MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

मिरज पॅटर्न सक्रीय



 उदय रावळ

सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपणार आहे. त्यामुळे प्रत्येक नगरसेवक आता आपल्या प्रभागातील विकास कामांना गती देत आहेत. गेल्या पाच वर्षातील कामाचा लेखाजोखा समोर ठेवण्यासाठी जनतेसमोर जावं लागणार आहे. त्यामुळे कामे लवकर संपविण्यासाठी धडपड सुरू आहे. परंतु आत्तापासूनच गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे. म्हणजेच मिरज पॅटर्न सक्रीय होत असल्याचे चित्र आहे.
महापालिका नगरसेवकांची मुदत संपण्याची तारीख जवळ आली आहे. तसतसे नगरसेवक आता अनेकांच्या चौकटीसमोर उभे दिसत आहे. भाऊ, काका, दादा, साहेब, मावशी, काकू, तात्या असा उपाद्या देवून गोंजरण्याचे नाटक आता सुरू झाले आहे. राज्यात घडत असलेल्या राजकीय नाट्याचा प्रयोग पाहत अनेक  विद्यमान नगरसेवकांनी लॉगींग सुरू केली आहे.
मिरज पॅटर्न प्रमाणे दादा, भाऊ, साहेब गट तयार होत आहे. मिरजेत झालेल्या लक्ष्मी मार्केटमधील आयलॅड उद्घाटनावेळी पालकमंत्री ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील, कॉंग्रेसचे विशाल पाटील, जनसुराज्य युवा शक्ती राज्य अध्यक्ष समित कदम हे सर्वजण कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर होते. मिरजेत भाजपला चांगल्या पध्दतीने यश मिळवून दिलेले सुरेशबापू आवटी यांनी एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपही अलर्ट झाली आहे. भाजपनेही आता फासे टाकण्यात सुरूवात केली आहे. त्यामुळे गटाचा अंदाज घेत आहेत.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरेशबापू आवटी यांनी आपला गट तयार करण्यात यशस्वी होताना दिसत आहे. प्रत्येक निवडणुकीवेळी मिरज पॅटर्न तयार होत असतो. कोणत्या पक्षाचा झेंडा घ्यायचा हा निर्णय निवडणुकीच्या वेळी ठरत असतो. तसेच समीकरण होते असते. आवटी, नायकवडी, जामदार, मेंढे, कदम गट तयार होत आहे. त्यांच्या सोयीस्कररित्या एकत्रीत येवून सत्ता काबीज करण्याचे मिरज पॅटर्न प्रसिध्द आहे.
महापालिका रणनिती काय असली पाहिजे यासाठी आता खलबतं सुरू झाली आहे. राज्यातील नेत्यांपासून स्थानिक पातळीवर काम करणार्‍यांना आता अनेकांनी फोन येत आहेत. महापालिका निवडणुकीचे राजकारण हे कोणता गट प्रबळ  आहे यावर ठरत असते.  त्यामुळे   राज्यातील सत्तेत कोण आहे कोणाचे किती वजन आहे  हे पाहूनच राजकारण घडत असतेे.
आगामी होवू घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, माजी पालकमंत्री जयंत पाटील, विशाल पाटील हे नेते कोणता गट प्रबळ आहे. त्याला आपल्याकडे खेचण्यासाठी आतापासूनच सुरूवात झाली आहे. परंतु  मिरज पॅटर्न ऐनवेळी कोणता निर्णय घेईल याचा नियम नाही. या गटातून त्या गटात उडी मारण्याचे कसब मिरजकरांना आहे. त्यावेळी विकासाचा मुद्दा गौण ठरतो. त्यामुळे काही दिवसातच कळेल कोण कोणत्या गटात उडी मारेल. मिरज पॅटर्नचा धसका राजकीय नेत्यांनी घेतला आहे.
महापालिकेची प्रभाग रचना आहे तीच राहणार की बदलणार ही हेही महत्वाचे फॅक्टर ठरणार आहे. गट तयार झाले आहेत. फक्त वेट ऑन वॉच अशी भूमिका  आहे. राजकारण हे बुध्दीबळाच्या खेळासारख असतं. राजा कितीही महान असलातरी प्यादे आणि वजीर शिवाय स्थिर राहू शकत नाही. आता यावेळी वजीर कोण होणार आणि प्यादे कोण होणार लवकरच समजेल.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी