MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

युवा नेते आमदारकीच्या प्रतिक्षेत...

 राजकीय बातम्या, विशेष लेख, जाहिरातीसाठी तसेच 
सोशल मिडीयावरील प्रमोशनसाठी त्वरित संपर्क साधा.  
9850652056, 8275592062





जनप्रवास 2 जुलै 2023



दिनेशकुमार ऐतवडे

2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लागण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. लोकसभेला संजयकाका आणि विशाल पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. पण जिल्ह्यातील युवा नेते इच्छुक आहेत ते विधानसभेला. जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघ आहेत. जयंत पाटील, मानसिंगराव नाईक, सुरेश खाडे, विक्रम सावंत, विश्वजित कदम, सुधीर गाडगीळ, अनिल बाबर यांची उमेदवारी निश्चित असल्यासारखी आहे. तासगाव कवठेमहांकाळमधून रोहित पाटील राष्ट्रवादीकडून उतरण्याची तयारी करत आहेत. पण चिंता लागून राहिली आहे, ती युवा नेत्यांमधून. गेल्या पाच  दहा वर्षापासून अनेक आंदोलने, विकासकामे, जनसंपर्काच्या माध्यमातून युवा नेते आमदारकीची तयारी करीत आहेत. परंतु सर्वच पक्षात युवा नेत्यांना उमेदवारी मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहे. उमेदवारी नाही मिळाली तर मात्र बंडखोरी करण्याची तयारीही ठेवावी लागणार आहे.

सांगली विधानसभा मतदार संघ भाजपकडे आहे. येथे पुढील आमदार मीच असणार असे सुधीर गाडगीळ यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे अनेक नेत्यांच्या 

मनात चलबिचल सुरू आहे. पण खरी अडचण आहे ती पृथ्वीराज पवार यांना. संभाजी पवारांनी चार वेळा आमदारकी गाजवली. परंतु त्यांचा फायदा पृथ्वीराज पवारांना घेता आला नाही. जनता दल ते भाजपा व्हाया शिवसेना असा प्रवास केलेल्या पृथ्वीराज पवारांना सांगलीमधून  भाजपकडे उमेदवारी मागणे देखील अवघड आहे. एवढी पक्की मांड सुधीर गाडगीळ यांनी घातली आहे. 

तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघ सध्या राष्ट्रवादीकडे आहे. आ. सुमनताई पाटील या सध्या विद्यमान आमदार आहेत. येणार्‍या निवडणुकीत त्यांचे पुत्र रोहित पाटील आमदारकी लढविण्याची शक्यता आहे. त्यांच्या बरोबर खा. संजयकाकांचे चिरंजिव प्रभाकर पाटील हेही आमदारकीच्या शर्यतीत आहेत. आबांचा वारसा रोहित पाटील चालविणार की संघर्षातून प्रभाकर पाटील आमदारकी खेचणार हे 2024 मध्येच कळेल. 

जतमध्ये सध्या काँग्रेसचे विक्रम सावंत विद्यमान आमदार आहेत. येथे काँग्रेसकडून सध्यातरी दुसरे कोणी इच्छुक नाहीत. परंतु विरोधी भाजपमध्ये उमेदवारीसाठी रांग लागली आहे. माजी आमदार विलासराव जगताप, प्रकाश जमदाडे यांच्या बरोबर सध्या चर्चेत असणारे नाव म्हणजे तमणगौंडा रवीपाटील. रवीपाीटल यांचे पक्षातील वरिष्ठांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे आपणाला तिकीट मिळेल असे पाटील यांची खात्री वाटत आहे.

पलूस कडेगावमध्ये पारंपरिक विरोधक संग्रामसिंह देशमुखही फार दिवसापासून आमदारकीच्या प्रतिक्षेत आहेत. येथे आता शरद लाड यांचीही भर पडली आहे. सध्या काँग्रेसचे विद्यमान आमदार विश्वजित कदम यांनाच काँग्रेसची उमेदवारी निश्चित आहे. विरोधी भाजपकडूनही संग्राम देशमुखांना उमेदवारी मिळेल परंतु खरी अडचण आहे ती शरद लाड यांची. त्यामुळे ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शिराळा मतदार संघात सम्राट महाडिक यांनी गेल्या वर्षी जोरदार टक्कर दिली होती. भाजपने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी भरून सवार्र्ंना घाम फोडला होता. गेल्या पाच वर्षात त्यांनी मतदार संघात जनसंपर्क वाढविला आहे. यंदा कोणत्याही परिस्थिीत मैदान मारायचेच असा चंग त्यानीं बांधला आहे. यावेळी त्यांच्या सोबतीला सत्यजित देशमुख असणार आहेत. 

मानसिंगराव नाईक विद्यमान आमदार असल्याने त्यांनाच पुन्हा संधी मिळेल, असे वाटते.

इस्लामपूर मतदार संघात गेल्या सात निवडणुकांमध्ये जयंत पाटील यांनी बाजी मारली आहे. जयंत पाटील यांना लोकसभेला उतरविण्याची तयारी सुरू आहे. जयंत पाटील जर लोकसभेला उतरले तर त्यांचे पूत्र प्रतिक पाटील यांना आमदारकीची संधी मिळू शकते. सध्या या मतदार संघात राष्ट्रवादीकडून दुसरा कोणीच इच्छुक नाही. विरोधकांकडे मात्र इच्छुकांची गर्दी झाली आहे. निशिकांत पाटील, गौरव नायकवडी, राहूल महाडिक,सदाभाउ खोत, विक्रम पाटील, आनंदराव पवार यांचे मनोमिलन होणार की नाही यावरही बरेच अवलंबून आहे. 

खानापूर मतदार संघात शिंदे गटाचे अनिल बाबर हेच पुन्हा उमेदवार असणार आहेत. त्यांच्या विरोधात विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील पारंपरिक लढत देतील. आटपाडीच्या देशमुखांनी पुन्हा कंबर कसली आहे. परंतु भाजप शिंदे गट एकत्र निवडणुका लढविल्यास देशमुखांना शांत बसावे लागेल. येथे ब्रम्हानंद पडळकरही ऐनवेळी मैदानात उतरू शकतात, अशी शक्यता आहे. 

एकंदरीत दुसर्‍या फळीतील अनेक नेते आमदारकीच्या प्रतिक्षेत असताना युवा नेत्यांनाही आपण आमदार व्हावे असे वाटत आहे. येणार्‍या निवडणुकीत कोणकोणाची युती होते, आघाडी होते, याबद्दल अजून काहीच सांगता येत नाही. निवडणुकीच्या रणांगणात निवडणुकीच्या शेवटच्या तारखेपर्यंत काहीही होवू शकते. त्यामुळे कोण कोणाबरोबर जाणार आणि कोण कुणाला मदत करणार हे त्याचवेळी कळेल. युवा नेत्यांनी मात्र आत्तापासूनच तयारीला लागले आहेत. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी