MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

बेडग सरपंच उमेश पाटील व उपसरपंच मल्हारी नागरगोजे यांच्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल

जनप्रवास प्रतिनिधी

मिरज
मिरज तालुक्यातील बेडग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची  स्वागत कमान पाडल्याच्या आरोपाखाली बेडग गावचे लोकनियुक्त सरपंच उमेश शंकर पाटील आणि उपसरपंच संभाजी उर्फ मल्हारी नागरगोजे व एक अनोळखी अशा तिघांविरुध्द अखेर मिरज ग्रामीण पोलिसात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार महादेव कांबळे (वय 43) यांनी फिर्याद दिली आहे.

  सरपंच, उपसरपंचावरील या कारवाईनंतर बेडग गांव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. तर स्वागत कमान पाडापाडी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करीत दलित समाजाने बेडग गाव सोडल्याच्या घटनेची राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने शनिवारी सकाळी बेडग गावाला भेट दिली. स्वागत कमान पाडलेल्या ठिकाणाची पाहणी केली. कमान अनधिकृत ठरविण्याची कारणे, पाडकाम करण्यामागचा हेतू आणि दलित समाजाला गाव सोडावे लागणे याबाबतचा संपूर्ण अहवाल सात दिवसात सादर करण्याचे निर्देश अनुसुचित जाती आयोगाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिले आहेत.

तालुक्यातील बेडग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे स्वागत कमान उभारली जात होती. मात्र, सदर कमान अनधिकृत ठरवून ग्रामपंचायत प्रशासनाने 16 जून रोजी पाडून टाकली. सरपंच उमेश पाटील, उपसरपंच संभाजी नागरगोजे यांच्या सांगण्यावरुन तसेच जातीयवाद करुन कमान पाडल्याचा आरोप दलित समाजाने केला.  बेडग गावातून बाहेर पडत मंत्रालयावर लाँग मार्च काढला. उपमुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले. राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाने गावाला भेट देऊन आढावा घेतला. त्यानंतर सरपंच, उपसरपंच आणि एक अनोळखी अशा तिघांविरुध्द ऍट्रॉसिटी दाखल करण्यात आली आहे.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी