MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

सांगलीतून दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद

: दोन लाखाच्या सहा दुचाकी हस्तगत : स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई. 


गेल्या सहा महिन्यात शहरासह जिल्ह्यातून सहाशेहून अधिक दुचाकी चोरीला गेल्याचे वृत्त दैनिक जनप्रवासने प्रकाशित करताच पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. शहरातील विश्रामबागसह अन्य ठिकाणाहून लंपास केलेल्या दुचाकींची विक्री करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले. तानंग फाट्यानजीक असणाऱ्या पुलाजवळ मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. संतोष मारुती हाके (वय १९, रा. बागेवाडी, ता. जत, जि. सांगली ) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २ लाख १० हजारच्या सहा दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या.





मागील काही महिन्यांपासून शहरासह जिल्ह्यात देखील दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरट्यास पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गस्त वाढविली आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक पंकज पवार यांच्या पथकातील कर्मचारी विनायक सुतार यांना चोरीच्या दुचाकींची विक्री करण्यासाठी चोरटा तानंग फाट्यानजीक असणाऱ्या पुल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला. काही वेळाने तेथे एक युवक दुचाकीवरुन येवून थांबला. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यास हटकले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यास पकडून त्याची चौकशी केली असता त्याने, आपण चोरीची दुचाकी विकण्यासाठी आल्याचे कबुल केले. आरोपी संतोष हाके याचा साथीदार महंमद शेख (रा. सांगली ) यास सांगली पोलिसांनी दुचाकी चोरीप्रकरणी मंगळवारी अटक केली असून त्याच्याकडून पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पोलीस चौकशीत आरोपी संतोष हाके याने महंमद शेख याने चोरीच्या सहा दुचाकी विक्री करण्यासाठी दिल्याचे सांगितले. अन्य पाच दुचाकी त्याने राहते घराजवळ लावल्या असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घराजवळील चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. दुचाकी चोरीचे गुन्हे विश्रामबाग आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आले आहेत. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस कर्मचाारी अरुण पाटील, कुबेर खोत, प्रकाश पाटील, अभिजीत ठाणेकर, रोहन घस्ते यांच्या पथकाने केली. 








सांगलीतील लॉज मधून प्रवाशाच्या दागिन्यांसह ६० हजारांचा मुद्देमाल लंपास : पुण्यातील व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल.

सांगली : शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात असणाऱ्या लक्ष्मी लॉजिंग मधून एका परप्रांतीय प्रवाशाचे मौल्यवान मोती पाळे आणि राशीचे खाडे असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सदर चोरीची घटना हि मंगळवार दि. १९ डिसेंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी बीररत्नया नागमुनय्या बोजा (वय ७० रा. आंध्रप्रदेश) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित संतोष एस सदरे (रा. केशवनगर, मुंडवा, पुणे) या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, बीररत्नया बोजा हे मूळचे आंध्रप्रदेश मधील कोटला गावचे रहिवाशी आहेत. मंगळवार दि. १९ डिसेंबर रोजी ते कामानिमित्त सांगलीमध्ये आले होते. बस स्थानक परिसरात असणाऱ्या लक्ष्मी लॉज मध्ये ते वास्तव्यास होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास संशयित संतोष सदरे याने बीररत्नया बोजा यांच्या रूम मध्ये घुसून त्यांच्याकडे असलेले मौल्यवान मोती पाळे आणि राशीचे खाडे असा एकूण ६० हजार रुपयांचे दागिने घेऊन पलायन केले. काही वेळात चोरीची घटना निदर्शनास येताच बीररत्नया बोजा यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेची माहिती घेऊन चोरी करणाऱ्या पुण्यातील संशयित संतोष सदरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

---------------------------

कार घेऊन एकाने फसवणूक करून केले पलायन : तरुणाविरोधात गुन्हा दाखल.

सांगली : शहरातील चांदणी चौक येथे राहणाऱ्या एका व्यक्तीची कार विट्याला जाऊन येतो असे सांगून एका तरुणाने घेऊन गेला तो परत आलाच नाही. सदर फसवणुकीची घटना हि दि. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी विनायक मनोहर माळी (वय ४३ रा. चांदणी चौक, सांगली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी इरफान अब्दुलकादर सय्यद (वय २५ रा. गोकाक, बेळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विनायक माळी हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील चांदणी चौक येथे राहतात. त्यांच्या मालकीची मारुती स्विफ्ट कार (क्र. एमएच १४ एएम २६३६) आहे. माळी यांच्या ओळखीचा संशयित सय्यद हा दि. २२ नोव्हेंबर रोजी त्यांच्याकडे आला. मला विटा येथे जायचे आहे असे सांगून त्यांची मारुती कार घेऊन गेला. संशयित इरफान सय्यद याने एक महिना उलटत आला तरी कार परत घेऊन आलाच नाही. त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच विनायक माळी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सय्यद विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

------------------------------

सांगलीत जुगार घेणाऱ्या तरुणावर पोलिसांची कारवाई : जुगाराचे साहित्य केले जप्त. 

सांगली : शहरातील शास्त्री उद्यानच्या आडोशाला विनापरवाना लोकांकडून पैसे घेऊन जुगार घेणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली. मलिक असिफ बलबंड (वय २९ रा. खणभाग, सांगली) असे कारवाई केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ५६५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी कॉन्स्टेबल सुमित हणमंत सूर्यवंशी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल सुमित सूर्यवंशी हे मंगळवार दि. १९ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बस स्थानक परिसरात असणाऱ्या शास्त्री उद्यान जवळ पेट्रोलिंग करत होते. यावेळी संशयित मलिक बलबंड हा लोकांकडून पैसे घेऊन जुगार घेत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्याला रंगेहात पकडून त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली. 

------------------------------

मुलाला दारूचे व्यसन लावल्याच्या रागातून तरुणाच्या घरासमोर राडा : पाच जणांविरोधात गुन्हा दाखल.

सांगली : सांगलीवाडी येथील भरती विद्यापीठ समोर मुलाला दारूचे व्यसन लावल्याने तो गाडीवरून पडल्याचा आरोप करत एका कुटुंबाने तरुणाच्या घरासमोर जोरदार राडा केला. सदरचा प्रकार हा रविवार दि. १७ डिसेंबर रोजी रात्री पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी सुहास प्रकाश मोहिते (वय ३५) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित प्रदीप आकाराम मोहिते, जालिंदर आकाराम मोहिते, रवींद्र आकाराम मोहिते, अर्चना प्रदीप मोहिते आणि एक अनोळखी अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सुहास मोहिते हे घरी असताना संशयित सर्वजण रात्री पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराबाहेर आले. लोखंडी गज आणि काठ्यांनी घराच्या गेटवर मारून जीवे मारण्याची धमकी देत निघून गेल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी