MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

सांगलीकरांनी वाढवली प्रदेशाध्यक्षपदाची उंची


जनप्रवास । दिनेशकुमार ऐतवडे

सांगली :  मला आता पक्षाची जबाबदारी द्या, बघा पक्ष कसा पळवितो, असे विधान नुकतेच राष्ट्रवादीचे नेते  अजित पवार यांनी मुंबईतील बैठकीत केले आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली ती प्रदेशाध्यक्षपदाची. सध्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असल्याने सांगली आणि राज्यात जयंत पाटील यांच्या समर्थकांनी जयंत पाटील यांनी पक्षवाढीसाठी काय काय केले आहे, आणि राज्यात पक्ष किती विस्तारला आहे, याच्या माहितीची रकानेच्या रकाने सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.  

सांगलीकरांना प्रदेशाध्यक्ष पद हे काय नवीन नाही. आजपयंर्ंत जिल्ह्यातील वसंतदादा पाटील, गुलाबराव पाटील, शिवाजीराव देशमुख, आर. आर. पाटील, पै. संभाजी पवार प्रा. शरद पाटील आणि जयंत पाटील यांनी वेगवेगळ्या पक्षांचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले आहे. या सर्वांनीच प्रदेशाध्यक्ष पदाला तर न्याय दिलाच शिवाय या नेत्यांमुळे प्रदेशाध्यक्ष पदाची उंचीही वाढली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

1952 च्या निवडणुकीपासून राज्याच्या राजकारणात सक्रीय झालेल्या वसंतदादा पाटील यांना 1966 मध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली. 1967 मध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. प्रदेशाध्यक्ष असल्याने दादांच्या नेतृत्वाखालीच या निवडणुका लढविण्यात आल्या. राज्यात त्यावेळी 270 जागा होत्या. दादांनी संपूर्ण राज्य प्रचाराने पिंजून काढले आणि 203 जागांवर काँग्रेसचा विजय झाला. पाच वर्ष दादा प्रदेशाध्यक्ष होते. पाच वर्षानंतर दादांना विधानपरिषदेवर घेण्यात आले. पाच वर्षात दादांनी संपूर्ण महाराष्ट्रभर काँग्रेसची पाळेमुळे घट्ट केली. त्याच बरोबर बर्‍याच ठिकाणी दादा गटही निर्माण झाला.

दादांच्या बरोबरीने राज्यात काँग्रेसमध्ये आपले स्थान पक्के केलेल्या गुलाबराव पाटील यांनीही काही काळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद भूषविले आहे. विधानसभेवर कधीही न गेलेल्या गुलाबराव पाटील यांना काँग्रेसने 1966 ते 1978 असे दोन टर्म राज्यसभेवर संधी दिली होती. 1983 ते 1987 मध्ये ते विधान परिषदेवरही होते. दरम्यानच्या काळात 1981 मध्ये त्यांना काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी संधी दिली. एक वर्षच प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या गुलाबराव पाटील यांनीही पदाला चांगला न्याय दिला होता. राजकारणाबरोबरच त्यांनी सहकारावरही आपली वेगळा ठसा उमटविला. सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून त्यांच्याकडे आजही पाहिले जाते.

सांगली जिल्ह्यातील आणखी एक ज्येष्ठ नेते

शिराळाचे शिवाजीराव देशमुख यांनीही 1992 ते 93 एक वर्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले. 1978, 1980, 1985 आणि 1990 मध्ये विधानसभेवर गेलेल्या शिवाजीराव देशमुख कांना 1992 मध्ये काँग्रेस

1986 मध्ये दादा घराण्याला धक्का देवून राजकारणात आलेल्या पै. संभाजी पवारांनीही जनता दलाचे प्रदेशाध्यक्षपदी काम केले आहे. एकेकाळी जनता दल प्रमुख विरोधी पक्ष म्हणून कार्यरत होता. संभाजी पवार यांनी आपली सांगलीची जागा कायम राखत राज्यात जनता दल वाढविण्यासाठी चांगले काम केले होते. संभाजी पवार आणि प्रा. शरद पाटील ही जनता दलाची जोडगोळी राज्यात चर्चेत होती.

प्रदेशाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्यांनीही प्रदेशाध्यक्ष पदावर चांगले काम केले. डोंगरी विभागाचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जाते.

तरूणांच्या गळ्यातील ताईत असलेले तासगावचे आर. आर. पाटील यांनीही जिल्हा परिषद सदस्य ते उपमुख्यमंत्री असा राजकीय प्रवास केला. राष्ट्रवादीची स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये त्यांना मानाचे स्थान होते. शरद पवारांनी त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली. आपल्या मधूर वाणीतून श्र्रोत्यांना आपलेसे करणार्‍या आबांनी राष्ट्रवादी पक्ष सर्वत्र रूजविला. एक सर्वसामान्य घरातून आलेला युवक शरद पवारांनी हेरला आणि राष्ट्रवादीच्या वाढीसाठी आबांचा उपयोग करून घेतला. आबांनीही आपल्या आरोग्याची पर्वा न करता पक्षासाठी जीव ओतून काम केले.

आबांच्या नंतर जिल्ह्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे आली. जयंत पाटील यांनीही पक्षात मानाचे स्थान मिळविले आहे. सध्या जयंत पाटील गेल्या पाच वर्षापासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपदी आहेत. वेगवेगळे उपक्रम राबवून जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी संपूर्ण ग्रामीण भागात पसरविला. अनेक युवा नेत्यांना राजकारणाची दारे उघडून देवून त्यांना पक्षात काम करण्याची संधी दिली. पक्षाध्यक्ष असल्याने अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही त्यांनी कधी दुखविले नाही. राज्यात वसंतदादा आणि आबांनंतर जयंत पाटील हेच राज्यातील सर्व जिल्ह्यात पोहोचलेले नेते आहेत. सलग सात वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा मान त्यांना मिळाला आहे.

मिरजेतून विधानसभेवर निवडून गेलेले प्रा. शरद पाटील यांनीही आपल्या परीने आपल्या पक्षाला न्याय देण्याचा प्रयत्न  केला आहे. गेली कित्येक वर्ष ते जनता दर सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष आहेत. एकेकाळी राज्यावर राज्य करणार्‍या या पक्षाची छकले उडाली असून, सध्या एकही आमदार या पक्षाचा नाही. तरीही प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपल्या विचारांशी बांधील राहून सर्वसामान्यांसाठी कायम लढा देणार्‍या शरद पाटील यांनी जिल्ह्यात काही अंशी पक्ष जिवंत ठेवला आहे. मिरज मतदार संघ राखीव झाल्याने प्रा.शरद पाटील यांना जागा गमवावी लागली. परंतु शरद पाटील यांनी हार न मानता पुणे पदवीधर मधून निवडून आले. प्रकाश जावडेकरांचा पराभव करण्याचा मान त्यांना मिळाला आहे.

वसंतदादा पाटील, गुलाबराव पाटील, शिवाजीराव देशमुख, आर. आर. पाटील, जयंत पाटील, शरद पाटील यांनी आपआपल्या पक्षाला उंचीवर नेउन ठेवले आहे. पक्षाबरोबर एकरून होउन पक्ष जिवंत ठेवण्याचे काम सांगलीच्या या प्रदेशाध्यक्षांनी केले आहे.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी