पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

सरपंच ते 4 वेळा आमदार, एकनाथ शिंदेंना बंडावेळी साथ,

इमेज
 सरपंच ते 4 वेळा आमदार, एकनाथ शिंदेंना बंडावेळी साथ, ’पाणीदार’ आमदार अनिल बाबर आटपाडी : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल बाबर यांचे आज अकस्मात निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने त्यांना सांगलीतील रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आलं होतं. रोखठोक भूमिका मांडणे यासाठी अनिल बाबर कायम ओळखले जायचे. आज त्यांच्या जाण्याने खानापूर मतदारसंघासह राजकीय क्षेत्रातही शोककळा पसरली आहे.  पाणीदार आमदार -  पश्चिम महाराष्ट्रात अनिल बाबर यांची पाणीदार आमदार अशी ओळख आहे. तसा खानापूर-आटपाडी हा मतदारसंघाला दुष्काळग्रस्त.  कृष्णा खोर्‍यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते. 2014 ते 2019 च्या युती सरकारच्या काळात टेंभू योजनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. सरपंच ते चार वेळा आमदार, मंत्रिपदाची हुलकावणी -  शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या 19 व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते. बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून ओळख होती.  2019 मध्ये शिवसेनेच्

वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश

इमेज
 वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश मुंबई: वंचित बहुजन आघाडीचा औपचारिकरित्या महाविकास आघाडीत समावेश करण्यात आला. याबाबतचं महाविकास आघाडीने अधिकृत पत्र जारी केले आहे. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होणार की नाही याच्या चर्चा रंगल्या होत्या. गुरूवारच्या बैठकीत मानापमान नाट्यही रंगलं होते. वंचितच्या प्रतिनिधींना बाहेर तासभर उभे केल्याने मविआने अपमान केल्याचा आरोपही वंचिततर्फे करण्यात आला होता. मात्र अखेर आज वंचितचा मविआत समावेश करत असल्याचे पत्र जारी करण्यात आले.  गुरुवारी झालेल्या मुंबईतील महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामील व्हा़वे, यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला असल्याचे या पत्रात म्हटलं आहे.  महाविकास आघाडीची पुढची बैठक ही 2 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी वंचितच्यावतीने प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर हे स्वतः त्यासाठी हजर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.  वंचितची महाविकास आघाडीमध्

पंकजा मुंडे, विनोद तावडे, मिलिंद देवरा राज्यसभेसाठी चर्चेत

इमेज
 पंकजा मुंडे, विनोद तावडे, मिलिंद देवरा राज्यसभेसाठी चर्चेत राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीसाठी महायुती सज्ज; पाच जागांसाठी रणनीती मुंबई : राज्यसभेची निवडणूक जाहीर होताच आता सर्वच पक्षाच्या हालचाली देखील वाढू लागल्या आहेत. महायुतीने तशी तयारी देखील सुरू केली असून, पाच जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठीचा निर्धार महायुतीने केला आहे.  निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होणार्‍या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होत आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गटाने मोर्चेबांधणी देखील सुरू केली आहे. भाजपने तर त्यांच्या तीन उमेदवारांची चाचपणी देखील सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे नाव आघाडीवर असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. विनोद तावडेंसोबतच भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा आहे. आता केंद्रीय नेतृत्व लवकरच नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली आहे.  राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडे हे उत्तम ज

गाडी आडवी मारल्याच्या रागातून समडोळी फाट्यावर तरुणास बेदम मारहाण :

इमेज
 गाडी आडवी मारल्याच्या रागातून समडोळी फाट्यावर तरुणास बेदम मारहाण :  अज्ञात चौघांवर गुन्हा दाखल. सांगली : लक्ष्मी फाटा ते कवठेपेरानकडे जाणार्‍या मार्गावर दुचाकीवरून निघालेल्या तरुणास अडवून गाडी आडवी का मारली या रागातून चौघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. सदर मारहाणीची घटनाही शुक्रवार दि. 26 जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास समडोळी फाट्याजवळ घडली. याप्रकरणी जखमी मोहसीन गुफुर मोमीन (वय 37 रा. भादोले ता. हातकणंगले) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, जखमी मोहसीन मोमीन हे आपल्या कुटुंबियांसह कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले गावामध्ये राहतात. सांगलीतील एका खाजगी रुग्णालयात ते ब्रदर म्हणून काम करतात. शुक्रवार दि. 26 जानेवारी रोजी रात्री काम आटोपून मोमीन हे गावी जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. लक्ष्मी फाटा ते कवठेपिरान कडे जाणार्‍या मार्गावरून जात असताना समडोळी फाट्याजवळ अज्ञात चौघेजण दुचाकीवरून आले. त्यांनी मोमीन यांची दुचाकी अडवून तू आमच्या

नितीशकुमारांनी 50 दिवसांत ’खेळ’ केला

इमेज
इकडं इंडिया आघाडीत असल्याचं दाखवलं अन् तिकडं अमित शहांशी भेटून भाजपशी बोलणी;  नितीशकुमारांनी 50 दिवसांत ’खेळ’ केला पाटणा  : नवीन पात्रं येत आहेत, पण जुने नाटक चालू आहे प्रसिद्ध कवी राहत इंदोरी यांच्या या ओळी बिहारच्या राजकारणावर अगदी चपखल बसतात. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दल सोडून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील झाले आहेत. पुन्हा त्यांचे युतीचे साथीदार बदललेले दिसतील, पण मुख्यमंत्री तेच राहणार आहेत. नितीश कुमार यांनी आज रविवारी (28 जानेवारी) सकाळी जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सोपवल्यानंर नवव्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली.  दीड महिन्यापूर्वी स्क्रिप्ट लिहिली गेली  2022 मध्ये, जेव्हा नितीश कुमार यांनी दुसर्‍यांदा भाजप सोडला आणि आरजेडी, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले, तेव्हा त्यांनी अनेक प्रसंगी सांगितले की त्यांना मरायला आवडेल पण भाजपसोबत जाणार नाही. नितीशकुमारांसाठी हे गेट कायमचे बंद होणार असल्याचेही भाज

नितीश कुमार नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी!

इमेज
 नितीश कुमार नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी! सकाळी राजीनामा, दुपारी पाठिंब्याचं पत्र, संध्याकाळी पुन्हा शपथ;  पाटणा :  कालपासून राजकीय उलथापालथ सुरू आहे. आज या राजकीय घडामोडींना पूर्णविराम लागला आहे. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. नितीश कुमार यांनी भारत माता की जय आणि जय श्री रामच्या घोषणा देत शपथ घेतली. तेव्हा जीतन राम मांझी, चिराग पासवान, सम्राट चौधरी, जेपी नड्डा उपस्थित होते. नितीश यांच्यासह जनता दल (युनायटेड) नेते विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव आणि भाजप नेते सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे बिहारचे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जातेय. बिहारमधील बदललेल्या राजकीय समीकरणात नितीशकुमार यांना आता नवे मंत्रिमंडळ मिळणार असल्याने रातोरात आरजेडीचे मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर पडले आहेत. नितीश कुमार यांनी राजदशी असलेली आपली युती तोडली असून, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. गेल्या दोन वर्षांपासून महाआघाडीच्या रुपात संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि डावे

शरद पवारांनी कधीही राजीनामा दिला नव्हता,

इमेज
 शरद पवारांनी कधीही राजीनामा दिला नव्हता,  अजित पवारांसोबत गेलेले सर्वजण पक्षविरोधी; जयंत पाटलांचा युक्तिवाद मुंबई : शरद पवार यांनी कधीही राजीनामा दिला नव्हता, त्यांनी फक्त इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यासंबंधी कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (यांनी सांगितलं. तसेच अजित पवार गटासोबत गेलेल्या सर्व आमदारांनी पक्षविरोधी कारवाई केली असंही उत्तर त्यांनी दिलं. राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेसंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर युक्तिवाद सुरू आहे. त्यावेळी अजित पवार गटाच्या वतीने जयंत पाटील यांची उलटसाक्ष घेण्यात आली.  त्या आधीच्या यिु्क्तवादात जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील निवडीवर अजित पवार गटाच्या वकिलांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. जयंत पाटील हे निवडून आलेले नव्हे तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष असल्याचा आरोप अजित पवार गटाच्या वकिलांनी केला. तर मी निवडून आलोय, प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्याचं पत्र प्रफुल पटेल यांनी पाठवलं, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं.  वकिलांचे प्रश्न आणि जयंत पाटलाचं उत्तर पुराव्याच

अजित पवार गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदावरून ए. वाय. पाटलांची हकालपट्टी

इमेज
 अजित पवार गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदावरून ए. वाय. पाटलांची हकालपट्टी   हसन मुश्रीफांशी पंगा भोवला बिद्री साखर कारखान्यामध्ये हसन मुश्रीफांविरोधात घेतलेला पंगा ए. वाय. पाटील यांना भोवला आहे. बिद्रीच्या निकालानंतर ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुद्धा रंगली होती.    कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी वैर पत्करून थेट शिंदे गटाशी जवळीक साधलेल्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. अजित पवार गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिद्री साखर कारखान्यामध्ये हसन मुश्रीफांविरोधात घेतलेला पंगा ए. वाय. पाटील यांना भोवला आहे. बिद्रीच्या निकालानंतर ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुद्धा रंगली होती.  ए. वाय. पाटील, अर्जुन आबिटकर यांना पराभवाचा धक्का नुकत्याच झालेल्या बिद्री साखर कारखाना निवडणुकीत दोन खासदार, दोन कॅबिनेट मंत्री, दोन आमदार, पाच माजी आमदार आणि गोकुळ अध्यक्ष अशी तगडी फौज उतरल्यामुळे प्रचंड ईर्षा निर्माण झाली होती. तथापि, बिद्रीच

माळवाडीत व्याजावरील पैशांचा दंड देण्यासाठी पती-पत्नीला घरात घुसून बेदम मारहाण

इमेज
  सांगली : व्याजाने घेतलेले पैसे मुद्दल आणि व्याजासहित परत करून देखील व्याजावरील दंड दिला नाही म्हणून तरुणाच्या घरात घुसून तिघांनी पती-पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली.   व्याजावरील पैशांचा दंड देण्यासाठी पती-पत्नीला घरात घुसून बेदम मारहाण :  माळवाडीतील घटना : महिला सावकारासह तिघांवर गुन्हा दाखल.   सदरची घटना हि रविवार दि. 21 जानेवारी रोजी सकाळी दहा आणि सोमवार दि. 22 जानेवारी रोजी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास माळवाडी येथे घडली. या प्रकरणी जखमी प्रकाश राजाराम मळवडे (वय 26 रा. माळवाडी) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सावकार महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. छाया दानेकरी, प्रशांत दानेकरी आणि अभिजित दानेकरी (सर्व रा. माळवाडी ता. मिरज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.  याबाबत अधिक माहिती अशी कि, जखमी प्रकाश मळवडे हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील माळवाडी मधील जैन बस्ती जवळ राहतात. प्रकाश मळवडे यांनी संशयितांकडून व्याजाने पैसे घेतले होते. सदरची मुद्द्द्ल आणि व्याज प्रकाश मळवडे य

आवटी, बागवानांची पार्श्वभूमी पाहूनच पक्षात घेणार

इमेज
  या लोकांच्या बाबत काय निर्णय घ्यायचा ते अजितदादा मला विचारूनच घेतील, असा विश्वास माजी महापौर व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग राज्य प्रमुख इद्रिस नायकवडी यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला.     आवटी, बागवानांची पार्श्वभूमी पाहूनच पक्षात घेणार  : इद्रीस नायकवडी मिरज प्रतिनिधी  जिल्ह्यातील काही नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले अजितदादांना दररोज हजारो लोक भेटत असतात. मिरजेतील आवटी व बागवान परिवार त्यांच्या भेटीसाठी गेले असले तरी त्यांनी अधिकृत पक्ष प्रवेश केला की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र पक्षप्रवेश ही साधी गोष्ट नसून आम्ही त्या लोकांची पार्श्वभूमी पाहूनच योग्य तो निर्णय घेणार आहोत  इद्रीस नायकवडी पुढे म्हणाले , सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. या सरकारने घेतलेले सर्वच निर्णय हे जनविकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि दूरगामी विकास साधणारे आहेत. यात विशेषता उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यापुढेही यात कोणताही खंड पडणार नाही, असा विश्वास माजी महापौर व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी अल्पसंख

जैन सभेला विजय कासारांचे दातृत्व

इमेज
जैन कासार संस्थेतर्फे विजय कासार यांना दानचिंतामणी पुरस्कार देताना रावसाहेब पाटील, एन. डी. बिरनाळे  जैन सभेला विजय कासारांचे दातृत्व  रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन जनप्रवास । प्रतिनिधी  सांगली : जैन सभेच्या वसतिगृहात शिकून यशस्वी झालेले विजय कासार यांनी सभेला 10 लाखाचे दान दिले आहे. पुन्हा सभेच्या शिष्यवृत्ती निधीला 1 लाख व कोल्हापूर जैन बोर्डिंगला 50 हजाराचे दान दिले. समाजासमोर दातृत्वाचा आदर्श ठेवल्याचे प्रतिपादन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी केले. दिगंबर जैन कासार संस्थेतर्फे विजय कासार यांचा मानपत्राने दानचिंतामणी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रावसाहेब पाटील बोलत होते. जैन सभेच्या उपकाराची जाणीव ठेवून वेळोवेळी दान देऊन सभेचा पर्मनंट देणगीदार म्हणून आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या दातृत्वामुळे दक्षिण भारत जैन सभेचा शिष्यवृत्ती निधी लवकरच 5 कोटीचा टप्पा पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली आहे. प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी कासार हे खरे जैन तत्वज्ञान जगतात. सभेच्या शिष्यवृत्ती निधीला त्यांनी भरभरुन दान दिल्याने त्याचा लाभ अनेक गरजू विद्यार्थ्यांना होत आहे.  यावेळी विजय

RAJU SHETTI : भाजप नेत्यांबरोबर अद्याप चर्चाच नाही : शेट्टी

इमेज
भाजप नेत्यांबरोबर अद्याप चर्चाच नाही : शेट्टी  जनप्रवास । जयसिंगपूर मी भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत, प्रत्यक्ष माझ्याबरोबर कुणी अशी चर्चा केलेली नाही, महाविकास आघाडीकडूनही जागा वाटप झाल्याच्या चर्चा होतात, यामध्ये काहीही तथ्य नसल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी  यांनी दिली आहे. कितीही मोठी ऑफर दिली तरीही हुरळून जाणार नाही, आपण फक्त शेतकरी चळवळीसाठी काम करणार असल्याचं राजू शेट्टी म्हणाले.  मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हे कृत्य लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून राजू शेट्टींसोबत संपर्क साधला जात असून त्यांना महायुतीत सहभागी होण्याची विनंती केल्याच्या बातम्या येत आहेत. त्यावर राजू शेट्टी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, या बातम्या पेरल्या जात आहेत.  अप्रत्यक्षपणे येऊन काही लोक दिल्लीला भेटण्याचा आग्रह करतात. आमचा यामध्ये कोणताही स्वार्थ नाही. महाविकास आघाडीकडून काही ठिकाणी जागा सुटल्याच्या चर्चा होतात. मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे,  आम्ही फक्त शेतकरी चळवळीसाठीच काम करणार. आघाडीतून मत मागाय

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

इमेज
 कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू :  जमिनीचा वाद ; पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सांगली : मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणानंतर माजी सरपंचांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अण्णासाहेब दत्तू सायमोते (वय 58, आपटे मळा, मेन रोड कसबेडिग्रज) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. उत्तरीय तपासणीत त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी संशयित सुनिल चव्हाण, संजय चव्हाण, विनायक चव्हाण, विशाल चव्हाण, विक्रम चव्हाण यांच्याविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मृत सायमोते यांचा मुलगा अविनाश सायमोते याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद फिर्याद दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी येथील शुभम चव्हाण यांची गावातील जमिन संशयित संजय चव्हाण हे करत होते. एक वर्षापूर्वीच शुभम यानी सदरची 27 गुंठे जमिन विक्री करणार असल्याबद्दल मृत सायमोते यांना सांगितले होते. सायमोते यांनी संशयित संज

महाराष्ट्रातील 6 खासदारांसह देशातील 68 खासदारांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार!

इमेज
 नारायण राणे ते अनिल देसाई कार्यकाळ संपणार!  देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं तयारी सुरू केली आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीची लगबग आणि दुसरीकडे राज्यसभेतून 2024 वर्षात तब्बल 68 राज्यभसा खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये 9 केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. आपला कार्यकाळ पूर्ण करुन निवृत्त होणार्‍या खासदारांमध्ये सर्वाधिक खासदार हे उत्तर प्रदेशातील आहेत. तर, महाराष्ट्रातील 6 खासदार महाराष्ट्रातील आहेत. राज्यसभेतून निवृत्त होणार्‍या एकूण खासदारांपैकी सर्वाधिक खासदार भाजपचे आहेत.    राज्यसभेतून निवृत्त होणार्‍या एकूण खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री. व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यसभेतून निवृत्त होणार्‍या या खासदारांना पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळणार का? सध्या मोदी सरकारमध्ये सूक्ष्म लघुउद्योग खात्याची धुरा सांभाळणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं काय होणार? त्य

सांगलीकरांना श्रीराम भक्ती उत्सवाच्या आनंद सोहळ्याचा लाभ सांगलीतच...

इमेज
श्रीराम भक्ती उत्सवाच्या आनंद  सांगलीतच...  -------पृथ्वीराज पाटील  कल्पद्रुम क्रिडांगणावर श्रीराम मंदिर प्रतिकृती उभारणी अंतीम टप्प्यात...   आयोध्या येथील श्रीराम जन्मोत्सव तीर्थक्षेत्र ट्रस्टने बांधलेल्या श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापना दि. २२ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होत आहे. सन १९८६ साली सर्वप्रथम तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी आयोध्येतील श्रीराम मंदीराचे दरवाजे उघडून प्रभू श्रीराम दर्शन प्रश्न संपवला.  प्रभू श्रीराम हे सर्वच भारतीयांना पूज्य आहेत. आयोध्येत जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे असे प्रत्येकालाच वाटते. पण आजघडीला ते शक्य होईलच असे नाही. सांगलीकरांना आपल्या नगरीतच प्रभू श्रीरामाचे दर्शन व्हावे या सदहेतूनी आम्ही नेमिनाथनगर येथे कल्पद्रुम क्रिडांगणावर श्रीराम मंदिराची नयनमनोहारी भव्य प्रतिकृती उभारण्याचा संकल्प केला व त्याचा प्रारंभ राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे. मंदिर उभारणीचे काम अंतीम टप्प्यात आहे.  या मंदिरात रामलल्लांची जी मूर्ती असेल ती प्रत्यक्षात आयोध्या नगरीत विधीवत शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी