MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

गाडीच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या दोघांना केली अटक

 २० हजारांचा मुद्देमाल केला जप्त. 


जनप्रवास । प्रतिनिधी
सांगली : शहरात गाडीच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या शिराळा तालुक्यातील दोघांना शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. सादर लक्ष्मण जावळे (वय २५) आणि अमन महम्मद शेख (वय २३ दोघे रा. मांगले) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांकडून चोरीची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 

सांगली शहरातील आझाद चौक येथे काही दिवसांपूर्वी एका गाडीची काच फोडून त्यातील रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी संतोष गळवे आणि गौतम कांबळे यांना माहिती मिळाली कि, दोन संशयित व्यक्ती या ट्रक अड्डा येथे फिरत आहेत. मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावून दोघांना जेरबंद केले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता दोघांनी आझाद चौक येथील एका कारची काच फोडून त्यातील रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली. यावेळी दोघांकडून चोरीतील रोख रक्कम आणि मोटारसायकल असा एकूण २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत त्यांना अटक केली. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख, उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, संतोष गळवे, गौतम कांबळे, गुंडोपंत दोरकर, गणेश कांबळे, योगेश सटाले यांच्या पथकाने केली. दरम्यान, दोघांना न्यायालयापुढे उभे केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोघांकडून आणखीन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी व्यक्त केली.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी