MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

शरद पवारांना सर्वोच्च धक्का




 राष्ट्रवादी अन् घड्याळ अजितदादांचेच

निवडणूक आयोगाचा निकाल : शरद पवारांना सर्वोच्च धक्का

मुंबई : शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून, अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे. आता निवडणूक आयोगाने अजित पवारांचा मार्ग प्रशस्त केल्याने आता आमदार अपात्रता निर्णय सुद्धा अजित पवारांच्याच बाजूने जाण्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून उद्यापर्यंत (7 फेब्रुवारी) शरद पवार गटाला चिन्हाबाबत कळवण्यास सांगण्यात आलं आहे. 

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट

आमदार अपात्रता निकाल 14 फेब्रुवारीला लागण्याची शक्यता आहे. निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या निकालात अजित पवार गट व शरद पवार गटाचे भवितव्य ठरणार आहे. 


जो पक्ष उभारला आता तोच पक्ष हातून गेला 

मुंबई : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांकडे निवडणूक आयोगनाने दिले आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी पक्ष गेला असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे आता शरद पवारांना नवं चिन्ह शोधावं लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून तयारी देखील सुरु करण्यात आली होती. जर निवडणुक आयोगाचा निर्णय आपल्या बाजूने नाही आला तर पक्षाच्या चिन्ह काय असणार यासंदर्भात शरद पवार गटाची बैठक देखील पार पडली होती. 

या बैठकीमध्ये शरद पवारांनी चिन्हाची यादी देखील केली होती. त्यामुळे आता शरद पवार लवकरच त्यांच्या पक्षाचं नव नाव आणि चिन्ह जाहीर करतील असं सांगण्यात आलं आहे. जो न्याय निवडणूक आयोगाने शिवसेना दिला होता, तोच आता राष्ट्रवादीला दिला आहे. त्यामुळे आगामी येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये शरद पवार कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

शरद पवार गटाला नवे चिन्ह आणि नाव निवडावे लागणार 

निवडणूक आयोगाने हा निकाल दिल्यानंतर शरद पवारांकडे दोन पर्याय आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयावर शरद पवार सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात किंवा आता शरद पवारांना पक्षासाठी नवं नाव आणि चिन्ह शोधावं लागणार आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या निकालावर आता शरद पवार काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

शिंदे गटाचा न्याय दादांच्या राष्ट्रवादीला

राष्ट्रवादीच्या आधी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद हा निवडणूक आयोगासमोर होता. त्यावेळी आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाचं असल्याचं सांगत तेच खरी शिवसेना असल्याचं स्पष्ट केलं. 

शिवसेनेत ज्या काही घडामोडी घडल्या त्याच पद्धतीने घडामोडी या नंतरच्या राष्ट्रवादीमध्ये घडल्या. अजित पवारांनी भाजपला साथ दिल्यानंतर बहुतांश आमदार हे त्यांच्यासोबत गेले आणि राष्ट्रवादीचा वाद हा निवडणूक आयोगामध्ये पोहोचला.

निवडणूक आयोगाने काय म्हटले आहे?
अजित पवाराकंडील पक्ष खरा पक्ष आहे.  
पक्ष आणि चिन्ह अजित पवार वापरतील 
दोन खासदार अजित पवार गटाच्या बाजूने 
5 आमदारांनी दोन्ही बाजूंनी पत्र दिले 
उद्या 7 फेब्रुवारीपर्यंत  पक्षाचं नाव आणि चिन्ह सूचवावे 
पक्षांतर्गत निवडणूक झाल्या नाहीत 


 

अजित पवारांसोबत कोण?
- महाराष्ट्रातील 41आमदार 
- नागालँडमधील 7आमदार 
- झारखंड 1आमदार 
- लोकसभा खासदार 2
- महाराष्ट्र विधानपरिषद 5
- राज्यसभा 1


शरद पवारांसोबत कोण?
महाराष्ट्रातील आमदार 15
केरळमधील आमदार 1 
लोकसभा खासदार 4 
महाराष्ट्र विधानपरिषद 4
राज्यसभा -3


घाबरण्याचं कारण नाही, पवारसाहेब जिथे उभे राहतील तिथे पक्ष उभा राहील, शरद पवार म्हणजेच पक्ष; जयंत पाटील


मुंबई: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निकाल निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने दिल्यानंतर आता शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे. ज्या व्यक्तीने राष्ट्रवादी पक्ष उभारला त्या शरद पवार साहेबांच्या हातातून पक्ष हिसकावला जात असून हे धक्कादायक शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी (गरूरपीं झरींळश्र) दिली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचंही ते म्हणाले. 

आजपर्यंत शरद पवारांनी अनेकांना उभं केलं, आमच्यासारख्या अनेकांना मंत्रिपदं दिली, आणि आज त्यांच्याच हातातून हा पक्ष काढून घेतला जातोय. आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून न्यायालयाकडून शेवटची अपेक्षा आहे असं जयंत पाटील म्हणाले. 
निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय. देशातील जवळपास सर्वच संविधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली असल्याने तर्कहीन निर्णय देऊन तांत्रिक कारणे पुढे केली गेलेली सकृतदर्शनी दिसत आहे. 

या निकालाचा सविस्तर अभ्यास करुन आम्ही त्यावर भाष्य करू. या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून देशाचे सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे.


पाच आमदारांनी व एका खासदाराने दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे


ही लोकशाहीची हत्या; अनिल देशमुखांचा आरोप 

दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवडणूक आयोगाचा हा निर्णय म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले आहे. 


निर्णयाचे स्वागत करतो, बावनकुळेंची प्रतिक्रिया 

दुसरीकडे, या निर्णयाचे स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. 

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी