MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

विष्णुअण्णा खरेदी विक्री संघावर जयश्रीताईंचे वर्चस्व

 सांगलीत विष्णूआण्णा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार.


 विष्णुअण्णा खरेदी विक्री संघावर जयश्रीताईंचे वर्चस्व 


सहा जागांवर एकतर्फी विजय, 11 जण बिनविरोध 


जनप्रवास । प्रतिनिधी 

सांगली ः विष्णूआण्णा सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत जिल्हा बॅँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या सत्ताधारी वसंतदादा विकास पॅनेलने पुन्हा वर्चस्व मिळवले. सहकारी संस्था प्रतिनिधी गटातील सहा जागांसाठी निवडणूक झाली. यात शून्य विरुध्द 25 मते मिळवत सत्ताधारी पॅनेलच्या सहाही उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळवला. दरम्यान अकरा उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. 

विष्णूआण्णा सहकारी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक पार पडली.

 संघाच्या स्थापनेपासून या संस्थेवर स्व. विष्णूअण्णा, माजी मंत्री स्व. मदनभाऊ पाटील यांचे वर्चस्व होते. मदनभाऊ यांच्यानंतर संघाची धुरा कॉग्रेस नेत्या व जिल्हा बॅँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी संभाळली. बिनविरोधची परंपरा असलेल्या या संस्थेत यंदा पहिल्यांदाच एका गटात निवडणूक झाली. जयश्री पाटील यांच्यासह अकरा उमेदवार बिनविरोध झाले होते. परंतु सहकारी संस्था गटात सहा जागांसाठी सात उमेदवारांचे अर्ज रहिल्याने त्यासाठी सोमवारी मतदान पार पडले. मतदानानंतर लगेचच मतमोजणी झाली. 

संस्था गटात केवळ 26 मतदार होते. यातील 25 जणांनी मतदान केले. 

शंभर टक्के मते मिळवत शून्य विरुध्द 25 मतांनी सत्ताधारी पॅनेलचे सर्व सहाही उमेदवार विजयी झाले. विरोधी उमेदवारास शून्य मते मिळाली. निकालानंतर सत्ताधारी पॅनेलच्या उमेदवारांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत जल्लोष केला. तसेच वसंतदादा, मदनभाऊ व विष्णूअण्णांच्या समाधीस अभिवादन केले. 

संग्राम पाटील किंगमेकर

विष्णूअण्णा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील यांच्या नेतत्वात संघाने प्रगती केली आहे. त्यामुळे जयश्रीताई पाटील यांनी निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. त्यांनी 11 जागा बिनविरोध निवडून आणल्या. उर्वरित जागांच्या बिनविरोधसाठी शेवटपर्यंत पर्यंत झाले. पण विरोधकांनी जाणीवपूर्वक केवळ एकच उमेदवार देत निवडणूक लादली. याला संग्राम पाटील यांनी सडेतोड उत्तर देत शंभर टक्के मते मिळवत सर्व सहाही जागांवर एकतर्फी विजय मिळवत किंगमेकर ठरले. 


निवडणूकीत विजयी उमेदवार - संग्राम पाटील, उदय पाटील, राहुल काशीद, चंद्रशेखर शेटे, सचिन वाडकर, सर्जेराव पाटील (प्रत्येकी 25 मते), पराभूत उमेदवार - बाळासो पाटील (शून्य मते)

बिनविरोध झालेले उमेदवार - जयश्रीताई पाटील, सुजाता पाटील, अशोक पाटील, रमेश चौगुले, सुहास पाटील, उत्तम पाटील, शमांकांत आवटी, भिमराव मिसाळ, शितल लोंढे, अनिल भोरे, संजय गवळी.



टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी