MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिनी विविध उपक्रम



सांगली : सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा 58 वा वाढदिवस रविवार दि. 31 डिसेंबरला विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा होणार आहे. 

पृथ्वीराज पाटील फौंडेशन व काँग्रेस कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन विविध उपक्रमांची जय्यत तयारी केली आहे. तर वसंत कॉलनीतील निवासस्थानी शुभेच्छा स्विकारतील, अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष बिपीन कदम यांनी दिली आहे.

 पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्यावतीने सकाळी सात वाजता राजवाडा चौक ते श्री गणपती मंदीर दरम्यान प्लॅगॉथॉन म्हणजे जॉगिंग करत कचरा बॅगेत भरुन बॅग जमा करणे हा ‘स्वच्छ सांगली, हेल्दी सांगली’ अंतर्गत उपक्रम होईल. महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते प्रारंभ होईल.

सांगली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात विविध ठिकाणी महाआरोग्य शिबीरे होतील. ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्मे व आधार काठी वाटप तसेच सांगली विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षासाठी कायम योगदान दिलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा काँग्रेस कमिटीतर्फे विविध प्रभागात सत्कार केला जाईल. 

बिसूरमध्ये पृथ्वीराज पाटील फौंडेशनतर्फे 60 किलो वजन गटाच्या कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सांगलीतील गव्हर्न्मेंट कॉलनी, स्फूर्ती चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, राममंदिर व कॉलेज कॉर्नर येथे ‘दारु नको- दूध प्या’ कार्यक्रम होईल. सांगली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील गावात डास प्रतिबंधक औषध फवारणी होईल. रक्तदान शिबीर आणि गरजूंना भोजन वाटप करण्यात येईल. सातत्याने सांगलीकरांच्या हितासाठी झटणारे पृथ्वीराज पाटील यांचा वाढदिवस अशा विविध समाजोपयोगी रचनात्मक उपक्रमातून साजरा करुन वाढदिवसाला सामाजिक बांधिलकी व मानवता मूल्यांची जोड दिल्याने सांगलीकरांनी या संकल्पनेचे जोरदार स्वागत केल्याचे पृथ्वीराज पाटील फौंडेशनचे अध्यक्ष बिपीन कदम यांनी सांगितले. 

बहुजन समाजातील गोरगरीब मुलांना वाटण्यासाठी दि. 31 डिसेंबर 2023 रोजी वाढदिवसानिमित्त वह्या देऊन शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन बिपीन कदम यांनी केले आहे.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी