MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

कुख्यात गुंड सच्या टारझनचा निर्घृण खून



अनैतिक संबंधातून संपवले : कोयत्याने डोक्यात तब्बल २४ वार ; संशयित स्वतः पोलिसांत हजर. 

 
सांगली जनप्रवास
: खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी यांसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला, मोकातील आरोपी कुख्यात गुंड सचिन उर्फ कमलाकर पांडुरंग जाधव उर्फ सच्या टारझन (वय ४५, मूळ नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा) याचा आज पहाटे कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. नात्यातील महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून गणेश विनोद मोरे (वय १९, रा. अहिल्यानगर, कुपवाड) याने आपल्याच घरात सच्या टारझनवर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या सच्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरु असतानाच सकाळी दहा वाजता त्याचा मृत्यू झाला. खून करणारा संशयित गणेश मोरे हा रक्ताने माखलेला कोयता घेवून स्वतः कुपवाड पोलिस ठाण्यात हजर झाला. दरम्यान, गुंडाच्या खुनामुळे गुन्हेगारी वर्तुळात एकच खळबळ उडाली. येथील शासकीय रुग्णालयात नातेवाईकांसह मित्रांची मोठी गर्दी होती. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला.  

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सच्या टारझन पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. एका खुनाच्या गुन्ह्यात त्याला मोका कायद्यानुसार कारवाई झाली होती. त्यानंतर सद्या जामिनावर तो बाहेर होता. गेल्या काही दिवसांपासून तो अहिल्यानगर परिसरात वास्तव्यास होता. संशयिताच्या नात्यातील एका महिलेशी त्याचे अनैतिक संबंध होते. तोच राग संशयित गणेश मोरे याच्या मनात कायम होता. आज सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास सच्या टारझन हा झोपेत असत्याने संशयित त्याठिकाणी आला. त्याने कोयत्याने डोक्यात सपासप वार केले. त्यात सच्याच्या डोक्यात, मानेला, तोंडाला वर्मी वार झाले. रक्ताच्या थारोळ्यात तो त्याठिकाणी पडला. त्यानंतर त्या हतावरही वार करण्यात आले. घरभर रक्ताचा सडा पडला होता. घटनास्थळी असणाऱ्या लोकांनी गंभीर अवस्थेत त्याला उपचारासाठी सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, संशयित गणेश मोरे हा रक्ताने माखलेला कोयता हातात घेवून कुपवाड पोलिस ठाण्यात गेला. सच्या टारझनचा खून केल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर एकच खळबळ उडली. शासकीय रुग्णालयात नातेवाईकांसह मित्रमंडळींची मोठी गर्दी होती. सच्यावर कोयत्याने २४ 






वार करण्यात आल्याचे उत्तरीय तपासणीत समोर आले. घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक प्रवीण गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेशनचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील, जितेंद्र जाधव, सचिन कनप, विजय कोळी, गणेश नरळे, गजानन जाधव, संदीप कोळी यांच्यासह पथक दाखल होते.  

टारझनविरुद्ध नऊ गुन्हे आहेत दाखल...

नगरसेवक दाद्या सावंतचा खून, तसेच आर्म ऍक्‍ट, आत्महत्येस प्रवृत्त करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, मारामारी, खंडणी आणि मुंबई पोलिस कायद्यानुसार शहर पोलिस ठाण्यात सात गुन्हे दाखल आहेत. विश्रामबाग पोलिस ठाण्यात खंडणी आणि आर्मऍक्‍टचा गुन्हा आहे. तर कऱ्हाड पोलिस ठाण्यातही आर्मऍक्‍टचा गुन्हा दाखल झाला आहे. मोका कायद्यानुसारही कारवाई झाली होती. काही वर्षांपुर्वी सच्या टारझन याला कऱ्हाड पोलिसांनी अटक करून पाच पिस्तुले जप्त केली. सांगलीत त्याच्या दोन साथीदारांकडून तीन पिस्तुले, दोन रिव्हॉल्व्हर जप्त केली. एकाचवेळी तब्बल दहा पिस्तुले मिळाल्याने खळबळ उडाली होती.

दाद्या सावंत खूनातील आरोपी...

सांगलीतील राम मंदिर ते शासकीय रुग्णालय रस्त्यावर माजी नगरसेवक दाद्या सावंत याचा गोळ्या झाडून सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास खून करण्यात आला होता. ही घटना दि. २ डिसेंबर २०११ रोजी घडली होती. तेव्हापासून सचिन टारझन चर्चेत आला. याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी सात जणांवर खूनाचा गुन्हा दाखल केला होता. दाद्याचा भाऊ सच्या सावंतने सहा महिन्यांत टारझनवर दोनवेळा हल्ला केला होता. त्यामुळे स्वतःची गेम होण्याआधी दाद्याचा गेम करून मुळावर घाव घालण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने कबुली जबाबात दिली होती. दरम्यान, तत्कालीन अधीक्षक सुहैल शर्मा यांनी ८ मे २०१८ रोजी  सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई केली होती.

अकबऱ्याचा खून अन्...

गुंड अकबर अत्तारचा खून ८ डिसेंबर २००८ रोजी झाला. अकबऱ्याची बहीण झरीना हिने फिर्याद दिली होती. त्यात संशयित आरोपी म्हणून दाद्याचे नाव घालण्यास टारझनने भाग पाडले. त्याचा राग सचिन व दाद्याच्या मनात होता. टारझन तेव्हापासून टार्गेट झाला होता. आपल्यावर हल्ला होईल या भीतीने तो सावध होता. त्यानंतरही तो सावंत टोळीच्या भीतीने सांगलीत उघड फिरत नव्हता. टारझनचा कायमचा काटा काढायचा असा निश्‍चय दाद्याच्या टोळीने केला होता. टारझनवर सुभाषनगर येथे गोळीबार झाला होता. टारझनच्या मांडीत गोळी घुसली होती. ती त्याने मिरजेत एका सर्जनकडे काढली. याची नोंद पोलिस ठाण्यात झाली नव्हती.


रिक्षाचालक ते जिल्हाध्यक्ष... 

सचिन जाधव उर्फ टारझन याचे वडील रिक्षा चालवत होते. मोठा झाल्यानंतर तो ही रिक्षा चालवू लागला. वडीलांच्या रिक्षावर त्याने टारझन लिहिले होते. तेंव्हापासून तो टारझन नावाने परिचीत झाला. अल्पवयीन असताना त्याने एकावर चाकू हल्ला केला होता. मारामारी, दहशत माजवणे, बेकायदा हत्यार बाळगणे आदी गुन्हे आहेत. सचिन टारझनचा प्रारंभी रिक्षा चालविण्याचा व्यवसाय होता. त्यानंतर त्याने काही रिक्षा संघटनेत काम केले. त्यानंतर तो गुंडगिरीकडे वळला. चार वर्षापूर्वी दलित महासंघाची राजकीय परिषदेचे सांगलीत आयोजन केले होते. या परिषदेत टारझन याची महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी