MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

पाटबंधारे मालामाल शेतकरी भिके कंगाल : संदीप राजोबा



पाटबंधारे मालामाल शेतकरी भिके कंगाल : संदीप राजोबा

सांगली : गेले वर्षभर सातत्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक  राजू शेट्टी यांनी पद यात्रेमध्ये तसेच सभा समारंभ गावभेटी यामध्ये वारंवार आपणाला महाराष्ट्र शासन व त्यांच्या जलसिंचन विभागाने पाणीपट्टी (मायनर इरिगेशन) ही दहा पटीने वाढवलेली आहे.  हा शॉक कधी लागू शकतो हे वारंवार सांगितले आहे.  निवडणुकांच्या तोंडावर शेतकर्‍यांच्यासाठी सरकार  नवनवीन योजना जाहीर करत आहे परंतु शासनाचा हा निर्णय म्हणजे एका हाताने द्यायचे व दुसर्‍या हाताने दिलेले व खिशात शिल्लक असणारे सुद्धा पैसे काढून घ्यायचे व शेतकर्‍याला पुन्हा एकदा आर्थिक गुलाम बनवायचे असा घाटच या सरकारने घातलेला आहे, असे मत संदीप राजोबा यांनी व्यक्त केले. 

राजोबा पुढे म्हणाले, पूर्वी हेक्टरी 1346 रुपये प्रति गुंठा 13 रुपये 46 पैसे एकरी 538 रुपये 40 पैसे असणारी पाणीपट्टी आता हेक्टरी 13608 रुपये आकारणी करणार आहे. म्हणजे 136 रुपये 08 पैसे प्रति गुंठा प्रमाणे आकारणी होणार म्हणजे एकरी 5430 रुपये 20 पैसे प्रमाणे होणार आहे. जर आपण सध्याची परिस्थिती पाहिली असता एक तर आपले नगदी पीक म्हणून उसाकडे पाहतो ऊस लागणीपासून तुटेपर्यंतचा कालावधी जवळपास 15 ते 16 महिने जातो म्हणजे लावण व खोडवं हे जाण्याचा कालावधी तीन वर्षे लागतात दोन पिकासाठी आपण तीन वर्षाची पाणीपट्टी सरकारला देणार आहोत हे सुद्धा शेतकर्‍यांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे. 

 सध्या सहकारी पाणी संस्था कारखान्याच्या व कारखाना पुरस्कृत शेती पाणीपुरवठा संस्था तसेच खासगी पंपधारक शेतकर्‍यांच्याकडून एका एकरासाठी घेतली जाणारी सध्याची पाणीपट्टी ही 10 हजारापासून 18 हजार पर्यंत आहे.  त्यामध्ये 5430.20 रू.  वाढ केली असता 15 हजार ते 23 हजारापर्यंत पाणीपट्टी द्यावी लागणार आहे.  हेक्टरी हिशोब केला असता 25 हजार पासून 45 हजार रुपये पाणीपट्टी शेतकर्‍याला द्यावी लागणार आहे. 

त्यातच भरीस भर म्हणून येथून पुढच्या काळामध्ये जलप्राधिकरण आपणाला ज्याप्रमाणे विद्युत मीटर बसवतो त्याच पद्धतीने जल मीटर बसवण्याचे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे रडतखडत चाललेला शेतकर्‍यांचा प्रपंच हा पूर्ण उदध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तरी वेळीच याला सर्व शेतकरी बंधू व भगिनींनी गट, तट,पक्ष व संघटना विसरून शेतकरी हाच एक पक्ष म्हणून संघटित होऊन विरोध केला पाहिजे,  अन्यथा भविष्यामध्ये आपली पिढी आपल्याला  माफ करणार नाही. पाटबंधारे खात्याने तातडीने दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा कार्यालयांना टाळे ठोकू, ही भूमिका आम्ही घेणार आहे. 

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी