MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणावर छापा टाकून कारवाई

 

४ किलो गांजासह १ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त. 


जनप्रवास । प्रतिनिधी
 शहरातील आकाशवाणी केंद्राच्या पाठीमागील काळ्या वाटेकडे जाणाऱ्या रोडवर दुचाकीवरून विक्रीसाठी गांजा घेऊन निघालेल्या तरुणावर छापा टाकून कारवाई करण्यात आली. या तरुणांकडून ४ किलो ४ ग्रॅम वजनाचा गांजा एक मोटारसायकल असा एकूण १ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई हि शुक्रवार दि. २१ जुलै रोजी रात्री पाऊणे आठ वाजण्याच्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली. नहीम मेहबूब कागजी (वय २५ रा. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक शुक्रवारी रात्री शहरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली कि, संशयित कागजी हा दुचाकीवरून आकाशवाणी केंद्राच्या पाठीमागे गांजा विक्री करण्यासाठी थांबला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी छापा टाकला असता संशयित कागजी हा मोटारसायकल (क्र. एमएच सीव्ही ६००८) वर संशयितरित्या थांबलेला दिसला. यावेळी त्याला सापळा रचून जेरबंद करत त्याची तपासणी केली असता त्याच्या जवळील प्लास्टिकच्या पिशवी मध्ये ८० हजार रुपये किमतीचा ४ किलो ४ ग्रॅम वजनाचा गांजा मिळाला. या गंजबाबत कसून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर त्याच्याजवळील ४ किलो गांजा आणि एक मोटारसायकल असा एकूण १ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलीस शिपाई योगेश बाळासाहेब सटाले यांनी फिर्याद दिली आहे. 

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी