MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

*विधान सभा बरखास्त करायला हवी*

महेश खराडे, सांगली

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र या महाराष्टाचे नेतृत्व स्व यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांनी केले. महारास्ट्रातील राजकारणाला दिशा दिली. राजकारणाचा पाया घातला. महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे सुसंस्कृत राजकारण अशी परंपरा होती. पण याला पहिला छेद दिला शरद पवारांनीच. 1978 साली, वसंतदादा चे सरकार पाडून ते मुख्यमंत्री झाले ,त्यानंतर त्यांनी  शिवसेना फोडली छगन भुजबळांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला 99 साली पुन्हा शरद पवारांनी सोनिया गांधीचा मुद्दा उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेस ची स्थापना केली राज्याचे राजकारण चार पक्षीय झाले 1999 ते 2014 पर्यंत राजकारणाचा स्तर ढासळत होता पण तरीही  राजकारणाचा दर्जा फारसा घसरला नव्हता .

पण 2014 नंतर देशात आणि राज्यात   भाजपा  सरकार आले त्यानंतर मात्र देश आणि राज्याच्या राजकारणाचा दर्जा घसरायला लागला फोडाफोडी ला    जोरदार प्रारंभ झाला 

केंद्रातील भाजपा सरकारने  भ्रष्ट नेत्यांवर  इडी सीबीआय इन्कम टॅक्स  धाडी  टाकायली सुरुवात केली . देश आणि राज्याला राजकारणी नेते , प्रशासकिय अधिकारी आणि उद्योगपतींनी लुटला आहे  नेते, अधिकारी आणि उद्योगपती यांच्याकडे ब्लॅक मनी आहे त्यामुळे  लूटारू वर कारवाई व्हायला हवी पण ती कारवाई सर्व पक्षातील लुटारू वर व्हायला हवी. नरेंद्र मोदी खरोखरच लुटारू वर कारवाई करू इच्छित आहेत का हा प्रश्न आहे त्याच्या कारवाया केवळ भाजपा प्रवेशासाठी सुरू आहेत सध्या  विरोधी नेत्यांवरच कारवाई सुरू आहे पण ही बेगडी कारवाई आहे इडी ची भीती घालून भाजपा मध्ये प्रवेश घडवून आणले जात आहेत विरोधी पक्षातील भ्रष्ट नेते भाजपात आले की स्वच्छ होतात ही वस्तुस्थिती आहे अजितदादा पवार छगन भुजबळ हसन मुश्रीफ हे भ्रष्ट नेते तुरुंगात असायला हवे होते पण ते चक्क मंत्री झाले ना खावुगा ना खाणे दुंगा या मोदीच्या धोरणांचे काय झाले  त्यांनी घोष वाक्य बदलायला हवे खावो पियो भाजपा मे आवो मंत्री बनो ज्याची जागा तुरुंगात आहे तेच लाल दिव्याच्या गाडीतून फिरत असतील तर लोकाचे काय भले होणार यामुळे राजकारण आणि समाजकारण गढूळ होत चालले आहे 

2019 साली राज्यात कुणालाच बहुमत मिळाले नाही सेना भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद झाला तिथून राजकारणाला कलाटणी मिळाली हे वास्तव आहे ज्या सेनेचे बोट धरून भाजपा राज्यात वाढली  त्याच भाजपा ने अडीच वर्षाचे मुख्यमंत्री पद सेनेला द्यायला नकार दिला त्यातून महविकास आघाडीचा जन्म झाला ही आघाडी तत्व शून्य होती सर्व वैचारिकतेला तीलाजली देणारी होती शिवसेना ही हिंदुत्व वादी तर  दोन्ही काँग्रेस धर्म निरपेक्ष राजकारण करणारे, पण दोघांनीही सत्तेसाठी माती खाल्ली काँग्रेस जातीय आणि धार्मिक राजकारण करत नाही म्हणते पण सत्तेसाठी  त्यांना शिवसेना , मुस्लिम लीग चालते हे काँग्रेस च्या कोणत्या तत्वात बसते ?  याचाच अर्थ सत्तेसाठी काँगेस वाल्यानिही शेण   खाल्ले, शिवसेनेच्या राजकारणाला कोणतेही तत्व नाही मराठी माणसाच्या जीवावर गेली ५० वर्षे ते राजकारण करत आहेत पण मुंबईत मराठी माणसाची काय अवस्था आहे ,मराठी माणूस भिके कंगाल झाला आणि ठाकरे घराणे मात्र गब्बर झाले  

काँगेस, राष्ट्रवादी, आणि शिवसेना    हे भ्रष्ट आणि सता पिपासू आहेतच पण भाजपा त्याहून अधिक  सत्ता पिपासु आणि पाताळयत्री आहे नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी तर सतेसाठी काहीही करायचे ठरविले आहे महाराष्ट्र, गोवा , कर्नाटक, मध्यप्रदेश यासह अनेक राज्यात तपास यंत्रणांचा धाक दाखवून , कोट्यवधीची खोकी देवून सत्ता हिसकावून घेण्याचा तडाका लावला आहे कोणतीही नीतिमत्ता न ठेवता घावुक पद्धतीने सरकार पाडण्याचा माणसे फोडण्याचा सपाटा लावला आहे लोकशाही जिवंत ठेवायची च नाही याचे धोरण आखले जात आहे बर नुसती फोडाफोडी नाही तर पक्षासहित होलसेल दुकान खरेदी करण्याचा प्रकार सुरू आहे निवडणूक आयोग दावणीला बांधून पक्ष च  गिळकृत करायचा हे मनाला न पटणारे नाही सेना भ्रष्ट आहेच पण बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना एकनाथ शिंदेंनी माझी आहे हे सिद्ध करणे हे वेदना देणारे आहे शरद पवार संधी साधू आणि भ्रष्ट लोकांना पाठीशी घालणारे राजकारणी आहेत पण त्यांनी मेहनत घेवुन स्थापन केलेली राष्ट्रवादी अजित पवारांनी स्वतःची आहे हे सांगणे हे कशात बसते भाजपा हे सगळे करत आहे त्यामुळेच ही किळसवाणी विधानसभा बरखास्त करायला हवी या विधानसभेतील कुणीही जनतेचा विचार करायला तयार नाही शेतकर्याच्या शेतीमालाला भाव नाही, तो मातीमोल किमतीने विकावा लागत आहे शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत तरुणाच्या हाताला काम नाही बे रोजगाराची फौज तयार होत आहे राज्यातील अनेक उद्योग गुजरातला जात आहेत या प्रश्नाची चिंता कुणालाच नाही याबाबत कोण बोलतच नाही दररोज कोण फुटला, कुणी किती खोके घेतले याच्याच बातम्या आणि चर्चा यांना मते देवून आम्ही चूक केली आहे पण ती दुरुस्त करायची असेल तर ही विधानसभा च बरखास्त करायला हवी छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर या सर्व नेत्याचा त्यांनी रायगडाच्या टकमक टोकावरून कडेलोट केला असता शिवाजी महाराज जिवंत नाहीत त्यामुळे त्यांचे काम तुम्ही आम्ही मिळून करूया,त्यासाठी जनमत तयार करायला हवे यासाठी लोकांनी पुढे येण्याची गरज आहे 

एक दरितच सगळेच पक्ष आणि त्या पक्षाचे आमदार खासदार हे असे का वागत आहेत तर जनताही ही भ्रष्ट आहे म्हणून जनतेला निवडणुकीत मटण रस्सा, लागतो वरती गांधी बाबाच्या नोटा लागतात निवडणुकीत खर्च केलेला पैसा वसूल करण्यासाठी सर्वांना सत्ता लागते सतेत जायचे असेल तर कोणतीही तडजोड करायला आमदार खासदार तयार होतात त्यांना जनतेचा मतदाराचा धाक वाटत नाही कारण मतदार ही पैसे घेवून , जेवणे खावून लाचार झाला आहे 

पण अनेक जण प्रामाणिक आहेत  त्यांनी स्वाभिमान गहाण टाकलेला नाही त्यांनी रस्त्यावर यायला हवे लढण्याची तयारी ठेवायला हवी शोधून चांगल्या माणसांना पाठींबा द्यायला हवा ज्यांचा स्वाभिमान जिवंत आहे जे मनापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानतात त्या सर्वांना माझे आवाहन आहे राजकारणाची झालेली गटार गंगा साफ करण्यासाठी सर्वांनी एकत्र येवू या जयहिद

 

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी