SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्या कुपवाडमधील तरूणास अटक

तासगाव नगरपालिकेत चमत्कार घडवून सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी चालविली आहे. पक्षात अनेक इच्छुकांची देखील भाऊगर्दी झाली आहे. मात्र पालिकेत सत्तेत येण्याच्या आशेवर असलेल्या नेत्यांची राष्ट्रवादीची सगळी भिस्त युवा नेते रोहित पाटील यांच्यावरच आहे. सत्तेत येण्याआधी भाजप नेत्यांसोबत साटेलोटेच्या चर्चा थांबवत कार्यकर्त्यांना तयार करावे लागेल.
सत्तेत येण्यासाठी सर्वच पक्षांनी ताकत लावली आहे. नेत्यांकडून उमेदवारीची जुळवाजुळव सुरू केली आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला नेतृत्व नसल्याचे चित्र होते. शहरातील प्रस्थापित म्हणून असलेल्या कारभार्यांनी कातडी बचाव धोरण स्वीकारून रिंगणातून पळ काढला. मात्र नवख्या उमेदवारांसह कसेबसे लढण्याची वेळ त्यांच्यावर आली. मात्र त्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचे आठ उमेदवार विजयी झाले.
नगराध्यक्ष पदाचा उमेदवार काठावर पराभूत झाला. पाच वर्षापूर्वी पराभूत मानसिकतेने निवडणूक लढवली गेली होती. मात्र, स्वर्गीय आर.आर.पाटील यांची पुण्याई मतदानातून दिसून आली. राष्ट्रवादीची व्होट बँक भक्कम असल्याचे स्पष्ट होऊन देखील गेल्या पाच वर्षात शहरात ठोस कामगिरी दिसून आली नाही. आठ नगरसेवक असून, देखील कोणताच प्रभाव दिसला नाही.
हेही वाचा
केवळ स्टंटबाजीच्या पलीकडे नगरसेवक गेले नाहीत, असा आरोप होत असतानाच राष्ट्रवादीच्या कारभार्यांवरदेखील आरोप होत राहिले त्यामुळे नगरपालिका निवडणुकीची सर्व भिस्त रोहित पाटील यांच्यावरच राहणार आहे.
रोहित पाटील यांच्यामुळे कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत सत्तेत येण्याचा चमत्कार झाला. तशीच पुनरावृत्ती तासगाव पालिकेतही दिसून येईल अशी आशा राष्ट्रवादीला आहे. त्यामुळे जुन्या नव्याची भाऊगर्दी झाली आहे. मात्र कवठेमहांकाळची समीकरणे तासगावला लागू पडणारी नाहीत. तासगाव शहरासह तालुक्यात काही वर्षापासून अंजनी आणि चिंचणीच्या अंडरस्टॅडिंगची चर्चा सातत्याने होत आहे. ही चर्चा राष्ट्रवादीला अडचणीची ठरणारी आहे. रोहित पाटील यांना ही चर्चा मोडीत काढावी लागणार आहे. त्यानंतरच पुढची वाटचाल सुकर होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा