पोस्ट्स

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

कुख्यात गुंड सच्या टारझनचा निर्घृण खून

इमेज
अनैतिक संबंधातून संपवले : कोयत्याने डोक्यात तब्बल २४ वार ; संशयित स्वतः पोलिसांत हजर.    सांगली जनप्रवास : खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी यांसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला, मोकातील आरोपी कुख्यात गुंड सचिन उर्फ कमलाकर पांडुरंग जाधव उर्फ सच्या टारझन (वय ४५, मूळ नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा) याचा आज पहाटे कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. नात्यातील महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून गणेश विनोद मोरे (वय १९, रा. अहिल्यानगर, कुपवाड) याने आपल्याच घरात सच्या टारझनवर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या सच्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरु असतानाच सकाळी दहा वाजता त्याचा मृत्यू झाला. खून करणारा संशयित गणेश मोरे हा रक्ताने माखलेला कोयता घेवून स्वतः कुपवाड पोलिस ठाण्यात हजर झाला. दरम्यान, गुंडाच्या खुनामुळे गुन्हेगारी वर्तुळात एकच खळबळ उडाली. येथील शासकीय रुग्णालयात नातेवाईकांसह मित्रांची मोठी गर्दी होती. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला.   याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सच्या टारझन पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. एका ख

बावनकुळे यांचा माजी आ.जगताप यांना तब्बल 10 वेळा फोन

इमेज
बावनकुळे यांचा माजी आ.जगताप यांना तब्बल 10 वेळा फोन मात्र रिस्पॉन्स नाही, टेक्स मेसेज वर पण दिले नाही उत्तर, नाराज असल्याची चर्चा. अमोल कुलकर्णी  गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार विलासराव जगताप  यांना भाजपकडून सातत्याने डावले जात असून, त्यातच उमदी येथील कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या समोर आमदार गोपिचंद पडळकर यांनी कार्यक्रम हायजॅककेला असल्याची चर्चा असताना. त्यावरुन माजी आमदार विलासराव जगताप व आमदार गोपिचंद पडळकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली असल्याची चर्चा होती. विधानसभेचे प्रचार प्रमुख तमणगौडा रवी पाटील यांनी  मोदी नाईन हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली असून, एकूण 65 गावात आतापर्यंत त्यांनी नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले कार्य पोहोचण्यास सुरुवात केली आहे. सांगली जिल्ह्यातून जत तालुका हा मोदी नाईन कार्यक्रमात आघाडीवर आहे . मोदी नाईन या कार्यक्रमास विलासराव जगताप यांनी मात्र पाठ फिरवली असून, शासनाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. जत तालुका दुष्काळ जाहीर करावा त्यासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली सर्

बेडग सरपंच उमेश पाटील व उपसरपंच मल्हारी नागरगोजे यांच्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल

जनप्रवास प्रतिनिधी मिरज मिरज तालुक्यातील बेडग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची  स्वागत कमान पाडल्याच्या आरोपाखाली बेडग गावचे लोकनियुक्त सरपंच उमेश शंकर पाटील आणि उपसरपंच संभाजी उर्फ मल्हारी नागरगोजे व एक अनोळखी अशा तिघांविरुध्द अखेर मिरज ग्रामीण पोलिसात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार महादेव कांबळे (वय 43) यांनी फिर्याद दिली आहे.   सरपंच, उपसरपंचावरील या कारवाईनंतर बेडग गांव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. तर स्वागत कमान पाडापाडी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करीत दलित समाजाने बेडग गाव सोडल्याच्या घटनेची राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने शनिवारी सकाळी बेडग गावाला भेट दिली. स्वागत कमान पाडलेल्या ठिकाणाची पाहणी केली. कमान अनधिकृत ठरविण्याची कारणे, पाडकाम करण्यामागचा हेतू आणि दलित समाजाला गाव सोडावे लागणे याबाबतचा संपूर्ण अहवाल सात दिवसात सादर करण्याचे निर्देश अनुसुचित जाती आयोगाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिले आहेत. तालुक्यातील बेडग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

गाडीच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या दोघांना केली अटक

 २० हजारांचा मुद्देमाल केला जप्त.  जनप्रवास । प्रतिनिधी सांगली : शहरात गाडीच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या शिराळा तालुक्यातील दोघांना शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. सादर लक्ष्मण जावळे (वय २५) आणि अमन महम्मद शेख (वय २३ दोघे रा. मांगले) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांकडून चोरीची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.  सांगली शहरातील आझाद चौक येथे काही दिवसांपूर्वी एका गाडीची काच फोडून त्यातील रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी संतोष गळवे आणि गौतम कांबळे यांना माहिती मिळाली कि, दोन संशयित व्यक्ती या ट्रक अड्डा येथे फिरत आहेत. मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावून दोघांना जेरबंद केले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता दोघांनी आझाद चौक येथील एका कारची काच फोडून त्यातील रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली. यावेळी दोघांकडून चोरीतील रोख रक्कम आणि मोटारसायकल असा एकूण २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमा

माजी सहायक आयुक्तांच्या मुलासह दोघांना अटक :

 बोगस बांधकाम परवाना प्रकरण ; पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्याचाही समावेश. जनप्रवास । प्रतिनिधी महापालिकेचा बोगस बांधकाम परवाना दिल्याप्रकरणी माजी सहायक आयुक्त रमेश वाघमारे यांचा मुलगा राहूल उर्फ सोमनाथ रमेश वाघमारे (वय ३०, रा. नेमिनाथनगर, विश्रामबाग) आणि  नगररचना विभागातील कंत्राटी कर्मचारी महादेव नारायण पाटील (वय ३५ रा. कापूसखेड, ता. वाळवा) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, सांगलीतील पवनकुमार बापू झेंडे आणि संतोष संजय झेंडे या दोघांचा मोकळा प्लॉट आहे. या प्लॉटवर बांधकाम करण्यासाठी त्यांनी बांधकाम परवाना घेण्यासाठी एजंट राहूल वाघमारे यांच्याकडे कागदपत्रे दिली होती. त्यानंतर त्यांना काही दिवसात महापालिकेचा बांधकाम परवाना देण्यात आला. या परवान्याबाबतची माहिती झेंडे यांच्या शेजाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी झेंडे यांना बांधकाम परवाना कसा मिळाला याची माहिती घेण्यात आली. त्यावेळी हा परवाना बोगस असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी महापालिकेकडे रितसर तक्रार करण्यात आली. त्यावेळी महापालिकेच्या पथकाने त्याठिकाणी जावू

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी

इमेज
दिनेशकुमार ऐतवडे 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वचजण तयारीला लागले आहेत. विरोधी पक्षांनी मोठ बांधण्यास सुरूवात केली आहे. भाजपने अनेक लोकसभा मतदार संघावर आत्तापासूनच लक्ष केंद्रीत केले आहे. पण खरी अडचण ठरणार आहे ती उमेदवारी निवडण्याची.  हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशिल माने हे शिंदे गटात दाखल झाल्याने त्यांनी या मतदार संघावर दावा सांगितला आहे. सध्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र असल्यामुळे येथे उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. माजी आमदार हाळवणकर आणि राहूल आवाडे हेही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राजवर्धन निंबाळकर यांची निवड लोकसभा मतदार संघावर जिल्हाध्यक्ष म्हणून झाली आहे. त्यामुळे हा मतदार संघ भाजप काढून घेणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर आणि हातकणंगले हे दोन लोकसभा मतदार संघ येतात. ही दोन्ही लोकसभा मतदार संघ सध्या शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहेत. आता येथे भाजपने दावा सांगितला आहे. त्यामुळे उमेदवार निवडीवरून भाजपची बरीच दमछाक होणार हे नक्की हातकणंगले लोकसभा मतदार संघ कोल्हापूर आणि सांगली य

सांगलीत भाजप सुसाट, काँग्रेसमध्ये मतभिन्नता

इमेज
आ. सुधीर गाडगीळ यांची विकास कामांच्या जोरावर हॅटट्रिककडे वाटचाल  अनिल कदम जनप्रवास  लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना जिल्ह्यात विधानसभेची तयारी सुरु झाली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात भाजप सुसाट असून आमदार सुधीर गाडगीळ यांनी विकासकामांच्या जोरावर हॅटट्रिककडे वाटचाल सुरु केली आहे, दुसरीकडे काँग्रेसमध्ये उमेदवारीवरुन मतभिन्नता असल्याचे दिसून येते. त्यामुळे आ. गाडगीळ यांनी सांगली शहरासह ग्रामीण भागात कामांचा सपाटा लावला आहे. रस्ते, नदीवरील पूल, रेल्वे ट्रॅकवरील पुलांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला सांगली-पेठ रस्ता, कवलापूर विमानतळाच्या मंजुरीसाठी त्यांनी प्रयत्न केले. जनसंपर्काच्या माध्यमातून जोरदार तयारी करीत आहेत. त्यामुळे गाडगीळ विधानसभेतील मार्ग सुकर असल्याचे चित्र दिसून येते. भाजपचे सांगली मतदारसंघातील आमदार गाडगीळ हे खरे तर अराजकीय व्यक्तीमत्व आहे. पावणे दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या पीएनजी या सराफ पेढीचे संचालक असलेले गाडगीळ हे सांगलीचे आमदार होतील असे आठ वर्षापुर्वी कुणालाही वाटले नव्हते. मात्र सुधीरदादा 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी