MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

जयंतरावांची जिल्ह्यातच अस्तित्वाची लढाई




 जयंतरावांची जिल्ह्यातच अस्तित्वाची लढाई

महाविकास आघाडी मजबुतीची मदार : जिल्हा परिषद, पंचायत समितीची ‘लिटमस टेस्ट’

 अमृत चौगुले, जनप्रवास


राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्याची प्रदेशाध्यक्ष म्हणून एकीकडे नव्याने बांधणीचे शिवधनुष्य पेलताना जयंत पाटील यांना जिल्ह्यात मात्र अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. त्याची जणू आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक लिटमस टेस्टच ठरणार आहे. आतापर्यंत करेक्ट कार्यक्रम करण्यात माहीर असलेल्या जयंतरावांना टप्प्यात येण्यापूर्वीच घरच्या मैदानात आऊट करण्याची फिल्डिंग लागणार हे उघड आहे. त्यामुळे आता राज्यापेक्षाही जिल्ह्यात राष्ट्रवादीला फुटीपासून रोखण्याबरोबरच महाविकास आघाडीच्या घटकपक्षांना एकसंध ठेवण्यासाठी त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

सन 1999 मध्ये काँग्रेस फुटीनंतर जिल्ह्यात काँग्रेसला तुल्यबळ राष्ट्रवादी बळकट होती व आजही आहे. अर्थात स्व.वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांच्या पश्चात काँग्रेसची धुरा स्व.पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख, स्व.मदनभाऊ पाटील यांनी सांभाळली होती, तर राष्ट्रवादीची जयंत पाटील, स्व.आर. आर.पाटील यांनी सांभाळली होती. पुढे दोन्ही काँग्रेसमधून पक्षांतर्गत आणि एकमेकांविरोधातही जिरवाजिरवीच्या राजकीय चिखलात भाजपचे कमळ फुलत राहिले. विशेषत: यात प्रामुख्याने जयंत पाटील यांच्या ‘जेजेपी’ पॅटर्नचा बोलबाला होता हे सांगणे न लगे.

काँग्रेसला महापालिकेत नामोहरम करण्यासाठी 2008 मध्ये झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग असो, त्याचवेळी लोकसभेला झालेला अजितराव घोरपडे यांच्यारूपाने झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग, यात जयंतरावांचा रोल होता हे स्पष्ट आहे. पुढे 2014 मध्ये लोकसभेला राज्यात आणि विशेषत: जिल्ह्यात बाहुबल कुणाचे मिळाले हेही उघड आहे. त्यातूनच राष्ट्रवादीचे पूवार्र्श्रमीचे आमदार संजय पाटील यांच्या रूपाने लोकसभेचा पहिल्यांदा बालेकिल्ला नेस्तनाबूत झाला. राष्ट्रवादीतून गेलेले माजी आमदार भाजपवासी झाले, याचेही अप्रत्यक्ष श्रेय त्यांनाच जाते. पुढे त्यातूनच पोषण मिळालेल्या भाजपला जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही पाय रोवता आले.

गेल्या 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने कमबॅक केले. त्याच्यासह मानसिंगराव नाईक, सुमनताई पाटील यांच्यारूपाने तीन आमदार झाले. पदवीधर पुणे मतदार संघातूनही राष्ट्रवादीचे अरुणअण्णा लाड यांच्यारूपाने आमदार झाले. जिल्ह्यात राष्ट्रवादी मजबूत होऊ लागली. 

उलट काँग्रेसलाच घरघर लागून लोकसभेचा सांगली बालेकिल्ला गमावला. एकमेव पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ अबाधित राहिला आहे, तर जतचा गेलेला मतदारसंघ विक्रम सावंत यांच्यारूपाने परत मिळाला आहे. 

दरम्यान, गेल्या 5 वर्षांत प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आल्यापासून तर जयंत पाटील यांनी जेजेपीची भूमिका गुंडाळून चोख भूमिका बजावत भाजपला अंतर दिले. त्यांतर महाविकास आघाडीच्या रूपाने सत्तेत आल्यावर महापालिकेतही 15 सदस्यांद्वारे चमत्कारिकरित्या महापौरपदही पटकावले. स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही अस्तित्व टिकवून होते. महाविकास आघाडीच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीवरही एकहाती सत्ता काबिज करीत भाजपचा अश्वमेध रोखला होता. 

हेही वाचा

दरम्यान, देशात, राज्यात भाजप मजबूत असला तरी जिल्ह्यात सत्तेत असूनही भाजपमध्येही तसे काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल, अशी अपेक्षा होती. लोकसभा निवडणूक याची नांदी आहे. परंतु आठवड्याभरापूर्वी राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्यासह बहुसंख्य आमदार फुटीने राज्याच्या राजकारणालाच कलाटणी मिळाली. यात प्रामुख्याने अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदासह 9 मंत्रीपदे पटकावून सत्तेची कास धरलीच, सोबत पक्षावरही दावा सांगितला आहे. एवढेच नव्हे तर जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत शरद पवारांचे बडवे म्हणत व्हिलनही ठरविले आहे. 

त्यामुळे राज्यभर राष्ट्रवादीच्या कब्जावरून संघर्ष सुरू असला तरी यात प्रामुख्याने जयंत पाटील यांचा होमजिल्हा सांगलीला विशेष टार्गेट केले आहे. त्यादृष्टीने फोडाफोडी सुरू झाली आहे. अर्थात सत्तेची ऊब लक्षात घेऊन काहीजणांनी त्यादृष्टीने वाटचालही केल्याचे चित्र आहे. त्यामुळे जयंत पाटील यांना राष्ट्रवादीतील फूट रोखण्याचे आव्हान आहे. 

त्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी झाल्यास जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक ही यादृष्टीने मोर्चेबांधणीसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. यात प्रामुख्याने राष्ट्रवादी-काँग्रेसची एकी आणि कमकुवत असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला बळ देऊन ही महाविकास आघाडीची मोट मजबूत करण्याचे आव्हान आहे.  त्यामुळे राज्यात प्रदेशाध्यक्षपदाद्वारे मोर्चेबांधणी करताना घर सांभाळण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. त्यात ते कितपत यशस्वी होते त्यावर जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक आणि पुढे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत याचा कस लागणार आहे. नव्हे तर त्यांच्यासाठी करो या मरोचीच लढाई आहे.

राष्ट्रवादीचा गोल पूर्ण होण्याची शक्यता

अजित पवार यांच्याकडून जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीतील फोडाफोडीचे प्रयत्न सुरू आहेतच. त्यांचबरोबर ज्यांना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले (की घालविले?) ते यापूर्वी भाजप म्हणून जिल्ह्यात समोर उभे ठाकले होते. आता त्यातील काहीजण भाजपमध्ये नाराज आहेत अशा अनेकजणांना पुन्हा अजित पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादीत स्व:गृही परतीचे आवतन दिले आहे. त्यातील तत्कालिन दुष्काळी फोरममधील अनेकजण आहेत. ते परतल्यास राष्ट्रवादीचा गोल पूर्ण होण्याची शक्यता आहे.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी