MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

सांगलीकरांना श्रीराम भक्ती उत्सवाच्या आनंद सोहळ्याचा लाभ सांगलीतच...

श्रीराम भक्ती उत्सवाच्या आनंद  सांगलीतच... 


-------पृथ्वीराज पाटील 

कल्पद्रुम क्रिडांगणावर श्रीराम मंदिर प्रतिकृती उभारणी अंतीम टप्प्यात... 


 आयोध्या येथील श्रीराम जन्मोत्सव तीर्थक्षेत्र ट्रस्टने बांधलेल्या श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापना दि. २२ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होत आहे.
सन १९८६ साली सर्वप्रथम तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी आयोध्येतील श्रीराम मंदीराचे दरवाजे उघडून प्रभू श्रीराम दर्शन प्रश्न संपवला.




 प्रभू श्रीराम हे सर्वच भारतीयांना पूज्य आहेत. आयोध्येत जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे असे प्रत्येकालाच वाटते. पण आजघडीला ते शक्य होईलच असे नाही.

सांगलीकरांना आपल्या नगरीतच प्रभू श्रीरामाचे दर्शन व्हावे या सदहेतूनी आम्ही नेमिनाथनगर येथे कल्पद्रुम क्रिडांगणावर श्रीराम मंदिराची नयनमनोहारी भव्य प्रतिकृती उभारण्याचा संकल्प केला व त्याचा प्रारंभ राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे. मंदिर उभारणीचे काम अंतीम टप्प्यात आहे. 





या मंदिरात रामलल्लांची जी मूर्ती असेल ती प्रत्यक्षात आयोध्या नगरीत विधीवत शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करुन आणण्यात येणार आहे. याच मूर्तीला घेऊन भक्तीपूर्वक आयोध्येत श्रीराम मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करण्यात येणार आहे. 

दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वा. वसंतदादा समाधीजवळील रामटेकडी श्रीराम मंदिरापासून शोभायात्रा प्रारंभ होऊन ती श्री गणपती मंदिर ते गणपती पेठ - सराफ कट्टा मार्गे कापड पेठ - दत्त मारुती रोड ते शिवाजी पुतळा - रिसाला रोड - पंचमुखी मारुती रस्त्यावरुन सांगली राममंदिर चौकातील श्रीराम मंदीरात समाप्त होईल . लेझीम, झांजपथक व पारंपरिक वाद्यांच्या गजरात रामलल्लांचा जयघोषातील या शोभायात्रेत भगव्या ध्वजासह तिरंगा ध्वज अग्रभागी असेल.





दि. २२ जानेवारी २०२४ रोजी कल्पद्रुम क्रिडांगणावरील मंदिरात विधिपूर्वक रामलल्लांची प्रतिष्ठापना होईल. 
दि. २२ ते २८ जानेवारी या कालावधीत सकाळी ९.०० ते रात्री १०.००वा.पर्यंत दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे. 
सात दिवस श्रीराम भक्ती उत्सवाच्या आनंदाच्या अनुभूतीचा लाभ सांगलीकरांना व्हावा यासाठी दररोज सायंकाळी ६.००वा.विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. २२ जानेवारी रोजी महेश हिरेमठ आणि कलाकार यांचे श्रीराम भजन, २३ जानेवारी रोजी श्रीराम यज्ञ.. रामनाम जपसोहळा व हेमंत जोशी, मुंबई यांचे व्याख्यान, २४ जानेवारी रोजी लोकाभिराम श्रीराम या विषयावर सौ. धनश्री लेले मुंबई यांचे व्याख्यान, २५ जानेवारी रोजी परेश पेठे आणि कलाकार यांचे गीत रामायण, २६ जानेवारी रोजी आयोध्येतील विशेष निमंत्रित पुरोहितांकडून श्रीरामांची महाआरती, २७ जानेवारी रोजी आदित्य संप्रदायी राष्ट्रीय किर्तनकार भागवताचार्य हे. भ. प. योगेश्वर उपासनी महाराज पुणे यांचे श्रीराम किर्तन आणि २८ जानेवारी रोजी लेझर शोध मधून विलोभनीय, नेत्रदीपक श्रीराम दर्शन असे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी दिली.





या श्रीराम भक्ती उत्सवाच्या आनंद सोहळ्याचे मुख्य आयोजक डॉ. पतंगराव कदम फौंडेशन, गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट, पृथ्वीराज पाटील फौंडेशन हे असून उषःकाल अभिनव मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल व मॅग्नेविन कं.हे आयोजन सहाय्यक आहेत.

सांगली आणि परिसरातील ग्रामीण भागात प्रत्येक मंदिरात निमंत्रण पत्रकांचे फलक लावण्यात आले आहेत. निमंत्रण पत्रिका वितरण झाले आहे. आपल्याला आपले वाटणारे राज्य म्हणजे रामराज्य.. रामराज्याची स्थापना हा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच म. गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्याचा लढा यशस्वी झाला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि वंचितांना न्याय ही  प्रभू श्रीरामांच्या आदर्शांची पायाभूत मूल्ये आहेत. या मूल्यांवर आधारित शासन व समाज व्यवस्था निर्मितीला अधिक बळ देणारा हा प्रभू श्रीराम भक्तिचा उत्सव आहे.

 श्रीराम भक्ती उत्सवाच्या आनंद सोहळ्यात सांगलीकरांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन रामलल्लांचे दर्शन
लाभ घ्यावा असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी