MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

मुंबईचा फौजदार काळाच्या पडद्याआड


 दिनेशकुमार ऐतवडे

ब्रिटीशांनाही लाजविणार्‍या, आपल्या रूबाबदार व्यक्तिमत्वाने मराठी चित्रपटसृष्टीवर एकेकाळी राज्य करणारा रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड गेला. जिवनात मरण अटळ असले तरी रविंद्र महाजनीला जसे मरण आले तसे वैर्‍याच्या वाट्यालाही येउ नये. मुंबईचा फौजदार बेवारस अवस्थेत गेला, असेच म्हणावे लागले.

रमेश देव, राजा गोसावी, राजा परांजपे यांच्यानंतर मराठी चित्रपटसृष्टी तग धरत होती. सर्वच मराठी चित्रपटांना रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत होता. सत्तरच्या दशकात रवींद्र महाजनी यांनी अखंड महाराष्ट्र हलवून सोडले होते. मुंबईचा फौजदार, देवता, झुंज, आराम हराम है हे त्याचे गाजलेले चित्रपट. त्यावेळी आत्ताच्यासारखे मल्टीप्लेक्स नव्हते, मोबाईल क्रांती नव्हती. तरीही गावोगावच्या जत्रेत आणि यात्रेत तंबूमध्ये मराठी चित्रपट दाखविले जात होते. अशा याकाळात एका सर्वसामान्य कुटुंबातून येउन मराठी चित्रपट सृष्टीवर राज्य करणारा रविंद्र महाजनी तरूण आणि तरूणींच्या गळ्यातील ताईत बनला होता. त्याचे सर्वच चित्रपट हिट झाले. परंतु मुंबईचा फौजदार आणि देवता हे तर सुपरहिट ठरले. नोकरी न लागलेला तरूण हातात कुर्‍हाड घेउन वाममार्गाला लागतो. त्याचे वाममार्गाला लागणे चुकीचे असले तरी प्रत्येक तरूण आपल्यामध्ये रविंद्र महाजनीला पहात होता. देवता चित्रपटामधील हा प्रसंग अजूनही लोकांच्या काळजात घर करून आहे.

या चित्रपटातील अभिनयाबरोबरच दिग्दर्शनातही त्यांनी हात आजमावला. मराठीमध्ये अनेक सिनेमांमध्ये काम करण्यासोबतच तो हिंदी टीव्ही मालिकांमध्येही सक्रीय आहे. ’इमली’ या मालिकेतील आदित्य त्रिपाठीच्या व्यक्तिरेखेने त्याने देशभरातील चाहत्यांमध्ये आपली छाप पाडली. हिंदी चित्रपटाबरोबरच मराठी चित्रपट कलाकारांनाही मोठा शाप आहे. अनेक कलाकार आपल्या उमेदीच्या काळात चांगले राहिले परंतु उतारत्या वयात त्यांच्याकडे पाहणारे कोणीच नसायचे. सवार्ंचा लाडका लक्ष्मीकांत बेर्डेही असाच दारूच्या आहारी जाउन आपले जिवंत संपवले. रंजनाचा मोठा अपघात झाला, त्यातच तिच्या करिअरचा शेवट झाला. भक्ती बर्वे अपघातात गेली. अरूण सरनाईकही अपघातात वारले. 

रविंद्र महाजनी यांचे निधन होवूनही तीन चार दिवस झाले आहेत. परंतु त्याची कुणालाच कल्पना नव्हती. हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री परवीन बाबीचाही मृत्यू असाच झाला होता.


टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी