MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

अन्यथा सुतगिरणीबाबत वेगळा विचार करावा लागेल : तानाजी पाटीलांचा इशारा

tqnajipatilyanchaeashara 


 तालुक्यात सहकार संस्था टिकवणे काळाची गरज


 जनप्रवास प्रतिनिधी, आटपाडी 

तालुक्यातील कारखाना सुरू करण शेतकरी आणि कामगाराच्या हिताच्या आहे मात्र विरोधकाकडून तक्रारी करून विघ्न आणण्याचा प्रयत्न चालू आहे. आम्ही बँकेकडून आणलेला कारखाना त्यांनी अजूनही सहकारी तत्त्वावर चालवावा मात्र घाणेरडे उद्योग बंद करावेत अन्यथा खाजगी केलेली सूतगिरण पुन्हा बँकेच्या ताब्यात  घेण्यासह कारखान्यातील उद्योग उघड्यावर आणण्याची वेळ आमच्यावर आणून देऊ नका, असा इशारा जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील विरोधकांना दिला आहे.अजून वेळ गेली नसून सहकार पध्दतीने चालवणार असेल तर या मोठ्या मनाने देऊ ठाकू.

         माणगंगा साखर कारखाना नूतन संचालक मंडळाने बँकेकडून 'लिव इन लायसन' मधून पाच वर्षे चालवण्यासाठी करारावर ताब्यात घेतला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.जिल्हा बँकेच्या ताब्यातून माणगंगा साखर कारखाना नूतन संचालक मंडळाने चालविण्यासाठी करारावर घेतला आहे. यावेळी पाटील म्हणाले,  बंद असलेला साखर कारखाना, पाच वर्षे जिल्हा बँकेत असतानाही कारखाना पुन्हा सुरू करण्यात तात्कालीन सत्ताधार्‍यांना आलेले  अपयश, किंबहुना तो सुरू करण्यासाठी कसलेच प्रयत्न केले नाहीत, कारखान्याची निवडणूक, कारखान्याची परिस्थिती, कारखान्यातील गायब झालेल्या मोटारी, तलावावरील मोटारी, गायब तांब्याच्या तारा, भंगार आणि बँकेकडून संचालक मंडळाने कशा कायदेशीर मार्गाने  कारखाना  ताब्यात घेतला या साऱ्याचा आढावा मांडला.

       बँकेकडून आम्ही कारखाना ताब्यात घेतला. शेतकऱ्यांना दिलेला आम्ही शब्द पाळला आहे आता तुम्हाला चालवायचा असेल तर तक्रारी करत बसण्यापेक्षा चालवा. त्यासाठी सर्व सहकार्य करू मात्र चुकीच्या दिशाभूल करणाऱ्या तक्रारी थांबवा. याने कुणाचेच भले होणार नाही. यामुळे शेतकरी आणि कामगारांचे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे. गेली पाच वर्षे त्यांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे आणि अजूनही त्यासाठी तुमचे प्रयत्न असतील तर मात्र आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. तुम्ही सहकारी सूतगिरण स्वतःच्या प्रायव्हेट कंपनीवर विकत घेतली. त्याच धर्तीवर कारखाना ही ताब्यात घेण्याचा प्रयत्न होता. आम्ही सहकारी तत्त्वावर चालवण्यासाठी  ताब्यात घेतला आहे. यातून कोण योग्य हे जनतेला कळतं.


हेही वाचा

https://rajkiyalive.तासगाव नगरपालिकेसाठी राष्ट्रवादीची भिस्त रोहितदादांवर


    त्याच दाखवणं वेगळं आणि वागणं वेगळं आहे. चुकीच्या तक्रारीमुळे शेतकरी आणि कामगारांचे नुकसान होणार आहे. यापुढे तक्रारी झाल्यास आम्हाला सूतगिरणीच्या संदर्भात वेगळा विचार करावा लागेल. सहकारी सूतगिरण बँकेकडून स्वतःच्या देशमुख कंपनीच्या नावावर अत्यंत कमी पैशावर घेतली. तिथे  प्लॉटिंग केले. चुकीच्या पद्धतीने  वागला तर परत सुतगिरण सभासदांची करू. सुतगिरण बँकेच्या ताब्यात घेण्यासाठी लावू नका, असा इशारा दिला. याशिवाय कारखान्यातले आर्थिक व्यवहार, केलेले एडिट, कसलाही संबंध नसलेल्या कंपनींना दिलेले कोट्यावधी रुपये या साऱ्या भानगडीत आम्हाला पडण्याची वेळ येऊ देऊ नका,असा इशारा दिला. बँकेने कारखाना ताब्यात दिल्यानंतर कामगारांच्या आनंद पसरला आहे.


हेही वाचा


सहकार टिकले पाहिजेल 

सहकारी संस्था स्थापन करताना सभासदांना विचारात घेऊन उभ्या केल्या जाता.मात्र परत त्या संस्था व्यक्तीगत करण्याची गरज येते.मुळात ही संकल्पना बंद झाली पाहिजेल.तालुक्यात सर्व सहकारी संस्था सभासदांच्या विचाराची पाहिजेल असे मत स्थानिकांचे आहे.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी