MY POSTS
जैन सभेला विजय कासारांचे दातृत्व
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जैन कासार संस्थेतर्फे विजय कासार यांना दानचिंतामणी पुरस्कार देताना रावसाहेब पाटील, एन. डी. बिरनाळे |
जैन सभेला विजय कासारांचे दातृत्व
रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन
जनप्रवास । प्रतिनिधी
सांगली : जैन सभेच्या वसतिगृहात शिकून यशस्वी झालेले विजय कासार यांनी सभेला 10 लाखाचे दान दिले आहे. पुन्हा सभेच्या शिष्यवृत्ती निधीला 1 लाख व कोल्हापूर जैन बोर्डिंगला 50 हजाराचे दान दिले. समाजासमोर दातृत्वाचा आदर्श ठेवल्याचे प्रतिपादन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी केले.
दिगंबर जैन कासार संस्थेतर्फे विजय कासार यांचा मानपत्राने दानचिंतामणी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रावसाहेब पाटील बोलत होते. जैन सभेच्या उपकाराची जाणीव ठेवून वेळोवेळी दान देऊन सभेचा पर्मनंट देणगीदार म्हणून आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या दातृत्वामुळे दक्षिण भारत जैन सभेचा शिष्यवृत्ती निधी लवकरच 5 कोटीचा टप्पा पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली आहे. प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी कासार हे खरे जैन तत्वज्ञान जगतात. सभेच्या शिष्यवृत्ती निधीला त्यांनी भरभरुन दान दिल्याने त्याचा लाभ अनेक गरजू विद्यार्थ्यांना होत आहे.
यावेळी विजय कासार, सरिता कासार, कोकण विभागीय उपाध्यक्ष वृषभ उपाध्ये, महामंत्री अजित शिराळकर, पोपटलाल डोर्ले, सभेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश खोत यांच्यासह कासार समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा