MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी जबाबदारी पार पाडली नाही, त्यांच्यावर कारवाई करणार; शरद पवारांचा इशारा



मुंबई: अजित पवारांच्या शपवविधीला उपस्थिती राहणं आता राष्ट्रवादीचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना भोवणार असल्याचं दिसतंय. प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती मी केलीय, त्यांनी त्यांना दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नाही असं सांगत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (डहरीरव झरुरी जप Aक्षळीं झरुरी) सांगितलं. तसेच सुनिल तटकरे यांनीही त्यांची जबाबदारी पार पाडली नाही, त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, यापुढे पक्ष वाढवण्यासाठी दौरे करणार असंही ते म्हणाले.

अजित पवारांनी आज शिंदे-भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असून आज त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. अजित पवारांना राष्ट्रवादीच्या 37 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. अजित पवारांच्या आजच्या शपथविधीला राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुनिल तटकरे हे उपस्थित होते. या सर्व घडामोडींवर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीवर बोलताना शरद पवार म्हणाले की, मी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. पक्ष योग्य पद्धतीने चालावा यासाठी मी प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. पण प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नाही. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. 

गेलेल्यांच्या राजकीय भविष्याची मला चिंता

राष्ट्रवादीचे बडे नेते अजित पवारांसोबत गेले असून त्यांतल्या आठ जणांनी शपथ घेतली. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, एकेकाळी माझ्यासोबत 56 आमदार होते. त्यापैकी 50 जण मला सोडून गेले. एका क्षणात मी फक्त सहा आमदारांचा नेता झालो. त्यानंतर मी महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचलो, माझी भमिका मांडली. त्यानंतरच्या निवडणुकीत सोडून गेलेल्या 50 पैकी चार ते पाच जणच निवडून आले, बाकी सगळे पडले. आताही मला सोडून गेलेल्यांची मला चिंता नाही. जे सोडून गेलेत त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता आहे.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी