SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्या कुपवाडमधील तरूणास अटक

नवी दिल्ली: पवार गटाला ’राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव मिळालं आहे. शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने हे नाव देण्यात आलं. राज्यसभेच्या निवडणुकीपर्यंत हे नाव देण्यात आलं असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाच्या चिन्हावर मात्र अद्याप काही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे गेल्यानंतर शरद पवार गटाला नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला काही पर्याय द्यायचे होते. त्यामध्ये शरद पवार गटाने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार , नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार ही तीन नावं दिली होती. त्यामध्ये निवडणूक आयोगाने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव त्यांना दिलं आहे.
शरद पवार यांच्या हातातून जो पक्ष गेला हा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी हे नाव,आणि नवीन नावात शरद पवारांचं स्वतःचं नाव हे या नवीन नावात दिसून येतंय. त्यामुळे या नावाचा पर्याय देताना हा मुद्दा लक्षात घेतला गेला असल्याची माहिती मिळतेय.
निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिल्यानंतर त्यांना पक्षाचं नाव आणि चिन्हाची सूचना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर दिलेल्या पर्यायामधून शरद पवार गटाला ’राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव देण्यात आलं आहे.
शरद पवार गट हा वटवृक्ष या नव्या चिन्हासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. त्याबद्दलचा निर्णय लवकरच लागण्याची शक्यता आहे.
येत्या काही दिवसात राज्यसभेच्या निवडणुका असून त्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला नवीन नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे पवार गटाला आता या नवीन नावावर निवडणूक लढवता येणार आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा