MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

विश्रामबाग मध्ये भरदिवसा चेन स्नॅचिंग :

 महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्यांचे दागिने हिसडा मारून केले लंपास. 


सांगली : विश्रामबाग परिसरातील पार्श्वनाथ कॉलनी मध्ये भरदिवसा महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्यांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केले. सदर चेन स्नॅचिंगची घटना हि आज मंगळवार दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी संजीवनी दिलीप हुक्कीरे (वय ५३ रा. सांगली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, संजीवनी हुक्कीरे या आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील धामणी रोडवरील पार्श्वनाथ कॉलनी मध्ये राहतात. आज मंगळवार दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी त्या कामानिमित्त दुचाकीवरून बाहेर गेल्या होत्या. सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्या घरी परत आल्या. घरासमोर त्यांची गाडी लावत असताना दुचाकीवरून दोन अज्ञात व्यक्ती आले. हुक्कीरे यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ आले असता त्यांनी संजीवनी हुक्कीरे यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण हिसडा मारून पलायन केले. संजीवनी हुक्कीरे यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला पण चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. घडलेल्या या घटनेनंतर संजीवनी हुक्कीरे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या चेन स्नॅचिंगच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती. 


माहेरून व्यवसायासाठी गाडी आणण्यासाठी विवाहितेचा छळ : पती, सासू, सासऱ्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल. 


सांगली : स्वतंत्र व्यवसायासाठी चारचाकी गाडी घेण्यासाठी तुझ्या वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन ये असे म्हणून विवाहितेचा छळ केल्याची घटना उघडकीस आली. सदरचा प्रकार हा दि. ३० डिसेंबर २०१८ ते १९ डिसेंबर २०२३ या कालावधीत वाळवा तालुक्यातील कामेरी येथे घडली. या प्रकरणी पीडित महिलेने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी छळ केल्या प्रकरणी पती, सासू, सासऱ्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

पती वैभव प्रकाश पाटील, सासू भाग्यश्री प्रकाश पाटील, सासरे प्रकाश भगवंतराव पाटील, नणंद शीतल प्रकाश पाटील (सर्व रा. कामेरी), नणंद मीनल आणि तिचे पती अजित सर्जेराव सांगले-पाटील (रा. कोडोली ता. पन्हाळा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, पीडित महिलेचे माहेर हे मिरज तालुक्यातील पश्चिम भागातील गाव आहे. पीडित महिलेचा विवाह हा वाळवा तालुक्यातील कामेरी येथे राहणाऱ्या वैभव पाटील यांच्याशी २०१८ साली विवाह झाला. संशयित पती वैभव पाटील यांनी लग्नानंतर पीडित महिलेला मला स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करायचा आहे. त्यासाठी मला चारचाकी कार घेण्यासाठी तुझ्या वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन ये असे म्हणून वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. तसेच वारंवार दारू पिऊन येऊन शिवीगाळ आणि मारहाण करत होते. माहेरून पैसे आणले नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी संशयित सहाजण देत होते. पैसे आणण्यास नकार दिला असता संशयितांनी एक वर्षांपूर्वी पीडित महिलेला आणि मुलाला घराबाहेर काढले. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडितेने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती, सासू, सासऱ्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी