SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्या कुपवाडमधील तरूणास अटक

स्वच्छ सांगली, हेल्दी सांगली मोहिमेला ‘प्लागॅथॉन’ने सुरवात
जनप्रवास । प्रतिनिधी
सांगली: ‘स्वच्छ सांगली, हेल्दी सांगली’ ही संकल्पना कृतीशील उपक्रमातून साकारण्याच्या मोहिमेला रविवारी ‘प्लॅगाथॉन’ने सुरवात झाली. गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल आणि पृथ्वीराज पाटील फौंडेशन यांच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सकाळी शहरातील प्रमुख पेठांतून स्वच्छतेसाठी एकजुटीने पाऊल उचलण्यात आले. त्यात विविध संस्था, संघटना सहभागी झाल्या. पृथ्वीराज पाटील यांनी सन 2024 मध्ये वर्षभर सांगली पंचक्रोशीचे आणि सांगलीकरांचे आरोग्य या विषयावर प्राधान्याने कामाचा निश्चिय केला आहे. त्यात शुद्ध पाण्यासह सामाजिक आणि व्यक्तीगत आरोग्यासाठी सांगलीकरांच्या हातात हात गुंफून काम केले जाणार आहे. त्याची सुरवात सकाळी चालण्याचा व्यायाम करत करत कचरा वेचणे आणि तो एकत्रित करणे, या स्वरुपात म्हणजेच प्लॅगाथॉनने झाली.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘स्वच्छता ही एक दिवसाची प्रक्रिया नाही. ती सवय बनली पाहिजे. त्यासाठी व्यापक कार्यक्रम घेवून आम्ही तळागाळात पोहचत आहोत. जनतेचे सामुदायिक पाठबळ मला हवे आहे. सांगलीसाठी स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे हाही संकल्प आम्ही केला आहे. पृथ्वीराज पाटील यांनी प्लागॅथॉन स्वच्छता अभियानास झेंडा दाखवला. राजवाडा चौकातून मोहिम सुरु झाली. कचरा उठावासाठी झाडू, प्लॅस्टिक बुट्ट्या व मोठ्या पिशव्या, ग्लोज व मास्क देण्यात आले. शनिवार बाजारातील कचर्याचे मोठ्या प्रमणात संकलन करण्यात आले. राजवाडा चौकापासून गणपती मंदिरापर्यंत स्वच्छता झाली. कचरा महापालिकेने नेला.
भाग्योदय सोसायटी, स्टेट बँक हौसिंग सोसायटी अभयनगर, श्रीराम हौसिंग सोसायटी शिंदे मळा, सह्याद्री प्राईड सोसायटी यांना ‘स्वच्छ सोसायटी’ म्हणून गौरवण्यात आले. श्री गणरायाची आरती झाली. पृथ्वीराज पाटील फौंडेशनचे अध्यक्ष बिपीन कदम यांनी आभार मानले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा