MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

जयंत पाटलांना घेरण्यासाठी राहूल महाडिकांची तयारी



दिनेशकुमार ऐतवडे, जनप्रवास

राज्यात नुकताच मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांसह थेट सत्तेत सहभागी होत सर्वांनाच बुचकळ्यात टाकले आहे. अजित पवारांचे पुढचे टार्गेट आमदार जयंत पाटील हेच असणार आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांना जिल्ह्यातच रोखण्यासाठी आत्तापासूनच
रणनिती आखण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पेठचे रा
हूल महाडिक यांनी नुकताच अजित पवार यांची मुंबईत भेट घेउन त्यांचा सत्कार केला. विरोधकांमध्ये आजपर्यंत कधीच एकमत झाले नाही. परंतु सध्याच्या परिस्थितीत राहूल महाडिक यांचे नाव सर्वसंमतीने पुढे येण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांना जर मतदार संघातच रोखून धरायचे असेल तर राहूल महाडिक यांच्याशिवाय पर्याय नाही, असे विरोधकांमध्ये एकमत झाल्याचे कळत आहे. राहूल महाडिक यांनीही जयंत पाटील यांना घेरण्याची तयारी केली आहे.

1990 पासून इस्लामपूर मतदार संघात आपली मजबूत पकड निर्माण केलेल्या माजी मंत्री जयंत पाटील यांनी राज्याच्या राजकारणातही मोठी झेप घेतली. सध्याच्या घडीला राज्यस्तरावर त्यांचे नाव घेतले जाते. शरद पवार यांचे अगदी विश्वासू साथीदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. एवढ्या मोठ्या राजकीय भूकंपानंतरही जयंत पाटील यांनी मनाचा तोल जावू न देता शरद पवार यांची खंबीर साथ केली आहे. 

जयंत पाटील यांच्यावर सध्या राज्याच्या राष्ट्रवादीची जबाबदारी असली तरी त्यांना मतदार संघातच रोखून ठेवायचा प्लॅन विरोधकांनी रचला आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात वाळव्याच्या गौरव नायकवडींना शिवसेनेचे तिकीट मिळाले. परंतु इस्लामपूर नगरीचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून तिरंगी लढतीचे चित्र निर्माण केले. याचा फटका विरोधकांना बसला. जयंत पाटील लाखाच्या फरकाने निवडून आले. 

निवडणुकीनंतर सर्व विरोधकांनाची तोंडे सर्व बाजूला झाली. रयत संघटनेचे सदाभाउ खोत, शिवसेनेचे गौरव नायकवडी, भाजपचे राहूल महाडिक, विक्रम पाटील, शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव पवार, भाजपचे निशिकांत पाटील, काँग्रेसचे जितेंद्र पाटील हे सर्व जयंतरावांचे विरोधक म्हणून ओळखले जातात. परंतु ऐन निवडणुकीच्या काळात विरोधकात फूट पडते, असा आजपयर्ंतचा इतिहास आहे. 

हेही वाचा

येथून पुढचे राजकारण मात्र वेगळे असणार आहे. राज्य पातळवीर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीमध्ये तर हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आमदार जयंत पाटील आणि शरद पवार गटाकडे राहिले आहेत. राज्यभरू फिरून पक्ष पुन्हा उभारणार, असे शरद पवार आणि जयंत पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. राज्याच्या राजकारणात फिरत  असताना जयंत पाटील यांना इस्लामपूर मतदार संघात फारसा वेळ द्यायला मिळणार नाही, याचाच फायदा विरोधक उचलण्याच्या तयारी आहेत. त्यांच्या सोबतीला आता अजित पवार असणार आहेत. कारण जयंत पाटील आणि अजित पवार यांचे प्रेम सर्वश्र्र्रुत आहे. जयंत पाटील यांना मतदार संघातच रोखून धरण्यासाठी मोठा डाव टाकण्याच्या तयारीत विरोधक आहेत. 

शांत आणि संयमी म्हणून राहूल महाडिक यांच्याकडे पाहिले जाते. सम्राट यांच्यासारखा आक्रमकपणा त्यांच्याकडे नसला तरी सर्वसामान्यांना हाताशी धरून राजकारण करण्याची त्यांची कला आहे. वनश्र्री नाना महाडिक मल्टीस्टेटच्या माध्यमातून ग्रामीण भागापर्यंत ते पोहोचले आहे. मतदार संघातील बहुतांश गावामध्ये त्यांनी आपला गट तयार केला आहे. नानासाहेब महाडिकांचे स्वप्न सत्कार उतरवण्यासाठी त्यांची आत्तापासूनच चंग बांधला आहे. राज्यस्तरावरही त्यांचे सर्वांशी चांगले संबंध आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच राहूल महाडिक यांनी त्यांचा मुंबईत जावून सत्कार केला. येणार्‍या विधानसभेला आपण तयार असल्याचे दाखवून दिले आहे. जयंत पाटील यांच्या विरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणणे हे मात्र त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे. 

अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचा आशीर्वाद राहूल महाडिक यांना असणार आहे.


त्यामुळे विरोधकांमध्ये एकमत यंदा अडचण येणार नाही. जवळच्या शिराळा मतदार संघात सम्राट महाडिक यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. परंतु राज्यात अचानक घडलेल्या राजकीय घडामुळे राहूल महाडिकांनीही शडृडू ठोकला आहे. त्यामुळे शिराळा आणि इस्लामपूर मतदार संघ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी