MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

दहशतवाद्याला जेलमध्ये गळा दाबून मारल्याचा आरोप ते 15 गंभीर गुन्ह्यांची नोंद; शरद मोहोळच्या अट्टल ’गुंडगिरी’चा प्रवास



पुणे : पुण्यात आज (5 जानेवारी) भरदिवसा झालेल्या हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. कोथरूडमध्ये अज्ञातांनी केलेल्या गोळीबारत कुख्यात गँगस्टर शरद हिरामण मोहोळ याच्यावर गोळीबार केला. त्याला तातडीने कोथरूड परिसरातील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यात गँगवॉरची चर्चा सुरु झाली आहे. 


 


हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना 

शरद मोहोळच्या हत्येनंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शरद मोहोळवर झालेला हल्ला आर्थिक वादातून टोळी युद्धातील अंतर्गत वैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज असून तपास सुरू असल्याचे पुणे शहर पोलिस आयुक्त रतेश कुमार यांनी सांगितले. कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले की, मोहोळ येथे दुपारी दीडच्या सुमारास तीन ते चार जणांनी गोळीबार केला. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. हत्येनंतर शरद मोहोळचे शेकडो समर्थक ससून रुग्णालयासमोर जमा झाले होते. 

किमान 15 गुन्ह्यांमध्ये अट्टल गुन्हेगार

शरद मोहोळ हा सुमारे 15 गंभीर गुन्ह्यांमध्ये अट्टल दहशतवादी गुंड म्हणून ओळखला जातो. मोहोळ आणि त्याचा म्होरक्या आलोक भालेराव यांच्यावर जून 2012 मध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित सदस्य आणि दहशतवादी खटल्यातील संशयित कतील सिद्दीकी याचा येरवडा तुरुंगात गळा दाबून खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मोहोळ आणि भालेराव या दोघांचीही जून 2019 मध्ये पुण्यातील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. जानेवारी 2010 मध्ये गुंड किशोर मारणेच्या हत्येप्रकरणी शरद मोहोळचेही नाव होते. दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला व त्याच्या सहा साथीदारांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र या शिक्षेविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर 2021 मध्ये उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

शरद मोहोळच्या पत्नीचा भाजपत प्रवेश

किशोर मारणे हा गणेश मारणेचा जवळचा सहकारी होता. पौड रोडवर 4 ऑक्टोबर 2006 रोजी गुंड संदीप मोहोळच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी होता. गणेशला अटक झाल्यानंतर किशोरने टोळी चालवण्यास सुरुवात केली, पण किशोरला शरद मोहोळने संपवल्याचा आरोप आहे. शरद मोहोळची पत्नी स्वातीने भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. शहरातील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये हे जोडपे दिसले होते. कोथरूडमधील स्वरद फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती मोहोळ यांनी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

मोहोळवर पुणे शहर आणि ग्रामीण भागातील विविध पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. येरवडा तुरुंगात इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित दहशतवादी मोहम्मद कतील सिद्दीकी याच्या हत्येप्रकरणी त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. 2011 मध्ये पौड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या अपहरण, खंडणी आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोहोळ आणि इतर सात जणांची पुणे सत्र न्यायालयाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली.

खंडणी विरोधी सेल (युनिट 2) ने शरद मोहोळ टोळीच्या सदस्यांना खंडणी आणि अपहरण प्रकरणात अटक केली. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती. त्यांनी दोन महिलांचे अपहरण करून पैसे उकळण्याच्या प्रयत्नात त्यांना धमक्या दिल्या होत्या. टोळीच्या सदस्यांनी एका 75 वर्षीय महिलेचे आणि पीडित महिलेचे अपहरण करत 17 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. बाबूलाल लक्ष्मण मोहोळ (45), अमर नंदकुमार मोहिते (39), प्रदीप प्रभाकर नलवडे (38), अक्षय मारुती फड (24) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी