MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

भाजपचं ठरलं! लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम, ही आहे संभाव्य उमेदवारांची यादी



 भाजपचं ठरलं! लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम, ही आहे संभाव्य उमेदवारांची यादी

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत असून, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा लवकरच सुटणार असल्याचे चित्र आहे. त्याचवेळी एक मोठी बातमी समोर येत असून भाजप 48 पैकी 32 जागा लढवण्यावर ठाम असल्याचं समोर आले आहे. भाजपा या 32 जागांवर ठाम असून, काही जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गट आग्रही असल्याच पाहायला मिळत आहे. 


अशी असू शकते भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी,

1. पुणे : मुरलीधर मोहोळ.

2. धुळे : सुभाष भांबरे यांच्या ऐवजी प्रदिप दिघावरकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता.

3. हिंगोली : हेमंत पाटील यांच्या जागेसाठी भाजपा आग्रही असून त्याठिकाणी भाजपा तानाजी मुरकुटे यांना मिळण्याची शक्यता.

4. जालना : रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता.

5. चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेला पाठवल जाण्याची शक्यता.

6. नागपूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कायम ठेवले जाणार.

7. नंदूरबार : हिना गावित किंवा विजयकुमार गावीत.

8. अकोला : संजय धोत्रे

9. ईशान्य मुंबई : मनोज कोटक 

10. सोलापूर : सिद्धेवर महाराज यांच्या ऐवजी अमर साबळे यांना मिळण्याची शक्यता.

11. कोल्हापूर : सध्या ही जागा शिंदे गटाकडे आहे मात्र भाजपा आग्रही आहे.

12. भंडारा-गोंदिया : सुनिल मेंढे

13. बीड : विद्यामन प्रितम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे.

14. माढा - रणजितसिंह निंबाळकर 

15. गडचिरोली : अशोक नेते यांच्या ऐवजी राष्ट्रवादी चे मंत्री धर्मराव बाबा अत्राम भाजपा चिन्हावर लढू शकतात.

16. भिवंडी : कपिल पाटील 

17. सांगली : संजयकाका पाटील यांच्या ऐवजी कॉग्रेस चे विशाल पाटील भाजपा पक्ष प्रवेश करून लढू शकतो.

18. सातारा : उदयनराजे भोसले 

19. जळगाव : उन्मेष पाटील किंवा ए टे नाना पाटील.

20. दिंडोरी : भारती पवार 

21. रावेर : अमोल जावळे 

22. उस्मानाबाद : बसवराज पाटील (नुकताच बसवराज पाटील यांनी भाजपा पक्ष प्रवेश केलाय) 

23. उत्तर मुंबई : गोपाळ शेट्टी यांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना मिळण्याची शक्यता.

24. संभाजीनगर : विद्यामन मंत्री अतुल सावे किंवा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड.

25: उत्तर मध्य मुंबई : पुनम महाजन यांच्या ऐवजी आशिष शेलार यांना मिळण्याची शक्यता.

26. ठाणे : डॉ.संजीव नाईक यांना मिळण्याची शक्यता. (ही जागा सध्या शिंदे गटाकडे आहे मात्र भाजपा घेण्यास आग्रही आहे ) 

27. रत्नागिरी-सिंधुदुर्ग : नारायण राणे.( रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये अजूनही वाद सुरू आहे शिंदे गटाकडून किरण सामांत  लढण्यास इच्छुक आहेत ) 

28. दक्षिण मुंबई : राहूल नार्वेकर 

29. नांदेड : मिनल खतगावकर ( अशोक चव्हाण यांची भाची.आज सकाळी अमित शहा यांची भेट घेतलेली ) 

30 . राजेंद्र गावीत : सध्या राजेंद्र गावित शिंदे गटात आहेत मात्र ते भाजपा पक्ष प्रवेश करून भाजपा तिकिटावर लढतील अशी शक्यता आहे.

31. अहमदनगर : सुजय विखे पाटील किंवा राम शिंदे.सध्या नगरमध्ये वाद सुरू आहे.

32. अमरावती : नवनीत राणा यांचा भाजपा पक्ष प्रवेश होईल. मात्र नवनीत राणा यांचा जातीच्या प्रमाणपत्रावरून वाद सुरू आहेत.या जागेवर आनंदराव अडसूळ हे देखील आग्रही आहेत.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी