पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

स्वच्छ सांगली, हेल्दी सांगली मोहिमेला ‘प्लागॅथॉन’ने सुरवात

इमेज
 स्वच्छ सांगली, हेल्दी सांगली मोहिमेला ‘प्लागॅथॉन’ने सुरवात जनप्रवास । प्रतिनिधी सांगली: ‘स्वच्छ सांगली, हेल्दी सांगली’ ही संकल्पना कृतीशील उपक्रमातून साकारण्याच्या मोहिमेला रविवारी ‘प्लॅगाथॉन’ने सुरवात झाली. गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल आणि पृथ्वीराज पाटील फौंडेशन यांच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला.  काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सकाळी शहरातील प्रमुख पेठांतून स्वच्छतेसाठी एकजुटीने पाऊल उचलण्यात आले. त्यात विविध संस्था, संघटना सहभागी झाल्या. पृथ्वीराज पाटील यांनी सन 2024 मध्ये वर्षभर सांगली पंचक्रोशीचे आणि सांगलीकरांचे आरोग्य या विषयावर प्राधान्याने कामाचा निश्चिय केला आहे. त्यात शुद्ध पाण्यासह सामाजिक आणि व्यक्तीगत आरोग्यासाठी सांगलीकरांच्या हातात हात गुंफून काम केले जाणार आहे. त्याची सुरवात सकाळी चालण्याचा व्यायाम करत करत कचरा वेचणे आणि तो एकत्रित करणे, या स्वरुपात म्हणजेच प्लॅगाथॉनने झाली.  पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘स्वच्छता ही एक दिवसाची प्रक्रिया नाही. ती सवय बनली पाहिजे. त्यासाठी व्यापक कार्यक्रम घेवून आम्ही तळागाळात पोहचत आहोत. ज

पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिनी विविध उपक्रम

इमेज
सांगली : सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा 58 वा वाढदिवस रविवार दि. 31 डिसेंबरला विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा होणार आहे.  पृथ्वीराज पाटील फौंडेशन व काँग्रेस कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन विविध उपक्रमांची जय्यत तयारी केली आहे. तर वसंत कॉलनीतील निवासस्थानी शुभेच्छा स्विकारतील, अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष बिपीन कदम यांनी दिली आहे.  पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्यावतीने सकाळी सात वाजता राजवाडा चौक ते श्री गणपती मंदीर दरम्यान प्लॅगॉथॉन म्हणजे जॉगिंग करत कचरा बॅगेत भरुन बॅग जमा करणे हा ‘स्वच्छ सांगली, हेल्दी सांगली’ अंतर्गत उपक्रम होईल. महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते प्रारंभ होईल. सांगली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात विविध ठिकाणी महाआरोग्य शिबीरे होतील. ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्मे व आधार काठी वाटप तसेच सांगली विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षासाठी कायम योगदान दिलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा काँग्रेस कमिटीतर्फे विविध प्रभागात सत्कार केला जाईल.  बिसूरमध्ये पृथ्वीराज पाटील फौंडेशनतर्फे 60 किलो वजन गटाच्या कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सांगलीतील गव

सर्वसामान्यांचा आधारवड हरपला:

इमेज
माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचे निधन  :रंजल्या गांजल्यांचा आवाज हरपला: माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचे निधन  :रंजल्या गांजल्यांचा आवाज हरपला:  राजकारनातील विचारांशी तत्वनिष्ठ असणारा  शेवटचा तारा निखळला : कुपवाड : जनसामान्यांचे आधारवड कुपवाडचे सुपुत्र, विधानसभा व विधानपरिषदेचे माजी सदस्य, ज्येष्ठ पुरोगामी नेते प्रा. शरद रामगोंडा पाटील यांचे त्यांच्या राहत्या घरी बुधवारी पहाटे पाचच्या दरम्यान  निधन झालं.वयाच्या ८१ व्या वर्षी  त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या काही महिन्यापासून आजारी होते. त्यांच्या निधनाने कुपवाड शहरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वसामान्य माणूस पोरका झाला असून सामाजिक, राजकिय पटलावरील सर्वसामान्यांच, रंजल्या गंजल्याल्यांच नेतृत्व हरपले आहे .कुपवाड परिसरातील सर्व व्यवसायिकांनी , व्यापाऱ्यानी,  एक दिवसाचा  दुखवटा पाळत सर्व व्यवहार बंद ठेवले. शहरातील सर्व शाळा व्यवस्थापनाने एक दिवसाची सुट्टी जाहिर करण्यात आली.सामाजिक, राजकीय, शैक्षणिक ,वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती,पुरोगामी चळवळीच्या नेत्यांनी,कार्यकर्त्यानी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली होत

कुंजीवनमध्ये बालकांवर मौजीबंधन संस्कार

इमेज
उदगाव कुंजवन येथे महोत्सवात मौजीबंधन संस्कार करताना आचार्य श्री प्रसन्नसागर महाराज समोर उपस्थित बालके   उदगाव (ता. शिरोळ) येथील कुंजवन महोत्सवात दोनशेहून अधिक बालकांवर मौजीबंधन संस्कार करण्यात आले. आचार्य श्री प्रसन्नसागर महाराज यांनी मुलांवर स्वतः संस्कार करत त्यांना व्रत व उपदेश दिला. यावेळी यागमंडल विधान, गुरूकृपा व्रतसंस्कार महोत्सव हजारो भक्तांच्या व मुनीश्रींच्या ससंघाच्या उपस्थितीत संपन्न झाला.   गावातून मंगलकुंभ घट यात्रा कुंजवन मध्ये वाजत गाजत आणण्यात आले.  सकाळी जाप्य, अभिषेक, शांतीधारा, नित्य पूजा याचबरोबर सौभाग्यवती महिला व कुमारिका यांच्याद्वारे गावातून मंगलकुंभ घट यात्रा कुंजवन मध्ये वाजत गाजत आणण्यात आले. ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते झाले. मौजीबंधन संस्कार विधी मुख्य सभा मंडपात अंतर्मना आचार्य श्रींच्या सानिध्यात व मंत्रोच्चाराने झाला. यावेळी जैन धर्माच्या परंपरेनुसार जीवनाची वाटचाल कशी करावी. कोण कोणत्या गोष्टीचा त्याग करावा, व्यसनापासून दूर राहावे, शाकाहार हाच सर्वश्रेष्ठ आहार, आई-वडिलांची सेवा, समाजाप्रति असलेली जाणीव असा धर्मोपदेश आचार्य श्री यांनी उपस्थित बालकांना

सांगलीत अक्षता कलशाचे पूजन; शहरातून शोभायात्रा

इमेज
जनप्रवास ।  सांगली:  अयोध्येतील श्रीराम मंदिरातील रामलल्लाच्या जानेवारीत होणार्‍या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त रविवारी सांगलीत मंगल अक्षता कलशाचे पूजन करून रथातून शोभा यात्रा काढण्यात आली. यात्रेत सजवलेल्या रथात मंगल कलश ठेवण्यात आला होता. त्यामुळे शहर राममय झाले होते. कोटणीस महाराज, केळकर महाराज, गोडसे महाराज आदींसह रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.  हेही आवर्जुन वाचा ऐनवेळच्या पैलवानांना लोकसभेचे स्वप्न... (loksabha ) हातकणंगलेत दुरंगी की तिरंगी? (sangli )काँग्रेसच्या गोटात शांतता, भाजप जोमात   अयोध्येतील श्री राम मंदिराचे दि. 22 जानेवारीला होणार आहे.  त्या सोहळ्यानिमित्त देशभरात मंगल अक्षता कलश यात्रा काढण्यात येत आहे. रविवारी सांगलीत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मारुती चौकात मुख्य कलशासह 21 कलशाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सजवलेल्या रथात भगवान श्रीरामांच्या प्रतिमेसमोर मंगल अक्षता कलश ठेवण्यात आला. यात्रेत मोठ्या संख्येने राम भक्त भगव्या टोप्या घालून करून तर महिला डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या.  मार्गावर लक्षवेधक रांगोळ्या  मारुती चौकातून बालाजी चौक तेथ

संन्मती सागर महाराज यांच्या प्रेरणेने कुंजवांचे नंदनवन झाले:

इमेज
जयसिंगपूर    तपस्वी सम्राट आचार्य श्री संन्मती सागर महाराज यांच्या प्रेरणेने कुंजवनचे नंदनवन झाले आहे. या त्यांच्या समाधीस्थळी सम्मेद शिखरजीमधून उदगाव कुंजवनला आपण विहार करण्यास हीच गुरुभक्तीच कारणीभूत आहे. आचार्य प्रसन्नसागर महाराज यांनी आपल्या प्रवचनात बोलताना सांगितले. उदगाव (ता. शिरोळ) येथे कुंजवन येथे सुरू असलेल्या आनंद महोत्सवात तपस्वी सम्राट आचार्य श्री संन्मती सागर महाराज यांच्या समाधी दिनानिमित्त त्यांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. महाराज पुढे म्हणाले, तपस्वी सम्राट संन्मती सागर महाराज यांची तपश्चर्या व साधना खूप महान होती.  या महान तपश्चर्या असणाऱ्या गुरुवर्यांच्या तेजाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भक्तगण येत होते. सकाळी कुंजवन येथून गावातील प्रमुख मार्गावरून तपस्वी सम्राटांच्या प्रतिमेची बँड व ढोल पथक, हत्ती घोडे आणि महिलांनी डोक्यावर कलश घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच प्रतिष्ठा करण्यात येणाऱ्या पद्मप्रभू या विशालकाय मूर्तीच्या आगमनानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली.  दुपारी गुरुमंदिरात नूतन सुवर्ण लेपन केलेल्या मूर्तीवर व चरण पादूकावर हळद, चंदन, दुध, दही, उसा

सांगलीतील सराफी दुकान चोरटयांनी फोडले

इमेज
  : ८५ हजारांचे दागिने केले लंपास.  सांगली : शहरातील गणेशनगर येथे असणारे सराफी दुकान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास फोडले. दुकानात ठेवलेल्या सोन्याचांदीच्या दागिन्यांसह ८५ हजारांचा मुद्देमाल चोरटयांनी लंपास केला. सदर चोरीची घटना हि बुधवार दि. २० डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अमर पांडुरंग शिंदे (वय ३६ रा. त्रिमूर्ती चौक, सांगली) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. \   सांगलीतील सराफी दुकान चोरटयांनी फोडले  याबाबत अधिक माहिती अशी कि, अमर शिंदे हे आपल्या कुटुंबियांसह त्रिमूर्ती चौक परिसरात राहतात. त्यांचे गणेशनगर मधील स्विमिंग टॅंकच्या पाठीमागे सराफी दुकान आहे. मंगळवार दि. १९ डिसेंबर रोजी शिंदे हे नेहमी प्रमाणे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास दुकानाच्या लोखंडी शटरच्या कुलुपाच्या पट्ट्या कापून दुकानात प्रवेश केला. दुकानातील काउंटर मध्ये ठेवलेले चांदीचे आणि ड्रॉव्हर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने असा एकूण ८५ हजारांचा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पलायन केले. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच

उदगाव कुंजवन भगवान आनंद महोत्सव सोहळ्यास प्रारंभ

इमेज
  उदगाव कुंजवन भगवान आनंद महोत्सव सोहळ्यास प्रारंभ    उदगाव (ता.शिरोळ) कुंजवन येथील आदि - संन्मती समाधी तीर्थक्षेत्रावर भगवान आनंद महोत्सव सोहळ्यास भव्य सवाद्य मिरवणूक व ध्वजारोहणाने दिमाकदार सोहळ्यात प्रारंभ झाला. याप्रसंगी अंतर्मना आचार्य श्री प्रसन्नसागर महाराज व मुनीश्री पियूषसागर महाराज यांच्या ससंघ सानिध्यात विविध धार्मिक विधी संपन्न झाले. उदगाव कुंजवन भगवान आनंद महोत्सव सोहळ्यास प्रारंभ    सकाळी कुंजवन येथून गावांमधील  भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर व मुख्य मार्गावरून भगवंतांची भव्यकलश मिरवणूक काढण्यात आली. या हत्ती, घोडे, बँडपथक, महिलांचे ढोल पथक, रथ यांच्यासह 108 सौभाग्यवती महिला, 56 कुमारिका डोक्यावर मंगलकलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर विधीवत ध्वजारोहण व मंडप शुद्धीकरण करून भगवंतांची मूर्ती मंडपात ठेवण्यात आली. ध्वजारोहण प्रवीण - विशाल जैन कासलीवाल हल्दीवाला परिवार नांदेड यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आले. यावेळी पंडित प्रदीप मधुर यांनी मंत्रविधी केली. सुशोभिकरण व नूतनीकरण करण्यात आलेल्या मूलनायक भगवान महावीर गर्भगृहाचा लोकार्पण सोहळा तसेच पंचामृत अभिषेक मान्यव

सांगलीतून दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद

इमेज
: दोन लाखाच्या सहा दुचाकी हस्तगत : स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई.  गेल्या सहा महिन्यात शहरासह जिल्ह्यातून सहाशेहून अधिक दुचाकी चोरीला गेल्याचे वृत्त दैनिक जनप्रवासने प्रकाशित करताच पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. शहरातील विश्रामबागसह अन्य ठिकाणाहून लंपास केलेल्या दुचाकींची विक्री करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले. तानंग फाट्यानजीक असणाऱ्या पुलाजवळ मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. संतोष मारुती हाके (वय १९, रा. बागेवाडी, ता. जत, जि. सांगली ) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २ लाख १० हजारच्या सहा दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. मागील काही महिन्यांपासून शहरासह जिल्ह्यात देखील दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरट्यास पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गस्त वाढविली आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक पंकज पवार यांच्या पथकातील कर्मचारी विनायक सुतार यांना चोरीच्या दुचाकींची विक्री करण्यासाठी चोरटा तानंग फाट्यानजीक असणाऱ्या पुल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला. काही वेळाने

सोन्याच्या दागिन्यांसह एक लाखांचा मुद्देमाल जप्त.

इमेज
 सोन्याच्या दागिन्यांसह एक लाखांचा मुद्देमाल जप्त.  सांगली : आरग येथील रेल्वे स्टेशन रोडवर एका वृद्धाला पोलीस असल्याचे सांगून लुटणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या चोरट्याकडून चोरीतील सोन्याची चेन, अंगठीसह १ लाख ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शहरातील चिन्मय पार्क जवळ सदरची कारवाई केली. आबूतालिफ मुसा इराणी (वय २८ रा. किर्लोस्करवाडी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.   याबाबत अधिक माहिती अशी कि, मिरज तालुक्यातील आरग येथे राहणारे अण्णासो गायकवाड हे दि. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गावातून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर चालत निघाले होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने आपण पोलीस असल्याचे सांगून गायकवाड यांना लुटले होते. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली होती. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी जिल्ह्यातील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी हेडकॉन्स्टेबल सागर लवटे यांना माहिती मि

विश्रामबाग मध्ये भरदिवसा चेन स्नॅचिंग :

 महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्यांचे दागिने हिसडा मारून केले लंपास.   सांगली : विश्रामबाग परिसरातील पार्श्वनाथ कॉलनी मध्ये भरदिवसा महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्यांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केले. सदर चेन स्नॅचिंगची घटना हि आज मंगळवार दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी संजीवनी दिलीप हुक्कीरे (वय ५३ रा. सांगली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी कि, संजीवनी हुक्कीरे या आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील धामणी रोडवरील पार्श्वनाथ कॉलनी मध्ये राहतात. आज मंगळवार दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी त्या कामानिमित्त दुचाकीवरून बाहेर गेल्या होत्या. सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्या घरी परत आल्या. घरासमोर त्यांची गाडी लावत असताना दुचाकीवरून दोन अज्ञात व्यक्ती आले. हुक्कीरे यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ आले असता त्यांनी संजीवनी हुक्कीरे यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण हिसडा मारून पलायन केले. संजीवनी हुक्कीरे यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत

उद्धव ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांच्याविरोधात खोटे अ‍ॅफिडेव्हिट द्या नाहीतर जेल;

इमेज
 अनिल देशमुखांना ’वरून’ फोन आल्याचा श्याम मानवांचा दावा वर्धा : न्यायालयात न्याय मिळेल याची काही गॅरंटी नाही, या देशातले निवडणूक आयोग कॉम्प्रमाईज झालं आहे असा आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला. अनिल देशमुखांनी खोटे अ‍ॅफिडेव्हिट लिहून दिले नाही, म्हणून त्यांना जेलमध्ये जावं लागल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच आमदारांच्या अपात्रतेवर कोर्ट काहीही करणार नाही हे गुवाहाटीवरून आलेल्या एका मंत्र्याने त्याचवेळी सांगितलं होतं असाही दावा श्याम मानव यांनी केला. श्याम मानव यांनी वर्ध्यामध्ये एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी हे सर्व आरोप केले आणि सध्या देशात लोकशाही नसल्याचं म्हटलं.  कोर्ट काही करणार नाही, अडीच वर्षे सरकार टिकेल  कुणीच अपात्र होणार नाही, न्यायालय काहीही करणार नाही असं गुवाहाटीवरून आल्यानंतर मंत्र्याने सांगितलं, आज तसंच घडतंय असा दावा श्याम मानव यांनी केला. ते म्हणाले की, माझा एक मित्र जो मंत्री होता, मंत्रिमंडळामध्ये असताना तो गुवाहाटी वरून परत आला. त्यावेळेस त्याने सांगितलेला किस्सा खूप सुंदर आहे. या देशात काही लोकशाही उरलेली नाही,

शरद पवारांशिवाय राष्ट्रवादी कशी असू शकते? मनु सिंघवींचा सवाल,

इमेज
 तर सुप्रिया सुळेंची कार्याध्यक्ष पदाची नियुक्तीच चुकीची, अजित पवार गटाचा पलटवार  NCP Crisis :  निवडणूक आयोगात राष्ट्रवादीकडून पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरु असून यावर सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीसाठी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित आहेत.  नवी दिल्ली  :  राष्ट्रवादीमध्ये  (NCP) फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरु झाली. याबाबत निवडणूक आयोगात (Election Comission) सध्या सुनावणी सुरु आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी  शरद पवार  (Sharad Pawar) गटच्या खासदार  सुप्रिया सुळे  (Supriya Sule) या देखील निवडणूक आयोगात उपस्थित आहेत. यावेळी  अजित पवार  (Ajit Pawar) गटाकडून वकिल मुकुल रोहोतागी हे युक्तिवाद करत आहेत तर शरद पवार गटाकडून वकिल देवदत्त कामत (Devdatta Kamat) आणि अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhavi) हे युक्तिवाद करतायत. दरम्यान राष्ट्रवादी पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली, मग त्यांच्याशिवाय पक्ष कसा काय असू शकतो असा सवाल शरद पवार गटाचे वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला. तर सुप्रिया सुळे यांच्या कार्याध्यक्ष पदाची नियुक्ती चुकीची असल्याचा युक्तिवाद अजित पवार

कुख्यात गुंड सच्या टारझनचा निर्घृण खून

इमेज
अनैतिक संबंधातून संपवले : कोयत्याने डोक्यात तब्बल २४ वार ; संशयित स्वतः पोलिसांत हजर.    सांगली जनप्रवास : खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी यांसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला, मोकातील आरोपी कुख्यात गुंड सचिन उर्फ कमलाकर पांडुरंग जाधव उर्फ सच्या टारझन (वय ४५, मूळ नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा) याचा आज पहाटे कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. नात्यातील महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून गणेश विनोद मोरे (वय १९, रा. अहिल्यानगर, कुपवाड) याने आपल्याच घरात सच्या टारझनवर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या सच्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरु असतानाच सकाळी दहा वाजता त्याचा मृत्यू झाला. खून करणारा संशयित गणेश मोरे हा रक्ताने माखलेला कोयता घेवून स्वतः कुपवाड पोलिस ठाण्यात हजर झाला. दरम्यान, गुंडाच्या खुनामुळे गुन्हेगारी वर्तुळात एकच खळबळ उडाली. येथील शासकीय रुग्णालयात नातेवाईकांसह मित्रांची मोठी गर्दी होती. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला.   याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सच्या टारझन पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. एका ख

बावनकुळे यांचा माजी आ.जगताप यांना तब्बल 10 वेळा फोन

इमेज
बावनकुळे यांचा माजी आ.जगताप यांना तब्बल 10 वेळा फोन मात्र रिस्पॉन्स नाही, टेक्स मेसेज वर पण दिले नाही उत्तर, नाराज असल्याची चर्चा. अमोल कुलकर्णी  गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार विलासराव जगताप  यांना भाजपकडून सातत्याने डावले जात असून, त्यातच उमदी येथील कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या समोर आमदार गोपिचंद पडळकर यांनी कार्यक्रम हायजॅककेला असल्याची चर्चा असताना. त्यावरुन माजी आमदार विलासराव जगताप व आमदार गोपिचंद पडळकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली असल्याची चर्चा होती. विधानसभेचे प्रचार प्रमुख तमणगौडा रवी पाटील यांनी  मोदी नाईन हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली असून, एकूण 65 गावात आतापर्यंत त्यांनी नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले कार्य पोहोचण्यास सुरुवात केली आहे. सांगली जिल्ह्यातून जत तालुका हा मोदी नाईन कार्यक्रमात आघाडीवर आहे . मोदी नाईन या कार्यक्रमास विलासराव जगताप यांनी मात्र पाठ फिरवली असून, शासनाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. जत तालुका दुष्काळ जाहीर करावा त्यासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली सर्

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी