MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

सर्वसामान्यांचा आधारवड हरपला:

माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचे निधन 
:रंजल्या गांजल्यांचा आवाज हरपला:


माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचे निधन 
:रंजल्या गांजल्यांचा आवाज हरपला:

 राजकारनातील विचारांशी तत्वनिष्ठ असणारा  शेवटचा तारा निखळला :
कुपवाड : जनसामान्यांचे आधारवड कुपवाडचे सुपुत्र, विधानसभा व विधानपरिषदेचे माजी सदस्य, ज्येष्ठ पुरोगामी नेते प्रा. शरद रामगोंडा पाटील यांचे त्यांच्या राहत्या घरी बुधवारी पहाटे पाचच्या दरम्यान  निधन झालं.वयाच्या ८१ व्या वर्षी  त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या काही महिन्यापासून आजारी होते.

त्यांच्या निधनाने कुपवाड शहरावर शोककळा पसरली आहे.

त्यांच्या निधनामुळे सर्वसामान्य माणूस पोरका झाला असून सामाजिक, राजकिय पटलावरील सर्वसामान्यांच, रंजल्या गंजल्याल्यांच नेतृत्व हरपले आहे .कुपवाड परिसरातील सर्व व्यवसायिकांनी , व्यापाऱ्यानी,  एक दिवसाचा  दुखवटा पाळत सर्व व्यवहार बंद ठेवले. शहरातील सर्व शाळा व्यवस्थापनाने एक दिवसाची सुट्टी जाहिर करण्यात आली.सामाजिक, राजकीय, शैक्षणिक ,वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती,पुरोगामी चळवळीच्या नेत्यांनी,कार्यकर्त्यानी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. 

अंत्ययात्रेत सर्व सामान्य जनतेची मोठी गर्दी होती. 

दुपारी 12.30च्या कुपवाड शहरातील सर्व मुख्य मार्गावरून तसेच जैन बस्ती,कन्या शाळा, ,  चावडी चौक,लिंगायत गल्ली,सोसायटी चौक,देशभक्त आर. पी. पाटील विद्यालय,  मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत सर्व सामान्य जनतेची मोठी गर्दी होती. शहरातील बुधगाव रस्त्यावरील जैन समाज स्मशान भुमीत त्यांच्यावर शासकिय इतमामात मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अर्चना पाटील , कुपवाड पोलिस ठाण्याचे स. पो. नि.अविनाश पाटील यांनी पार्थिवावर पुष्प चक्र अर्पण केले. 

   यावेळी माजी खासदार राजू शेट्टी,माजी मंत्री अण्णा डांगे,माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी मंत्री प्रतिक पाटील,समित कदम, आमदार सुधीर गाडगीळ,माजी आमदार नितीन शिंदे, बजरंग पाटील,माजी आमदार दिनकर पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील , विठ्ठल खोत, डॉ. रियाज मुजावर माजी नगरसेवक, कांग्रेस जील्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शेकापचे ॲड.अजितराव सुर्यवंशी, दिगंबर कांबळे, प्रकाश काळे,वास्तुविशारद प्रमोद चौगुले भाजपचे पृथ्वीराज पवार, कांग्रेस नेत्या पाटील , जितेश कदम, बाळासाहेब व्हणमोरे, आय्याज नायकवडी, जहीर मुजावर, विठ्ठल पाटील.सी आर सांगलीकर, उद्योजक रमाकांत घोडके,यासह परजिल्ह्यातील पक्षाचे कार्यकर्ते,शहरातील सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी यांनी पर्थिवाचे दर्शन घेतले

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी