MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

माजी सहायक आयुक्तांच्या मुलासह दोघांना अटक :


 बोगस बांधकाम परवाना प्रकरण ; पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्याचाही समावेश.


जनप्रवास । प्रतिनिधी
महापालिकेचा बोगस बांधकाम परवाना दिल्याप्रकरणी माजी सहायक आयुक्त रमेश वाघमारे यांचा मुलगा राहूल उर्फ सोमनाथ रमेश वाघमारे (वय ३०, रा. नेमिनाथनगर, विश्रामबाग) आणि  नगररचना विभागातील कंत्राटी कर्मचारी महादेव नारायण पाटील (वय ३५ रा. कापूसखेड, ता. वाळवा) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, सांगलीतील पवनकुमार बापू झेंडे आणि संतोष संजय झेंडे या दोघांचा मोकळा प्लॉट आहे. या प्लॉटवर बांधकाम करण्यासाठी त्यांनी बांधकाम परवाना घेण्यासाठी एजंट राहूल वाघमारे यांच्याकडे कागदपत्रे दिली होती. त्यानंतर त्यांना काही दिवसात महापालिकेचा बांधकाम परवाना देण्यात आला. या परवान्याबाबतची माहिती झेंडे यांच्या शेजाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी झेंडे यांना बांधकाम परवाना कसा मिळाला याची माहिती घेण्यात आली. त्यावेळी हा परवाना बोगस असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी महापालिकेकडे रितसर तक्रार करण्यात आली. त्यावेळी महापालिकेच्या पथकाने त्याठिकाणी जावून पाहणी केली असता बनावट शिक्का व स्वाक्षरी असल्याचे समोर आले. तसेच हा बांधकाम परवाना काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्तावच अथवा शुल्कही भरण्यात आले नसल्याचे समोर आले. त्यानंतर याबाबत महापालिकेचे कनिष्ठ अभियंता शाहबाज रहिम शेख यांनी १६ जून रोजी झेंडे बंधूसह चौघांवर गुन्हा नोंद केले. दरम्यान, महापालिकेकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्काळ पोलिसांनी पवनकुमार झेंडे याला अटक केली आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा परवाना एजंट राहुल वाघमारे यांनी दिल्याचे सांगितले. त्यानंतर वाघमारे याला अटक करण्यात आली.  त्याच्याकडे कसून चौक केली असता त्याने हा परवाना महादेव पाटील या कंत्राटी कर्मचाऱ्याने दिला असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यालाही ताब्यात घेण्यात आले. या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या दोघांकडून आणखीन कोणाची नावे समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणांचा तपास सहायक निरिक्षक समीर ढोरे करत आहेत.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी