MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

सोन्याच्या दागिन्यांसह एक लाखांचा मुद्देमाल जप्त.


 सोन्याच्या दागिन्यांसह एक लाखांचा मुद्देमाल जप्त. 


सांगली : आरग येथील रेल्वे स्टेशन रोडवर एका वृद्धाला पोलीस असल्याचे सांगून लुटणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या चोरट्याकडून चोरीतील सोन्याची चेन, अंगठीसह १ लाख ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शहरातील चिन्मय पार्क जवळ सदरची कारवाई केली. आबूतालिफ मुसा इराणी (वय २८ रा. किर्लोस्करवाडी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
 

याबाबत अधिक माहिती अशी कि, मिरज तालुक्यातील आरग येथे राहणारे अण्णासो गायकवाड हे दि. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गावातून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर चालत निघाले होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने आपण पोलीस असल्याचे सांगून गायकवाड यांना लुटले होते. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली होती. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी जिल्ह्यातील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी हेडकॉन्स्टेबल सागर लवटे यांना माहिती मिळाली कि, संशयित आबूतालिफ इराणी हा चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी चिन्मय पार्क परिसरात येणार आहे. मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी सापळा लावला असता इराणी हा संशयितरित्या थांबलेला दिसला. यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याजवळ एक सोन्याची चेन, अंगठी मिळाली. सदर मुद्देमालाबाबत चौकशी केली असता त्याने सांगितले कि, एक महिन्यापूर्वी आरग येथे एका वृद्धाला पोलीस असल्याचे सांगून त्याच्याकडील दागिने काढून घेतले होते. ते हेच दागिने असल्याचे सांगितले. यावेळी त्याच्याकडून १ लाख ४०० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करून त्याला अटक करण्यात आली. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, हेडकॉन्स्टेबल बिरोबा नरळे, सागर लवटे, नागेश खरात, संदीप गुरव, अमर नरळे, अनिल कोळेकर, विक्रम खोत यांच्या पथकाने केली. 

----------------------------------------

मोटारसायकल चोरणाऱ्या सराईत चोरट्यास केले जेरबंद : पाच दुचाकींसह घरफोडी, चोरीचे सात गुन्हे उघड : २ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त.


सांगली : शहरातील विविध परिसरातून मोटारसायकल चोरणाऱ्या तसेच घरफोडी आणि चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या चोरट्याकडून मोटारसायकल चोरीचे पाच गुन्हे, घरफोडी आणि चोरीचे एक असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले असून २ लाख ५५ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शामरावनगर मध्ये सदरची कारवाई केली. या प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार महंमद अब्दुलगनी शेख (वय २० रा. शामरावनगर) याला अटक केली आहे. 



 


सांगलीसह शहरातील विविध परिसरातून दिवसाढवळ्या मोटारसायकल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी कॉन्स्टेबल संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, रेकॉर्डवरील आरोपी महंमद शेख हा चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी शामरावनगर मधील झुलेलाल मंदिर जवळ येणार आहे. मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी सापळा लावून शेख यास ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्या जवळ असणारी दुचाकी हि त्याने एसएफसी मॉल जवळून दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी चोरल्याचे सांगितले. यावेळी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने आणखी चार दुचाकी आणि घरफोडी, चोरी केल्याचे सांगितले. यावेळी त्याच्याकडून पाच दुचाकी आणि चोरीतील मुद्देमाल असा एकूण २ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई, पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख, उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, विनायक शिंदे, सचिन शिंदे, संतोष गळवे, गुंडोपंत दोरकर, गौतम कांबळे, योगेश सटाले, गणेश कांबळे यांच्या पथकाने केली. संशयित महंमद शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी व्यक्त केली.

-----------------------------------------

विश्रामबाग मध्ये भरदिवसा डॉक्टरांचा बंगला फोडला : ७ लाख २१ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास. 

सांगली : विश्रामबाग परिसरातील पद्मावतीनगर येथे असणारा डॉक्टरांचा बंद बंगला फोडून चोरटयांनी घरफोडी केली. चोरटयांनी घरातील बेडरूम मध्ये असणाऱ्या कपाटातील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह ७ लाख २१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सदर घरफोडीची घटना हि शनिवार दि. १६ डिसेंबर ते सोमवार दि. १८ डिसेंबर या कालावधीत घडली. या प्रकरणी मृदुला हरिभाऊ साळुंखे (वय ५७ रा. नेमीनाथनगर, सांगली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, मृदुला यांचे भाऊ डॉ. वैभव पांडुरंग माने यांची पॅथॉलॉजी लॅब आहे. वैभव यांची पत्नी डॉ. माधुरी माने यांचा खणभाग मध्ये दवाखाना आहे. माने कुटुंबीय हे विश्रामबाग परिसरातील पद्मावतीनगर मध्ये असणाऱ्या ओम गोविंद बंगल्यात राहतात. शनिवार दि . १६ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास डॉ, वैभव माने हे कुटुंबियांसह परराज्यात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी अज्ञात चोरटयांनी बंद बंगल्यावर पाळत ठेऊन बंगल्याच्या पाठीमागे असणाऱ्या खिडकीचे ग्रील तोडून बंगल्यात प्रवेश केला. घराच्या वरील मजल्यावर असणाऱ्या पहिल्या बेडरूम मध्ये प्रवेश करून लाकडी कपाटामध्ये ठेवलेले सहा चांदीची ताटे, १२ चांदीच्या वाट्या, सहा चांदीचे चमचे, एक चांदीची समई, १ चांदीचा दिवा आणि चार चांदीचे निरंजन अशी एकूण आठ किलो चांदी, १ लाख ५० हजार रुपये किमतीच्या पाच तोळे वजनाच्या तीन बांगड्या, १८ हजारांची सोन्याची चेन, १ लाख ८० हजार रुपये किमतीचा सहा तोळ्यांचा सोन्याचा नेकलेस, ७५ हजार रुपये किमतीचे २५ ग्रॅम वजनाचे कानातील जोड, १८ हजारांची सोन्याची एक अंगठी असा एकूण ७ लाख २१ हजारांचा मुद्देमाल चोरून पलायन केले. माने यांच्या घरात काम करणाऱ्या कामगाराच्या निदर्शनास सदर चोरीचा प्रकार आला. त्याने माने यांना फोन वरून माहिती दिल्यानंतर त्यांनी मृदुला साळुंखे यांना सांगितले. साळुंखे यांनी पोलिसांसह जाऊन पाहिले असता घरफोडीचा प्रकार निदर्शनास आला. यानंतर मृदुला साळुंखे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

-------------------------------------------

सांगलीत किरकोळ कारणातून दोघांना लोखंडी सळईने मारहाण : तिघांवर गुन्हा दाखल. 

सांगली : शहरातील ५० फुटी रोडवर रस्त्यावर भांडू नका असे म्हणाल्याचे किरकोळ कारणातून दोघांना लोखंडी सळई, दगडाने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. सदरचा प्रकार हा रविवार दि. १७ डिसेंबर रोजी रात्री पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी जखमी सरफराज मेहबूब मुल्ला (वय २७) याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित शहाजान (पूर्ण नाव नाही), मारिया आणि बिट्टू पठाण या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सरफराज मेहबूब मुल्ला हा आपल्या कुटुंबियांसह पाकिजा मस्जिद जवळील ५० फुटी रोड परिसरात राहतो. रविवार दि. १७ डिसेंबर रोजी शहाजान आणि मारिया हे दोघेजण रस्त्यावर भांडत होते. यावेळी सरफराज मुल्ला आणि सलमान पखाली यांनी दोघांना रस्त्यात भांडू नका, बाजूला जावा असे म्हणाल्याचा राग मनात धरून मारिया हिच्या ओळखीचा व्यक्ती बिट्टू पठाण याने त्याच्या हातातील सळईने डोक्यात मारून जखमी केले. त्याचबरोबर शहाजहान याने फिर्यादीच्या हातावर मारून जखमी केले. मारिया हिने दगडाने मारहाण करत जखमी केले. घडलेल्या या घटनेनंतर सरफराज मुल्ला याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

-----------------------------------------

कार रिव्हर्स घेताना वृद्धाला दिली धडक : अपघातात वृद्ध गंभीर जखमी. 

सांगली : शहरातील रतनशीनगर मध्ये एका वृद्धेला सोडून जात असताना गाडी रिव्हर्स घेताना कारची धडक बसून अपघात झाला. या अपघातात प्रभावती रमेशचंद्र वाघेला (वय ७०) या गंभीर जखमी झाल्या. सदरचा अपघात हा बुधवार दि. ०६ डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी राजेश रामचंद्र वाघेला (वय ५१) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चालक जैनम विष्णू पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बुधवार दि. ०६ रोजी जखमी प्रभावती वाघेला या रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास संशयित जैनम पटेल यांच्या कार (क्र. एमएच ११ व्ही ५०५०) मधून त्यांच्या घरी रतनशीनगर मध्ये आल्या. यावेळी प्रभावती या गाडीतून खाली उतरून घरी येत असताना चालक जैनम पटेल यांनी अचानक गाडी रिव्हर्स घेतल्याने कार प्रभावती यांना धडकली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी प्रभावती यांचा मुलगा राजेश वाघेला यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी