MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

विलासराव जगताप, संग्रामसिंह, अमरसिंह देखमुखांवर अजितदादांचा डोळा









दादा गटाकडून संपर्क, जिल्ह्यातील नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष 


अनिल कदम, जनप्रवास

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार आणि अजितदादा या दोन गटांकडून पदाधिकारी खेचले जात आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह जिल्ह्यात चार आमदार असून त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहिले आहेत. महापालिका क्षेत्रातील एक गट वगळता अजित पवारांच्या संपर्कात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या जुन्या मंडळींना साद घालायला सुरुवात केली आहे. जत मधील भाजपचे नेते व माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आटपाडीचे अमरसिंह देशमुख यांना सोबत येण्याचे निमंत्रण दिले जात आहे. भाजप, शिवसेना आणि अजित दादा गट एकत्र असल्याने हे तिन्ही नेते अजितदादांच्या गटात सामील होणार का याविषयी राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या अजितदादांनी शरद पवारांविरोधात बंड करून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यानंतर थेट महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री बनल्याने महाराष्ट्रातील जनतेला धक्का बसला असला तरी पक्षातील 33 आमदार अजितदादांसोबत गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काका पुतण्याच्या वादात पक्षाचे लोकप्रतिनिधी आपापला विठ्ठल निवडत असल्याचे चित्र दिसून येते. 

जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तीन विधानसभेचे आणि एक विधान परिषदेच्या आमदाराचा समावेश असून या सर्वांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असल्याचे स्पष्ट झाले. साहेब गटातील एकही आमदार अजितदादांची साथ द्यायला तयार नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांची साथ सोडून दिली. अजितदादांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या जुन्या मंडळींशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.   ग्रामीण भागात अजितदादांचा गट विस्तारण्याचा विचार आहे, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील माजी आमदार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर काम केलेल्या दिग्गज नेत्यांना निमंत्रित केले जात आहे. 

जत तालुक्यातील भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांचे अजित पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत. जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आघाडी सरकारच्या काळात आमदार नसतानाही अजितदादांनी जत तालुक्याच्या विकासकामांसाठी मदत केली आहे. माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील यांचे अंत्यंत विश्वासू विलासराव जगताप होते, त्यामुळे अजितदादांचा अनेक वर्षापासून जगतापांशी संपर्क आहे. जगताप हे पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री पदी अजितदादांची निवड झाल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत भेटणार आहेत. 

पलूस-कडेगाव तालुक्यातील भाजपचे नेते संग्रामसिंह देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या काळात राज्यभर कामाचा ठसा उमटवला होता. अध्यक्षपदानंतर भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्रामसिंह यांना उमेदवारी दिली होती. तेथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी विकासकामे आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलेले नाही. भाजप सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून पलूस-कडेगाव मतदारसंघात कामांचा सिलसिला सुरु आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे चुलत बंधू आहेत, त्यांच्याबरोबर राहून तालुक्यातील कार्यकर्त्यांचे प्रश्न मार्गी लावत आहेत. देशमुख यांचा सातारा जिल्ह्यात गोपुज हा खासगी साखर कारखाना आहे, या कारखान्यास वेळोवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदत केल्याची चर्चा आहे. याशिवाय देशमुख राष्ट्रवादीत असताना संग्रामसिंह यांच्याकडे सातत्याने लक्ष देवून विचारपूस करीत होते. या कारणांमुळे अजितदादांचा संग्रामसिंह यांच्यावर डोळा असल्याचे दिसते. 

खानापूर-आटपाडीचे भाजप नेते अमरसिंह देशमुख यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. राष्ट्रवादी काँगे्रेसमधून देशमुख हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार होते. दुष्काळी आटपाडी तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता. त्यामुळे देशमुख यांचे कृष्णा नदीतून आटपाडी पाणी योजना योजना सुरु करण्याचे स्वप्न होते. या काळात अजितदादांकडे अर्थमंत्रीपद होते, त्यांनी अमरसिंह यांच्या आटपाडी पाणी योजनेसाठी पहिल्या टप्प्यात 96 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन दिला होता. त्यानंतर प्रत्यक्ष पाणी योजनेला सुरुवात झाली होती. याशिवाय सहकारी आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांचे काम उठावदार आहे. तरुण नेत्यांमध्ये सहकार क्षेत्रातील अभ्यासू नेता म्हणून अमरसिंह यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे अमरसिंह यांच्यासाठी अजितदादा गट आग्रही असल्याची चर्चा आहे. 

सांगली महापालिका क्षेत्रातील एक गट अजित पवारांच्या संपर्कात आहे, त्यांच्याकडून भेटीगाठी सुरु आहेत. परंतु दादा गटाच्या अन्य नेत्यांकडून जिल्ह्यातील मंडळीशी संवाद साधला जात आहे. जतचे माजी आमदार जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आटपाडीचे अमरसिंह देशमुख यांच्यासोबत अजितदादा गटाचे बोलणे सुरु आहे. मात्र भाजप, शिवसेना आणि अजित दादा गट एकत्र आहेत. त्यामुळे अद्यापही संबंधित नेत्यांनी अजिदादांसोबत जाण्याबाबतची भूमिका स्पष्ट केलेली नाही. 

माजी आ. सदाशिव पाटील लवकरच भूमिका स्पष्ट करणार 

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रसमध्ये फूट पडली. अनेक जिल्ह्यात कार्यकर्ते दोन्ही गटाकडे जात आहेत. परंतु सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे चार आमदार शरद पवार यांच्यासोबत आहेत. मात्र राष्ट्रवादीचे नेते व खानापूर-आटपाडीचे माजी आमदार सदाशिव पाटील यांच्याशी अजित पवार गटांकडून संपर्क साधण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेच्या काळात राष्ट्रवादीकडून पाटील यांना कोणतीही संधी मिळाली नाही. काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये जावूनही ते दुर्लक्षित राहिले. त्यामुळे माजी आ. पाटील हे नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. या कारणांमुळे अजितदादा गटांसोबत जाण्याची भूमिका लवकरच स्पष्ट केली जाईल, अशी चर्चा आहे.  


टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी