MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

माळवाडीत व्याजावरील पैशांचा दंड देण्यासाठी पती-पत्नीला घरात घुसून बेदम मारहाण


 

सांगली : व्याजाने घेतलेले पैसे मुद्दल आणि व्याजासहित परत करून देखील व्याजावरील दंड दिला नाही म्हणून तरुणाच्या घरात घुसून तिघांनी पती-पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली.



 

व्याजावरील पैशांचा दंड देण्यासाठी पती-पत्नीला घरात घुसून बेदम मारहाण : 

माळवाडीतील घटना : महिला सावकारासह तिघांवर गुन्हा दाखल. 


 सदरची घटना हि रविवार दि. 21 जानेवारी रोजी सकाळी दहा आणि सोमवार दि. 22 जानेवारी रोजी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास माळवाडी येथे घडली. या प्रकरणी जखमी प्रकाश राजाराम मळवडे (वय 26 रा. माळवाडी) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सावकार महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. छाया दानेकरी, प्रशांत दानेकरी आणि अभिजित दानेकरी (सर्व रा. माळवाडी ता. मिरज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 


याबाबत अधिक माहिती अशी कि, जखमी प्रकाश मळवडे हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील माळवाडी मधील जैन बस्ती जवळ राहतात. प्रकाश मळवडे यांनी संशयितांकडून व्याजाने पैसे घेतले होते. सदरची मुद्द्द्ल आणि व्याज प्रकाश मळवडे यांनी संशयितांना परत दिली होती. 




रविवार दि. 21 जानेवारी रोजी सकाळी दहा आणि सोमवार दि. 22 जानेवारी रोजी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास संशयित तिघेजण मळवडे यांच्या घरी आले. त्यांनी व्याजावरील दंड का दिला नाहीस असे म्हणून प्रशांत दानेकरी याने लाकडी काठीने मारहाण करण्यास सुरवात केली. छाया दानेकरी आणि अभिजित दानेकरी यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. यावेळी प्रकाश मळवडे यांच्या पत्नी अक्षता मळवडे या मध्ये आल्या असता त्यांना धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली. 

घडलेल्या या घटनेनंतर जखमी प्रकाश मळवडे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम अंतर्गत संशयित तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. 

 

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी