MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

सांगलीतील सराफी दुकान चोरटयांनी फोडले



 : ८५ हजारांचे दागिने केले लंपास. 

सांगली : शहरातील गणेशनगर येथे असणारे सराफी दुकान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास फोडले. दुकानात ठेवलेल्या सोन्याचांदीच्या दागिन्यांसह ८५ हजारांचा मुद्देमाल चोरटयांनी लंपास केला. सदर चोरीची घटना हि बुधवार दि. २० डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अमर पांडुरंग शिंदे (वय ३६ रा. त्रिमूर्ती चौक, सांगली) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. \



 


सांगलीतील सराफी दुकान चोरटयांनी फोडले 

याबाबत अधिक माहिती अशी कि, अमर शिंदे हे आपल्या कुटुंबियांसह त्रिमूर्ती चौक परिसरात राहतात. त्यांचे गणेशनगर मधील स्विमिंग टॅंकच्या पाठीमागे सराफी दुकान आहे. मंगळवार दि. १९ डिसेंबर रोजी शिंदे हे नेहमी प्रमाणे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास दुकानाच्या लोखंडी शटरच्या कुलुपाच्या पट्ट्या कापून दुकानात प्रवेश केला. दुकानातील काउंटर मध्ये ठेवलेले चांदीचे आणि ड्रॉव्हर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने असा एकूण ८५ हजारांचा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पलायन केले. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शिंदे हे दुकान उघडण्यासाठी गेले असता सदर चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

------------------------------

एसटी बस चालकाला किरकोळ कारणातून बेदम मारहाण : वानलेसवाडी मधील व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल. 

सांगली : मिरज - सांगली मार्गावर एसटी बस घेऊन येणाऱ्या एका एसटी चालकास एका कार चालकाने किरकोळ कारणातून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. सदर मारहाणीची घटना हि गुरुवार दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी चालक नितीन काशिनाथ माळी (वय ३२ रा. तुळजापूर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी अवधूत दुधाळ (रा. वानलेसवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, चालक नितीन माळी हे मिरज ते सांगली या मार्गावर एसटी बस (क्र. एमएच १४ बीटी ४७२३) हि घेऊन सांगलीकडे येत होते. विजयनगर चौक येथे ते आले असता एक ट्रॅक्टर चालक अचानक त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर बसच्या आडवे घेऊन आला. चालक माळी यांनी बस थांबवून ट्रॅक्टर चालकास तुम्ही व्यवस्थित ट्रॅक्टर चालावा असे सांगत असताना त्याठिकाणी सँट्रो कार चालक संशयित अवधूत दुधाळ हा त्याठिकाणी आला. त्याने माळी यांना ट्रॅक्टर चालकाची चुकी नाही. तुझीच चुकी आहे असे म्हणून ड्रायव्हर बाजूचा दरवाजा उघडून एसटी मध्ये घुसून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणला. घडलेल्या या घटनेनंतर बस चालक नितीन माळी यांनी वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित अवधूत दुधाळ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 







मद्यधुंद एसटी वाहकाचा भर चौकात धिंगाणा : विजयनगर चौकातील घटना. 

सांगली : शहरातील विजयनगर चौक येथे कर्त्यव्यावर असताना एका वाहकाने दारू पिऊन भर चौकात चांगलाच धिंगाणा घडला. रस्त्याकडेला थांबविलेल्या बसवर देखरेख करण्यास सांगितले असताना दारू पिऊन या वाहकाने दंगा केला. सदरचा प्रकार हा गुरुवार दि. २१ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी आगार व्यवस्थापक निसारअहमद नदाफ (वय ४५ रा. कवठेपिरान) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वाहक सचिन शिवाजी नावडे (वय ४० रा. तुळजापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, संशयित मद्यधूंद एसटी वाहक सचिन नावडे यांची तुळजापूर कोल्हापूर या मार्गावरील बस (क्र. एमएच १४ बीटी ४७२३) या एसटीवर सकाळी पाच ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत ड्युटी नेमली होती. सकाळी बस तुळजापूर मधून निघाली. दुपारी सांगलीतील विजयनगर चौकात बस आली असता बस मधील चालक आणि एका कार चालकाचा वाद झाला. या वादामध्ये बस रस्त्याकडेला उभी केली होती. दोन चालकांमधील वाद हा पोलीस ठाण्यात गेल्याने या बसची देखरेख करण्यासाठी वाहक सचिन नावडे यांना आदेश दिले होते. वाहक नावडे यांनी अति दारूचे सेवन करून मोठमोठ्यानं आरडाओरड करून चांगलाच धिंगाणा घातला. घडलेला प्रकार वरिष्ठांना समजताच आगार व्यवस्थापक निसारअहमद नदाफ यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वाहक सचिन नावडे यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले. 

----------------------------------

अंकलीतील शेतकऱ्याची फसवणूक : ट्रॅक्टरसह ट्रॉली घेऊन तरुणाने केले पलायन. 

सांगली : ट्रॅक्टर आणि ट्रॉली भाड्याने घेवून जावून त्याबदल्यात महिन्याला ३५ हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून मिरज तालुक्यातील अंकली येथील एका शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आली. याबाबत संजय धोंडीबा बामणे (रा. वज्रवाड, ता. जत ) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित संतोष पाडुरंग शिंदे (वय २३, रा. तोळबोळवाडी, पोस्ट - मुचंडी, ता. जत ) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मिरज तालुक्यातील अंकली येथे राहणाऱ्या संजय बामणे यांच्याकडे ट्रॅक्टर ट्रॉली आहे. संशयित संतोष शिंदे याने सदर ट्रॅक्टर आणि ट्रॉली रत्नागिरी येथे भाडयाने घेवून जातो. त्याबदल्यात ३५ हजार रुपये देण्याचे सांगितले होते. फिर्यादी संजय बामणे यांचा मुलगा एकनाथ यांच्याकडून दि. ८ ऑक्टोबर रोजी ट्रॅक्टर ट्रॉली संशयित घेवून गेला. परंतु महिन्याला सांगितल्याप्रमाणे पैसे दिले नाही. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला असता देखील संशयिताने टाळाटाळ केली. त्यामुळे संशयित संतोष शिंदे विरोधात पोलीस ठाण्यात संजय बामणे यांनी फसवणूकीची फिर्याद दाखल केली.  

----------------------------------

सांगलीत भरधाव कारची दुचाकीला धडक : अपघातात तरुणी गंभीर जखमी. 

सांगली : शहरातील तरुण भारत स्टेडियम जवळ दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणीला भरधाव कारने जोराची धडक दिली. या अपघातात तरुणी जखमी झाली. सदरचा अपघात हा शुक्रवार दि. ०१ डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी जखमी ऋतुजा शहाजी काळे (वय २३ रा. जयसिंगपूर) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋतुजा काळे या त्यांची दुचाकीवरून सांगलीतून जयसिंगपूरकडे त्यांच्या घरी निघाल्या होत्या. तरुण भारत स्टेडियम जवळ त्या आल्या असता पेट्रोल टाकण्यासाठी गाडी कडेला थांबवून उभ्या राहिल्या असता एक पांढऱ्या रंगाची कार भरधाव वेगात आली. त्या गाडीने माळी यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात ऋतुजा काळे या जखमी झाल्या. अपघातानंतर कार चालकाने गाडीसह पलायन केले. घडलेल्या अपघातानंतर ऋतुजा माळी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी