MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

उदगाव कुंजवन भगवान आनंद महोत्सव सोहळ्यास प्रारंभ

 

उदगाव कुंजवन भगवान आनंद महोत्सव सोहळ्यास प्रारंभ 

 उदगाव (ता.शिरोळ) कुंजवन येथील आदि - संन्मती समाधी तीर्थक्षेत्रावर भगवान आनंद महोत्सव सोहळ्यास भव्य सवाद्य मिरवणूक व ध्वजारोहणाने दिमाकदार सोहळ्यात प्रारंभ झाला. याप्रसंगी अंतर्मना आचार्य श्री प्रसन्नसागर महाराज व मुनीश्री पियूषसागर महाराज यांच्या ससंघ सानिध्यात विविध धार्मिक विधी संपन्न झाले.


उदगाव कुंजवन भगवान आनंद महोत्सव सोहळ्यास प्रारंभ  


सकाळी कुंजवन येथून गावांमधील  भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर व मुख्य मार्गावरून भगवंतांची भव्यकलश मिरवणूक काढण्यात आली. या हत्ती, घोडे, बँडपथक, महिलांचे ढोल पथक, रथ यांच्यासह 108 सौभाग्यवती महिला, 56 कुमारिका डोक्यावर मंगलकलश घेऊन सहभागी झाल्या होत्या.

त्यानंतर विधीवत ध्वजारोहण व मंडप शुद्धीकरण करून भगवंतांची मूर्ती मंडपात ठेवण्यात आली. ध्वजारोहण प्रवीण - विशाल जैन कासलीवाल हल्दीवाला परिवार नांदेड यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आले. यावेळी पंडित प्रदीप मधुर यांनी मंत्रविधी केली. सुशोभिकरण व नूतनीकरण करण्यात आलेल्या मूलनायक भगवान महावीर गर्भगृहाचा लोकार्पण सोहळा तसेच पंचामृत अभिषेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.







यावेळी प्रवचनात आचार्य श्री 108 प्रसन्नसागर महाराज म्हणाले, मानवी जीवन चक्र हे विविध प्रकारच्या मनाच्या विकाराने ग्रस्त आहे. मन:शांती हरवून बसलेल्या मानवी मनाचे जर का शुद्धीकरण करायचं असेल तर धर्म आश्रय शिवाय पर्याय नाही. जेव्हा आपण धर्माचा आश्रय घेतो तेव्हा आपल्या विचारांमध्ये आणि अभिव्यक्तीमध्ये बदल होऊन जीवनाच्या उत्कर्षाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो. 

सायंकाळी अंतर्मना आचार्य श्री प्रसन्न सागरजी महाराज यांचे प्रवचन, आनंद यात्रा तसेच मंगल आरती, सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. आकाश जैन, मनीष जैन, प्रदीप जैन, नितेश पाटनी, सनी कासलीवाल, शैलेश पहाड़िया, दर्पण जैन, निमेष जैन तसेच मंदिर कमिटी, सन्मति ग्रुप, महिला मंडल यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. याप्रसंगी अंतर्मना आचार्य श्रींचे देशभरातील अनेक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी