पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

वंचितची मविआकडे 27 जागांची मागणी,

इमेज
 वंचितची मविआकडे 27 जागांची मागणी,  अकोला, जालना आणि पुणे लोकसभेसाठी आग्रह! मुंबई : वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे  27 जागांचा प्रस्ताव समोर ठेवलाय. वंचित बहुजन आघाडीने एकूण 27 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. वंचित बहुजन आघाडी अकोला,जालना आणि पुणे या तीन लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या प्रस्तावामुळे महाविकास आघाडीमध्ये तिढा वाढणार की सुटणार? असा प्रश्न सध्या निर्माण झालाय.  20 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा  महाविकास आघाडीतील आतापर्यंत झालेल्या चर्चेत घटक पक्षाच्या वाट्याला संभाव्य जागांवर वंचितने दावा केला आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या 7 जागा, काँग्रेसच्या 9 जागा तर राष्ट्रवादी पवार गटाच्या 5 जागांचाआणि तिढा असलेल्या 5 जागांवर वंचितने मागणी केली आहे. तर 48 पैकी शिवसेना एकूण वीस जागांवर निवडणूक लढवणार ठाम आहे. तर वंचित बहुजन आघाडी अकोला,जालना आणि पुणे या तीन लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहे.  वंचितकडून 27 जागांचा प्रस्ताव सादर  आम्ही 27 जागांसाठी यादी दिली. काही अपवाद वगळता चर्चा करण्यात येईल. आम्हाला मविआमध्ये सहभागी

महाविकास आघाडीकडून उमेदवारीबाबत ऑफर नाही; पण लवकरच येईल, शाहू महाराज

इमेज
 महाविकास आघाडीकडून उमेदवारीबाबत ऑफर नाही; पण लवकरच येईल, शाहू महाराज  कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून अद्याप तरी मला ऑफर आलेली नाही, असे नमूद करत असतानाच श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी ती लवकरच येईल, असा निर्वाळा दिला. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी असे विधान करत एक प्रकारे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे आपण उमेदवार असणार, असे स्पष्ट केले आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा कोल्हापूर दौरा झाला. तेव्हा त्यांनी सर्वप्रथम श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीबाबतची चर्चा केली होती. तथापि, पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी शाहू महाराज हे निवडणुकीबाबत चर्चेत आहेत. हे मला प्रथमच कळत आहे, असे सांगितले. पण याचवेळी त्यांनी शाहू महाराज हे उमेदवार असतील तर आम्हाला आनंदच होईल, असे म्हणत त्यांच्या उमेदवारीबाबत संकेत दिले होते. त्यानंतर गेले दोन दिवस कोल्हापुरात शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार असणार अशी चर्चा सुरू होती. याबाबत आज श्रीमंत शाहू महाराज यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संवाद साधून कोल्हाप

किल्ले रायगडावर होणार ‘तुतारी’ चिन्हाचं अनावरण,

इमेज
 किल्ले रायगडावर होणार ‘तुतारी’ चिन्हाचं अनावरण,  शरद पवार गटाकडून खास कार्यक्रमाचं आयोजन मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे पक्षचिन्ह बहाल केले आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाकडे हे चिन्ह असणार आहे. दरम्यान या पक्षचिन्हाचा जास्तीत जास्त प्रचार, प्रसार व्हावा यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न केला जातोय. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 24 फेब्रुवारी रोजी या चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर करण्यात येणार आहे. त्यासाठी खास कार्यक्रमाची तयारी शरद पवार गटाकडून केली जात आहे. कार्यक्रमाचा खास टिझर प्रदर्शित शरद पवार गटाच्या अधिकृत एक्स खात्यावर या कार्यक्रमाची माहिती देण्यात आलीय. या कार्यक्रमाचे एक खास टिझर प्रदर्शित करण्यात आले आहे. किल्ले रायगडावर हा कार्यक्रम होणार आहे. ‘शरद पवार साहेबांच्या साथीने विकासाचं रणशिंग फुंकलं जाणार आहे,’ असं या पोस्टमध्ये म्हणण्यात आलंय. शरद पवार गटाच्या एक्स खात्यावर शेअर करण्यात आलेल्या टिझरमध्ये पक्षचिन्ह अनावरण सोहळ्याविषयी अधिक माहिती देण्यात आलीय. या

शिरढोण येथील अपघातात कोल्हापूरचे तिघे जागीच ठार

इमेज
 शिरढोण येथील अपघातात कोल्हापूरचे तिघे जागीच ठार कवठेमहांकाळ (प्रतिनिधी):-  रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथील उड्डाणपूलावरील सिमेंटच्या कठड्याला भरधाव वेगात असलेल्या क्रेटा गाडीने जोरदार धडक देऊन झालेल्या आपघातात तीन जन जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाले आहेत.हा अपघात सोमवारी सायंकाळी 4.30 दरम्यान घठला आपघातातील मृत व जखमी हे कोल्हापूर येथील आहेत. अपघातात कोल्हापूर येथील छत्रपती पार्क, रमण मळा येथील सुर्यकांत दगडू जाधव,(वय 56) गौरी केदार जाधव, युवराज विजय जाधव हे तिघेजण जागीच ठार झाले असून प्रशांत पांडुरंग चिले हे गंभीर जखमी झाले आहेत.हे सर्वजण कोल्हापूर येथील छत्रपती पार्क रमण मळा येथील रहिवशी आहेत. पोलीस सूत्राकडून व घटनास्थळा वरून मिळालेली अधिक माहीती अशी की, कोल्हापूर सराफी व्यवसायिक असलेले जाधव कुटुंबीय एम.एच.09/ जी एफ- 8323 या क्रेटा बनावटीच्या गाडीने पंढरपूर हून कोल्हापूर कडे जात होते.शिरढोण येथील उड्डाणपूलावरील कठड्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी उड्डाणपूलाच्या सिमेंटच्या कठड्यावर जोरदार आदळली. या अपघातात तिघेजण जागीच ठार झाले

जयंत पाटलांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या

इमेज
जयंत पाटलांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या  महाविकास आघाडीला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षडयंत्र!  मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. नुकताच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर आता पुन्हा एकदा विरोधी पक्षातील एका दिग्गज नेत्याची चर्चा सूरू झाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, जयंत पाटलांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या आहेत. आपण कुठेही जाणार नसल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाय महाविकास आघाडीचे वाढती ताकद पाहता जाणीवपूर्वक बदनाम करण्याच षडयंत्र आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.  अशोक चव्हाण यांच्यानंतर जयंत पाटलांच्या चर्चा  जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या सुरू झाल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा विरोधी पक्षातील एक बडा चेहरा सत्ताधारी पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. नुकतंच काँग्रेस नेते अशोक चव्हाण सत्ताधारी पक्षात गेल्याने जयंत पाटील यांच्या पदरात काय पडणार इथपर्यंत चर्चा रंगू लागल्या. खासदार सुप्रिया सुळे यांनी

विद्यासागर महाराज यांचं निधन, मोदींकडून शोक व्यक्त

इमेज
 विद्यासागर महाराज यांचं निधन, मोदींकडून शोक व्यक्त प्रसिद्ध जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज यांचे रविवारी पहाटे छत्तीसगडमधील डोंगरगड येथील चंद्रगिरी तीर्थ येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या 77 वर्षी अखेरचा श्वास घेतला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ’आचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज जी यांच्या असंख्य भक्तांसोबत माझे विचार आणि प्रार्थना आहेत. समाजातील त्यांचे अमूल्य योगदान, विशेषत: लोकांमध्ये आध्यात्मिक जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न, दारिद्र्य निर्मूलन, आरोग्यसेवा, शिक्षण आणि इतर अनेक गोष्टींसाठी त्यांनी केलेले कार्य पुढील पिढ्या लक्षात ठेवतील, असे मोदी यांनी एक्सवर लिहिले आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील राजनंदगाव जिल्ह्यातील डोंगरगड येथे जाऊन आचार्य विद्यासागर महाराज यांची भेट घेतली होती. डोंगरगडमधील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या माँ बामलेश्वरी मंदिरातही मोदींनी पूजा केली होती. वर्षानुवर्षे त्यांचे आशीर्वाद घेण्याचा मान मला मिळाला. गेल्या वर्षी छत्तीसगडमधील डोंगरगड येथी

जैन मुनी संत आचार्य विद्यासागर महाराजांचे निधन,

इमेज
जैन मुनी संत आचार्य विद्यासागर महाराजांचे निधन,  77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; जैन धर्मियांवर दु:खाचा डोंगर डोंगरगड : जैन धर्मियांचे दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचे रात्री 2 वाजून 35 मिनिटांनी वृद्धपकाळाने निधन झाले. छत्तीसगडच्या डोंगरगड इथे त्यांच निधन झाले. ते 77 वर्षाचे होते. आचार्य विद्यासागरजी महाराज यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1946 कर्नाटकमधील सदलगा येथे झाला होता.  संत आचार्य विद्यासागर महाराजांनी घेतली समाधी दिगंबर जैन आचार्य होते. शिष्यवृत्ती आणि तपस्यांसाठी त्यांची ओळख होती. दीर्घकाळ ध्यानधारणा करण्यासाठी ते ओळखले जायचे. त्यांनी राजस्थानमध्ये दीक्षा घेतली, पण त्यांनी बहुतेक वेळ बुंदेलखंड भागामध्ये वास्तव्य केले. छत्तीसगडच्या डोंगरगड इथे त्यांच्यावर रविवारी दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.  आज पंचतत्वात होणार लीन जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज यांनी समाधी घेत देह त्याग केला आहे. मध्यरात्री 2.30 वाजता आचार्य विद्यासागर महाराज यांची अखेरचा श्वास घेतला. चंद्रगिरीच्या डोंगरगड येथे त्यांचे निधन झाले. आचार्य विद्यासागर महाराज गेल्या तीन दिवसांपासून अन्न-ज

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

इमेज
 विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार गोंदिया : जैन धर्मातील दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या  गाडीचा भीषण अपघात झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा जवळील पानगाव येथे हा भीषण अपघात झाला. पुजारीटोला धरणाच्या कालव्यामध्ये गाडी कोसळली असून कालव्यामध्ये पाणी असल्याने यात तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे भाविक जखमी झाले आहे. सध्या त्यांच्यावर सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातात तिघे जागीच ठार दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं रात्री 2 वाजून 35 मिनिटांनी वृद्धपकाळाने निधन झालं. छत्तीसगडच्या डोंगरगड इथं त्यांच निधन झालं. त्यांच्या अंत्य दर्शनाला  जात असताना हा अपघात झाला आहे. मध्यप्रदेश राज्यातील रिवा जिल्ह्यातून छत्तीसगडच्या डोंगरगड कडे हे भाविक काल, 17 फेब्रुवारीला रात्री निघाले होते. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील पानगाव येथे गाडी अनियंत्रित झाल्याने पुजारीटोला धरणाच्या कालव्यामध्ये त्यांची कार कोसळली. दरम्यान का

अशोक चव्हाणांनी ’राज्य’मार्ग पकडल्याने नारायण राणेंना कोकणातून ’लोक’मार्ग पकडावा लागणार!

इमेज
 अशोक चव्हाणांनी ’राज्य’मार्ग पकडल्याने नारायण राणेंना कोकणातून ’लोक’मार्ग पकडावा लागणार! मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेसला धक्का दिला. महाविकास आघाडीकडून आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुती विरोधात महाप्लॅन सुरू असतानाच अशोक चव्हाण काँग्रेसकडून सर्व बैठकांमध्ये हजर होते. मात्र तेच अशोक चव्हाण आता भाजपमध्ये सामील झाल्याने महाविकास आघाडीमध्ये एकच खळबळ उडाली. अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच त्यांना राज्यसभेची उमेदवारी सुद्धा जाहीर करण्यात आली. त्यामुळे देव पाण्यात घालून बसलेल्यांना आता पुन्हा एकदा वाट पाहण्याची वेळ आली आहे.  नारायण राणेंचा राज्यसभेतून पत्ता कट  दुसरीकडे भाजपकडून राज्यसभेवर गेलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुद्धा धक्का बसला असून त्यांचा राज्यसभेतून पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे आता नारायण राणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरावं लागणार आहे. भाजपकडून त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित समजली जात आहे. उमेदवारी मिळाल्यास रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून ठ

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी प्रफुल पटेल

इमेज
 राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी प्रफुल पटेल  मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रफुल पटेल यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. सर्व तांत्रिक बाबी तपासून प्रफुल पटेल यांना उमेदवारी देण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. प्रफुल पटेल निवडून आल्यानंतर ते आपल्या आधीच्या सदस्यपदाचा राजीनामा देतील. त्यानंतर मे महिन्यात प्रफुल पटेल यांच्या आधीच्या टर्मसाठी मे महिन्यात पुन्हा निवडणूक होईल. तेव्हा भाजपा आणि शिवसेनेशी चर्चा करून, त्या जागेबाबत निर्णय घेऊ, असेही सुनील तटकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना 15 दिवसांची मुदतवाढ दिली होती. त्याप्रमाणे विधानसभा अध्यक्ष उद्या 15 फेब्रुवारी रोजी आपला निकाल जाहीर करतील. आम्ही जी काही कायदेशीर बाजू होती, ती मांडलेली आहे, असेही सुनील तटकरे यावेळी म्हणाले. तसेच निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यामुळे तिथेही आम्ही कायदेशीर लढाई लढण्याची तयारी ठेवली आहे, असेह

हातकणंगलेच्या खासदारांनी काय केले ? प्रकाश आवाडे यांची टीका

इमेज
 हातकणंगलेच्या खासदारांनी काय केले ? प्रकाश आवाडे यांची टीका इचलकरंजी : खासदारांनी आत्तापर्यंत काय केले? भाजपच्या लोकांशी बोलताना लोक त्यांना बदला असे म्हणतात, अशी टीका भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी खासदार धैर्यशील माने यांचे नाव न घेता केली. या टिकेला पक्षाच्या महाअधिवेशनामध्ये उत्तर देऊ, अशी भूमिका खासदार माने यांनी बुधवारी व्यक्त केली. शिरदवाड (ता. शिरोळ) येथे विकास कामांच्या उद्घघाटन कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर होते. यावेळी आवाडे यांनी राजकीय टोलेबाजी केली. इकडे भाजपमध्ये आम्हाला चार हात लांब ठेवून राजकारण सुरू आहे. ते कोण करते हे सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत आवाडे यांनी भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना चिमटा काढला. लोक म्हणतात; आम्ही नाही देशात तिसर्‍यांदा मोदी हेच पंतप्रधान होणार. जगात भारी अशी त्यांची चर्चा आहे. परंतु इथे खासदार कोण आहेत. त्यांनी या भागाचा आतापर्यंत काय दिले याचे उत्तरे लोक मागत आहेत. याबाबत तुमचे आणि आमचे वरिष्ठ नेते काहीतरी निर्णय घेतील. आम्ही काही कोणाला बदला म्हणत नाही. वरिष्ठ जो निर्

पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न

इमेज
 माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर दिल्ली : काँग्रेसचे नेते, देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक्स अकाऊंटवरून केली. त्यांच्यासह माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारे डॉ. एम.एस. स्मामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. एक्स अकाऊंटवर पंतप्रधान मोदी यांनी तीन पोस्ट टाकून या तीनही नेत्यांच्या नावांची घोषणा केली. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना ते म्हणाले, माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा करताना मला आनंद वाटत आहे. आर्थिक विकासाचे द्वार उघडणारे पी. व्ही. नरसिंह राव एक प्रतिष्ठित विद्वान राजकारणी पी. व्ही. नरसिंह राव यांनी भारताच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांनी आंध्र प्रदेशचे (एकत्रित) मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्ष संसद आणि विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. त्यांच्या दूरदरशी नेतृत्वामुळे भारत आ

इस्लामपूर येथे निषेध मोर्चातील तिरडीवरून जोरदार धुमचक्री

इमेज
    इस्लामपूर येथील पंचायत समितीसमोर निषेध मोर्चातील तिरडीवरून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पोलिसांच्यामधील धुमश्चक्री.    इस्लामपूर  येथे भाजपा केंद्र सरकारच्या निषेध मोर्चातील तिरडीवरून जोरदार धुमचक्री  इस्लामपूर (ता.वाळवा) येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पोलिसां मध्ये पक्षपाती निवडणूक आयोग व भाजपा केंद्र सरकारच्या निषेध मोर्चातील तिरडीवरून जोरदार धुमचक्री झाली. पोलिसांनी तिरडी हिसकावून घेण्याचा,तर कार्यकर्त्यांनी उरली-सुरली तिरडी पेठ-सांगली रस्त्यावर जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी युवक कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी पक्षपाती निवडणूक आयोग व भाजपा सरकारच्या निषेधाच्या, तसेच राष्ट्रीय नेते खा.शरदचंद्र पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.       निवडणूक आयोगाने पक्षपाती निर्णय घेत खा.शरदचंद्र पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्याच्या निषेधार्थ निषेध मोर्चाचे आय

तपास यंत्रणा वापरून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न होतोय

इमेज
 तपास यंत्रणा वापरून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न होतोय - जयंत पाटील यांचा आरोप सोलापूर : महाराष्ट्रात सरकारी यंत्रणा वापरून रोज नवनवे प्रश्न करून अन्याय-अत्याचाराच्या गोष्टी घडत आहेत. त्यातून महाराष्ट्र समाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या अडचणीत आणले तरी भविष्यात हा पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात जयंत पाटील यांनी दौरा करून टेंभुर्णी (ता. माढा ) येथे आयोजित पक्ष कार्यकर्त्यांचा मेळाव्यात मार्गदर्शन केले. त्यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि घड्याळाचे चिन्ह अजित पवार गटाला बहाल केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. कणाहीन निवडणूक आयोगाकडून न्यायाची अपेक्षा करता येणार नाही. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याचा त्यांनी पुनरूच्चार केला. शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्वादी काँग्रेस पक्ष आहे. देशातील विविध

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नवं नाव!

इमेज
  शरद पवार गटाचं नाव ठरलं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नवं नाव! नवी दिल्ली: पवार गटाला ’राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव मिळालं आहे. शरद पवार गटाला  केंद्रीय निवडणूक आयोगाने हे नाव देण्यात आलं. राज्यसभेच्या निवडणुकीपर्यंत हे नाव देण्यात आलं असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाच्या चिन्हावर मात्र अद्याप काही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे गेल्यानंतर शरद पवार गटाला नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला  काही पर्याय द्यायचे होते. त्यामध्ये शरद पवार गटाने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार , नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार ही तीन नावं दिली होती. त्यामध्ये निवडणूक आयोगाने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव त्यांना दिलं आहे.  शरद पवार यांच्या हातातून जो पक्ष गेला हा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी हे नाव,आणि नवीन नावात शरद पवारांचं स्वतःचं नाव हे या नवीन नावात दिसून येतंय. त्यामुळे या नावाचा पर्याय

शरद पवारांना सर्वोच्च धक्का

इमेज
 राष्ट्रवादी अन् घड्याळ अजितदादांचेच निवडणूक आयोगाचा निकाल : शरद पवारांना सर्वोच्च धक्का मुंबई : शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून, अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे. आता निवडणूक आयोगाने अजित पवारांचा मार्ग प्रशस्त केल्याने आता आमदार अपात्रता निर्णय सुद्धा अजित पवारांच्याच बाजूने जाण्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून उद्यापर्यंत (7 फेब्रुवारी) शरद पवार गटाला चिन्हाबाबत कळवण्यास सांगण्यात आलं आहे.  राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट आमदार अपात्रता निकाल 14 फेब्रुवारीला लागण्याची शक्यता आहे. निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या निकालात अजित पवार गट व शरद पवार गटाचे भवितव्य ठरणार आहे.  जो पक्ष उभारला आता तोच पक्ष हातून गेला  मुंबई : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांकडे निवडणूक आयोगनाने दिले आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी पक्ष गेला असल्याचं चित

अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि पावणे दोन लाखांपर्यंत ग्रॅच्युईटी मिळणार

इमेज
 अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि पावणे दोन लाखांपर्यंत ग्रॅच्युईटी मिळणार राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत मुंबई: अंगणवाडी सेविकांसाठी राज्य सरकार मोठी खुशखबर देण्याच्या तयारीत आहे. अंगणवाडी सेविकांनी संप सुरू केल्यानंतर सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू होणार, त्याचसोबत ग्रॅज्युएटीही दिली जाणार असल्याचं समजतंय. हा निर्णय झाला तर राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना 1 लाख 55 हजारापासून ते 1 लाख 76 हजारापर्यंत ग्रॅज्युटी मिळण्याची शक्यता आहे.  राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविकांना आणि मदतनिसांना याचा लाभ मिळणार आहे.  राज्यातील अंगणवाडी सेविकांना ग्रॅच्युईटी किती द्यायची यावर निर्णय झाला असून त्यांना पेन्शन किती द्यायची यावरती विभागाची सल्लामसलत सुरू असल्याची माहिती आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महिला आणि बालविकास विभागाचा प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे.  दोन लाख अंगणवाडी सेविकांना लाभ मिळणार राज्यात सध्या 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत. त्यापैकी 1 लाख 10 हजार अंगणवाडी सेविका आणि 90 हजार मदतनीस यांना पेन्शन योजना आणि ग्रॅज्यु

अजितदादांकडून आर आर आबा गटाचा सत्कार स्वीकारण्यास नकार

इमेज
 माझी काय राखली म्हणत अजितदादांकडून आर आर आबा गटाचा सत्कार स्वीकारण्यास नकार सांगली : यायला लागतयं असा आग्रह आर आर आबांच्या कार्यकर्त्यांनी धरताच उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष करण्याच्या महत्वाच्या निर्णयात सक्रिय मदत केली. तरीही तुम्ही माझी काय राखली? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगावमध्ये आर आर आबा गटाच्या कार्यकर्त्यांचा आदर सत्कार स्वीकारण्यास आणि आबांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यास नकार दिला. सोमवारी उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगली जिल्ह्याचा धावता दौरा केला.  विटा येथे स्व.आमदार अनिल बाबर यांच्या घरी सांत्वनपर भेट देउन सांगलीला परतत असताना ठिकठिकाणी त्यांचे स्वागत झाले. अगदी तासगावच्या वेशीवर खासदार संजयकाका पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांनीही स्वागत केले.यानंतर तासगाव बाजार समितीजवळ आल्यानंतर पवार यांची मोटार आरआर आबा पाटील गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, अमोल शिंदे आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दादांची मोटार अडवून आबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करा आणि आमचा सत्कार स्वीकारा असा आग्रह करीत होते.यावेळी मी आताच सांत्वन भेट केली असल्या

कोल्हापूर लोकसभेबाबत लवकरच निर्णय - सतेज पाटील

इमेज
कोल्हापूर लोकसभेबाबत लवकरच निर्णय - सतेज पाटील संभाजीराजे यांच्यासोबत वरिष्ठ पातळीवर चर्चा कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांसाठी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांची महाविकास आघाडीत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. याबाबत लवकरच त्यांची आणि श्रीमंत शाहू महाराजांची भेट घेऊन याबाबत निर्णय होईल, असे काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते, कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी स्वराज्य पक्षालाच प्राधान्य दिल्याने महाविकास आघाडीत चलबिचल वाढली आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. लोकसभा जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी गोंधळ आहे का या प्रश्नावर सतेज पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीबाबत अजून महायुतीने पत्ते खोलले नाहीत. कोणते पक्ष किती जागा लढवणार हे अजून स्पष्ट नाही. किमान महाविकास आघाडीच्या बैठका तरी झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी 10 तारखेचा मुहूर्त ठरला आहे. जागा वाटप झाल्यानंतरच दिशा स्पष्ट होणार यामुळे महाविकास आघाडीत काही अडचण असणार नाही. कोल्हाप

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी