ताव होता. जवाहर नेहरू पोर्ट ट्रस्ट व महाराष्ट्र सरकार यांच्यात एप्रिल 2018 मध्ये सामंजस्य करार झाला होता. यासाठी राज्य औद्यागिक विकास महामंडळाच्या भूनिवड समितीने 14 ऑगस्ट 2018 रोजी रांजणी येथे भेट देऊन स्थळपाहणी केली होती. 

मात्र रांजणी येथील डायपोटसाठी गेल्या अडीच वर्षात उद्योग विभागाने अतिरिक्त जमीन दिली नाही. त्यामुळे डायपोर्टचा विषय रेंगाळला होता. तर सीमा शुल्क विभागाने औद्यागिक वसाहतीची विद्यमान संख्या आणि भविष्यातील आवश्यकतेच्या आधारावर राज्यांचे झोनमध्ये वर्गीकरण केले. त्यानुसार महाराष्ट्राचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला. मोठ्या संख्येने वसाहती अस्तित्वात असल्याने कोणत्याही नवीन वसाहती किंवा ड्रायपोर्टला परवानी दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जवाहर नेहरू पोर्ट ट्रस्टने राज्यात ड्रायपोर्ट होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे रांजणी ड्रायपोर्टचा विषय बारगळला होता. 

त्यानंतर खासदार संजयकाका पाटील यांनी सलगरेमध्ये ड्रायपोर्ट नव्हे तर लॉजिस्टीक पार्क होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सांगलीकरांच्या अशा पुन्हा उंचावल्या आहेत. चेन्नई, इंदौर, नागपूर जालनानंतर सांगलीत हा पार्क होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात चार हजार तरूणांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. शिवाय शेतीमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठे मिळणार आहे. नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेडने सलगरे येथे पुणे बेंगलोर ग्रीन कॉरिडॉर लगत मल्टीमॉडेल लॉस्टिस्टीक पार्क उभारण्याचा निर्णय घेतला. शेती आणि औद्योगिक माल बंदरापर्यंत जलद गतीने पोहचविण्यासाठी देशभरातून आयात होणार आहे. यासाठी सलगरे येथील 215 हेक्टर गायरान केंद्र सरकारकडे हस्तांतर करण्यात येणार आहे. राज्य सरकार सकारात्मक असून वरिष्ठ पातळीवर पाच ते सहा बैठका झाल्या असल्याचे बोलले जात आहे. 

त्यामुळे सांगलीकरांना आता ड्रायपोर्ट ऐवजी लॉजिस्टीक पार्कची आशा वाढली आहे. जिल्ह्यात बेरोजगार तरूणांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सांगलीमध्ये एक नवीन व्यवसाय आला तर हजारो तरूणांच्या हाताला काम मिळणार आहे. लॉजिस्टीक पार्कची उभारणी झाल्यास तीन हजार तरूणांच्या हाताला काम मिळणार आहे. शिवाय जिल्ह्यातील वर्षाला 762 मेट्रिक टन केळी, 14 मेट्रिक टन नारळ, 12 हजार 396  मेट्रिक टन द्राक्षे, 29 हजार 924  मेट्रिक टन मका, 180  मेट्रिक टन आंबा, 68  मेट्रिक टन टोमॅटो, 241  मेट्रिक टन हळद याच्यासह भाज्या-फळभाज्या, कलिंगडबरोबर शेतीमालाची निर्यात होईल. या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठे मिळेल. 

तसेच जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांची सुमारे दहा लाख क्विंटल साखर बाहेर जातेे. त्यामुळे जिल्ह्याला सध्या लॉजिस्टीक पार्कची गरज आहे. सध्या ड्रायपोर्ट होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे किमान लॉजिस्टिक पार्क तरी व्हावा आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळावी, ही अपेक्षा सांगली जिल्ह्यातील जनतेची आहे. 

ड्रायपोर्ट म्हणजे काय? 

ड्रायपोर्ट हे कृषी मालाच्या निर्यातीसाठी उपयुक्त ठरू शकते. यामुळे रेल्वे, रस्ते व सागरी मार्ग जोडण्याचे काम करते. परदेशांतून सागरी मार्गाने येणारा बंदरावर उतरवले जातात. तेथून रेल्वे मार्गाने ज्या शहरात माल पोहोचवायचा आहे तेथे नेला जातो. या पोर्टमध्ये कंटेनररची दुरुस्ती, मालाचा साठा करण्याची सुविधा उपलब्ध असते. जिल्ह्यात कांदा, निर्यातक्षम द्राक्ष आणि डाळिंब उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे भविष्यात त्याचा फायदा होणार होता. या ड्रायपोर्टमुळे उद्योगांना कमी वेळेत कच्चा माल उपलब्ध करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे वाहतूक खर्च आणि श्रम कमी होवून रोजगार निर्मिती होवू शकते. मुंबई येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचा विस्तारीत भाग म्हणून हा ड्रायपोर्ट असतो.

लॉजिस्टीक पार्क म्हणजे काय?

लॉजिस्टिक पार्कची प्रामुख्याने औद्योगिक वसाहतीमध्ये गरज असते. पार्कमध्ये फ्रेट स्टेशन, साठवणूक, वितरण, उत्पादनांचे ग्रेडिंग, कार्गो अशा सुविधा मिळतात.  कंपन्यांची उत्पादने ठेवण्यासाठी या पार्कचा उपयोग होतो.  लॉजिस्टिक हबमध्ये ट्रक टर्मिनल्स, कूलिंग, प्लॅन्ट, वर्कशॉप, होलसेल मॉल चेन तयार केली जाईल. त्यामुळे शहरात होणारी वाहतूक आपसूक कमी होईल. यामुळे शहरातील वाहतूक आणि शहराचं प्रदूषणही कमी होण्यास मदत होते. औद्योगिक वसाहती असतात, त्याठिकाणी लॉजिस्टिक पार्कची आवश्यकता असते. कारखान्यामध्ये तयार होणारे उत्पादन लॉजिस्टिक पार्कमधील गोदामामध्ये ठेवण्यात येते. तेथून ते परदेशात जाते. 


टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी