MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर,


 भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 

मोदी-शाहांकडून कोणाला संधी?

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शनिवारी पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. भाजपच्या पहिल्या यादीत एकूण 195   उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या नावांचा समावेश आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजप सलग तिसर्‍यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असे सांगितले. भाजपच्या पहिल्या यादीत 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांचा समावेश आहे.




भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची गुरुवारी नवी दिल्लीत बैठक पार पडली होती. ही बैठक रात्री साडेतीन वाजेपर्यंत सुरु होती. या बैठकीत भाजपच्या लोकसभा उमेदवारीबाबत बराच खल झाला होता. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. या बैठकीत 150 ते 200 उमेदवारांच्या नावांची चर्चा झाल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर आज अखेर भाजपकडून  उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. 

 भाजपच्या कोणत्या नेत्यांना उमेदवारी मिळाली?

वाराणसी - नरेंद्र मोदी

अंदमान निकोबार - विष्णू पडा रे

अरुणाचल पश्चिम - किरण रिजिजू

अरुणाचल पूर्व - तपिर गावो


आसाम

सिलचर - परिमल शुक्ल वैद्य

गुवाहाटी - बिजुली कलिता

तेजपुर - रणजित दत्ता

नौगाव - सुरेश बोरा

दिबृगड - सर्वानंद सोनोवाल





छत्तीसगड 


विलापसुर - तोखन साहू 

राजनंदगाव - संतोष पांडे

रायपूर - ब्रिजमोहन अग्रवाल

बस्तर - महेश कश्यप


दादरा नगर हवेली- लालुभाई पटेल


दिल्ली

चांदनी चौक - प्रवीण खंडेलवाल

उत्तर पूर्वी दिल्ली - मनोज तिवारी

बांसुरी स्वराज

दक्षिण दिल्ली - रामविर सिंग बिधुडी



उत्तर गोवा

श्रीपाद नाईक



गांधीनगर - अमित शाह

राजकोट - पुरुषोत्तम रुपाला

पोरबंदर - मनसुख मांडवीय

नौसारी - सी. आर पाटील


जम्मू काश्मीर- डॉ. जितेंद्र सिंग

कोडरमाल - अन्नपूर्णा देवी

हजारीबाग - मनीष जैस्वाल



केरळ 

कासरगोड - एम एल अश्विनी

कन्नूर - प्रफुल्ल कृष्ण 

कोझिकोडे - एम टी रमेश

त्रिशुर - सुरेश गोपी

अल्पुझा - शोभा सुरेंद्र 

अटींगल - वी मुरलीधरन


 

युवराज सिंग, अक्षय कुमारही भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून काही सेलिब्रिटींनाही उमेदवारी दिली जाऊ शकते. यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. भाजपकडून युवराज सिंग याला पंजाबच्या गुरदासपूर या प्रतिष्ठेच्या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. तर अभिनेता अक्षय कुमार याला चंदीगढ किंवा दिल्लीतील एखाद्या लोकसभा मतदारसंघातून कमळाच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा आहे. 


लोकसभेचा उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपकडून सर्व इच्छूक नेत्यांची खोलवर जाऊन चौकशी करण्यात आली होती. संबंधित लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्यांना पाठवून तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता. तसेच नमो अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांकडून विद्यमान खासदारांविषयी माहिती जाणून घेण्यात आली होती. लोकसभेच्या एका जागेसाठी दोन ते तीन नेत्यांचा विचार करण्यात आला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत अंतिम उमेदवाराची निवड करण्यात आली.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी