MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

सत्ताबदल व्हावं ; मनबदल वा विचारबदल नकोच?


अंकुश शिंगाडे नागपूर ९३७२३५९४५०
         
 सत्तेसाठी पक्षबदल. तसं सत्ताबदल व्हायला नको. सत्ताबदल ही आपल्याला लागलेली पुरातन काळातील कीड आहे. पुर्वी लोकं वतनासाठी असे दल बदलायचे. त्यातच कोणी देशातील स्वराज्यात राहात तर कोणी मुघलांना मिळत. तीच स्थिती आजही अस्तित्वात असलेली दिसते. आजही या देशात तोच प्रकार. सत्तेसाठी राजकारण आणि फितुरी. फितुरीनंच आपले पुर्वज मारले गेले तरीही. आपलं कितीतरी नुकसान झालं तरी
ही......तरीही आपण सुधारलो नाही आणि आता तर वाटतं की आपण कधीच सुधारणारही नाही. कारण आपले मन बदल व विचार बदल झालेले आहे.
           आज देशातील काही शहाणे व काही लोकांची परिस्थिती अशी आहे की मुर्खाच्या बाजारात मुर्खांचीच चांदी. गुणवत्ता मात्र लुप्त होतांना दिसत आहे. हे मुर्ख सत्ताही गाजवतात. ते सत्तेवर बसतात. कारण ते चमचेगिरी करीत असतात. चमचेगिरी कशासाठी? तर त्यांना काहीच येत नाही यासाठी. शिवाय मंत्रीपद मिळावं म्हणून. मग मंत्रीपद मिळताच त्यांचं खाजगी राजकारण यशस्वीही होतं. कारण काम त्यांना करावं लागत नाही. काम करीत असतो अधिकारी वर्ग. तो अधिकारी वर्ग तेवढा हुशार असावा. 
          चमचेगिरी करणारा व्यक्ती राजकारणच नाही तर सर्वच आघाड्यांवर पुढं जात असतो. कारण प्रशासनाला विरोधात असणारी माणसं हवी नसतात तर त्यांच्या हो ला हो मिळविणारी माणसं हवी असतात. ते सत्तेत असतातही. परंतु त्यांच्या कोणत्याही विचारांना वाव नसतो. ते मत विचारात घेतलं जात नाही.  तसा त्यानं प्रयत्नही केला तरी त्याचं चालत नाही आणि तसा विरोध करण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला त्या मंत्रीपद मारुन हटवलं जातं. ते मंत्रीपदावरुन हटले की मग चूप बसतात. कारण त्यांना तेवढा विचार करायला लावणारा मेंदूच नसतो. तो मेंदू सक्रीय नसल्यानं सर्व समस्या निर्माण होते. 
           या सत्तेच्या दलदलीत जो व्यक्ती हुशार असतो. त्याला सत्ता एकतर मिळत नाही. कारण तो व्यक्ती ना चमचा असतो ना तो व्यक्ती चापलुसी करतो. अशावेळेस त्या व्यक्तीला वर जातांना वा मंत्रीपद मिळवतांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. जर त्याला मंत्रीपद मिळालं तर त्याचा वापर तो जनतेच्या लाभासाठी पुरेपूर करुन घेतो. तो विरोध करतो वाईट धोरणाचा. परंतु अशानं त्याचा देशातील वाईट गोष्टीसाठी होत असलेला विरोध लक्षात घेवून त्याला मंत्रीपदावरुन हटवलं जातं. यातच त्या व्यक्तीच्या मनात सुडाची भावना वाढीस लागते व तो ते मंत्रीपद जाताच वाईट कामं करायला लागतो. मग तो देशहिताचाही विचार करीत नाही. या गणतीच चांगले चांगले हुकूमशहा झाले की ज्यांनी फक्त नि फक्त देशाला बरबाद केलं. त्यात लादेन, हिटलरसारख्या ब-याच लोकांचं नाव घेता येईल. 
           देशात असेच काही मुर्ख.  वरच्या वर्गाची आपल्यावर खप्पामर्जी होवू नये म्हणून यांची चमचेगिरी. हे झालं राजकारणातील. देशात असेच काही मुर्ख आहेत की जे आज सरकारी नोकरीत आहेत. ज्यांना काहीच येत नाही. परंतु चमचेगिरीनं व वशिलतेबाजीनं ते वरच्या पोष्टवर आहेत व हुकूमत गाजवत आहेत. तिही मंडळी आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या व्यक्तीच्या हुशारीपणाचा फायदा करुन घेत नाहीत व आपल्या क्षेत्राचा विकास करीत नाहीत. उलट त्यांना अक्कल नसल्यानं आपल्याकडे आलेल्या अधिकाराचा गैरवापर करतात नव्हे तर अशा हुशार व्यक्तींना त्रास देत असतात. तसंच त्यांना संपविण्याचा विचार करीत असतात. 
          देशाचा नाही तर जगाचा विचार केल्यास जगात जसे असे कित्येक मुर्ख आहेत की जे ज्यांच्या हाती सत्ता आहे. ते सत्तेचा उपभोग घेतात. त्या सत्तेचा उपभोग घेत असतांना त्यांना सत्तेबद्दल काहीच समजत नसल्यानं ते त्या सत्तेचा वापर विलासीपण व चैन भोगण्यासाठी करतात. त्या चैन भोगाच्या परीस्थितीला ज्या ज्या लोकांनी विरोध केला. त्याला त्याला ती मंडळी संपवूनही टाकतात. परंतु अशानं व्यक्तीच संपत नाही तर ती सत्ताही संपते. विचारशक्ती शुन्य असल्यानं एखाद्या शत्रुनं आक्रमण केल्यास त्यांना काय प्रतिउत्तर द्यावं ते कळत नाही. मग शत्रुंचं आक्रमण थोपवता न आल्यानं ते राज्य आपोआपच शत्रुंच्या घशात जातं नव्हे तर त्या शत्रुंचा त्रास हा जनतेलाही होत असतो. हे का घडतं? हे घडतं मुर्खपणानं. मुर्खानं संगत मुर्खाशीच केल्यानं असं घडतं. 
          सुसंगती सदा घडो असं म्हटलं जातं. चांगल्या माणसांच्या संगतीत चांगलेपण गवसतं, वाईटपण नाही. परीसाच्या संगतीत राहून लोखंडाचंही सोनं बनतं. चंदन जिथं असेल, तेथील परीसरही चंदनमय होतो. तशीच गोष्ट आहे हुशार माणसांची. हुशार माणसांच्या संगतीत बुद्धूही हुशार बनतो.
            आज आपल्या इतिहासाचा विचार केल्यास जे काही शासक झाले. त्या शासकांपैकी जे विलासी व चैनबाजीचे शासक होते. ते राज्य लयास गेलं व त्या चैनबाज्याही लयास गेल्या. परंतु जे शासक हुशार होते. त्यांचे राज्य वाढले. कारण त्यांनी त्यांच्या राज्यातील हुशार लोकांचा फायदा आपला राज्यकारभारात राज्यकारभार चालविण्यासाठी केला. जसं अकबर बादशाहानं आपलं राज्य वाढवलं. कारण तो हुशार होता नव्हे तर त्यांच्या दरबारातील नवरत्नही हुशारच होते. त्याचा वापर त्यांना आपलं राज्य वाढविण्यासाठी झाला. म्हणतात की जेव्हापर्यंत बिरबल जीवंत होता. तेव्हापर्यंत अकबर टिकला. त्यानंतर म्हणजे औरंगजेबानंतर आलेले शासक हे चैनीचे असल्यानं एवढं वाढलेलं साम्राज्य लयास गेलं. तेच घडलं देवगिरीचा सम्राट कृष्णदेवरायांच्या राज्यात. त्यांच्या राज्यात तेनालीराम हुशार होता. तेव्हापर्यंत राज्य सुरक्षीत होतं. 
           महत्वाचं म्हणजेच हुशार व्यक्तींमुळं राज्याचा विस्तारच होत नाही तर देशाचा विकासही होतो. परंतु त्याची पारख व्हायला हवी. त्याची पारख तोच करतो. जो हुशार असतो. परंतु असा हुशार व्यक्ती सत्तेवर बसायला हवा आणि त्यानं हुशार व्यक्तींनाच आपल्या मंत्रीमंडळात स्थान द्यायला हवं. तसाच त्या व्यक्तीच्या हुशार गुणांचा वापर करुन घ्यायला हवा. तरंच त्या राज्याचा विस्तार होवू शकतो वा त्या देशाचा विकास होवू शकतो. अन्यथा ते राज्य लयासही जावू शकते किंवा तो देशही लयास जावू शकतो. हा आहे हुशार लोकांचा महिमा. 
           देशात मुर्ख लोकांची काही कमी नाही. ते जागोजागी सापडतात. परंतु हुशार. ते सापडत नाहीत, ते बोटावर मोजता येण्यासारखे आहेत. त्यांचा शोध घ्यावा लागतो. ते परीसरातच असतात. कोळशात लपलेल्या हि-यासारखे. परंतु त्यासाठी जडजवाहीर हवा की जो या कोळशात लपलेल्या हि-याचा शोध घेईल. तो शोध घेतल्या गेला की बस काम संपलं. तो हिराच कोहिनूर सारखा ठरतो. जो आपल्या देशाची शान वाढवीत असतो. 
           महत्वाचं म्हणजे सत्ता ही अलीकडे स्वार्थाधिशांची मालमत्ता बनत चालली आहे. या सत्तेत लोभ तर एवढा चरणसीमेवर गेला आहे की ज्याबद्दल न बोललेलं बरं. तसाच  राजकारणात रस उरलेला नाही. असं दिसत आहे. शरद पवारसाहेब हे गाजलेलं व्यक्तीमत्व होतं. ते हुशार व्यक्तीमत्व होतं. त्यामुळंच त्या काळात सहकार व कृषी क्षेत्र सुधारलं. तेच बाळासाहेबांनीही केलं व सत्ता वाढवली. त्या दोघांनीही उमेदीच्या काळात राजकारणाची धुरा पेलली  सत्तालोभ का असेना, परंतु शरद पवारानं १९७० च्या दशकात आपले चाळीस आमदार फोडून मुख्यमंत्रीपद बळकावलं व पस्तीस वर्षाच्या काळात मुख्यमंत्रीपद मिळविणारा तो एक मोठा नेता बनला. चांगले कामं करण्यासाठी ते उचललेलं शरद पवार साहेबांचं पाऊल होतं. परंतु अलीकडं तसं राजकारण नाही. फक्त लोभ आणि इडीची भीती. यामुळंच आज सत्ताबदल व पक्षबदल होत आहे. यात पदलालसाही आहे आणि अभयही आहे. म्हणूनच हा पक्षबदल आहे. पर्यायानं सांगायचं म्हणजे पक्षबदल निश्चीतच व्हावा. कारण स्वतंत्र्य भारतानं आपल्याला स्वतंत्र्य विचार करायला संधी दिली आहे. परंतु ती संधी आपल्याला स्वतःला स्वतःच्या मनात लालसा निर्माण करुन आपला स्वार्थ साधण्यासाठी दिली नाही. तसंच घाबरण्यासाठीही दिलेली नाही. असा स्वार्थ साधून आपलाच विकास करण्यासाठी दिलेली नाही. तर ती संधी दिली आहे आपल्या देशाचा,  आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी. परंतु आज असं दिसतं की एका एका नेत्यांच्या घरची मालमत्ता अब्जोच्या घरात आहे. कुठून आला हा पैसा? त्याचा विचार होणे गरजेचे आहे. तो विचार होत असतांना पटकन सत्ताबदल. ही बाजू जमेची बाजू नाही. हे झालं राजकीय लोकांचं. त्यांच्या घरी मालमत्ता आहे व जी मालमत्ता विदेशात असून गुप्त स्वरुपात आहे. परंतु तेवढीच मालमत्ता ही आम लोकांचीही आहे. ज्यांचे या राजकीय लोकांशी लागेबांधे आहेत. तेव्हा ही मालमत्ता कुठून येते? ही मालमत्ता येते भ्रष्टाचार करुन. आपला देश हा भांडवलशाहीचा असून मुक्त व्यापाराचं उदात्त धोरण भारतानं स्विकारल्याने अशी मालमत्ता देशातील लोकांना गोळा करता येते व ज्याचे बळी राजकीय पक्ष ठरतात. तसंच त्या मुक्त व्यापाराच्या भांडवलशाही भट्टीत सामान्य जनता भरडली जाते. 
           महत्वाचं म्हणजेच तुम्ही भीतीनं पक्ष बदलवा नाहीतर लालसेने. सामान्य लोकांना त्याचं काही घेणं देणं नाही. सामान्य लोकांचं एवढंच म्हणणं की चांगलं काम करा. आम्हाला चांगलं ते द्या. मुर्खासारखा व्यवहार करु नका. आम्हालाही हव्यात आमच्या मुख्य गरजा पुर्ण करणारे मंत्रीगण अन्न, पाणी आणि निवारा पुर्ण करणारे. आम्हाला स्वस्त अन्न, शुद्ध पाणी आणि राहायला लहानसं घर हवं? ज्यात मायेचा ओलावा टिकावा आणि नात्याचे संबंध दृढ होतात. मायबापानं मुलांना ओळखावं व मुलांनी मायबापांना. बस एवढंच पुरेसं. कारण कोणीही कितीही मालमत्ता असली तरी उरावर मांडून नेत नाही. सगळं इथलं इथंच ठेवावं लागतं. हीच वास्तविकता आहे. मग कशासाठी हवी एवढी मालमत्ता? हा विचार सत्ताधिशांनीही करणे गरजेचे आहे व त्यानुसार तसे पावले टाकणेही तेवढेच गरजेचे आहे. हे तेवढंच सत्य आहे. सत्ताबदल व्हायला हवं. परंतु मनबदल वा विचारबदल व्हायला नको? कामं करण्यासाठी सत्ताबदल आवश्यक. तेही चांगली कामं करण्यासाठी. वाईट कामं करण्यासाठी वा भीतीसाठी वा सत्ताप्राप्तीसाठी सत्ताबदल नको. आपल्याला माहीत आहे की आपल्याच देशात भगतसिंग, राजगुरु व सुखदेवसारखे इतर बरेच क्रांतिकारक  तसंच संभाजी राजेही मरण पावले. परंतु मनपरीवर्तन वा विचारसरणीत त्यांनी बदल केला नव्हता.  

          

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी