SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्या कुपवाडमधील तरूणास अटक

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माझे मामा आहेत, माझे कौटुंबिक काम असल्याने त्यांची मुंबईत भेट घेतली होती. याचा अर्थ मी त्यांचा समर्थक आहे असा नाही. मी शरद पवार साहेब व आ.जयंत पाटील यांच्या बरोबरच आहे. मात्र भविष्यात महापालिकेसाठी आवश्यक असलेल्या निधीसाठी व प्रलंबित शंभर कोटींसाठी लवकरच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेणार असल्याचा खुलासा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
राष्ट्रवादीला खिंडार पाडून अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर शरद पवार व अजितदादा पवार गटाकडून शक्तीप्रदर्शन सुरू असताना महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी अजितदादा पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे मनपा क्षेत्रात खळबळ उडाली.
यावर खुलासा करताना महापौर सूर्यवंशी म्हणाले, मी उपमुख्यंमत्री अजितदादा पवार यांची मुंबईत भेट घेतली. ते माझे मामा लागतात. माझे घरगुती काम होते. त्यामुळे त्यांची भेट घेतली. याचा अर्थ मी त्यांचा समर्थक झालो असे होत नाही. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री सुरेश खाडे यांना देखील भेटलो होतोच, म्हणजे मी त्यांच्या पक्षात जाणार असे नाही.
हेही वाचा
2008 पासून शरद पवार व आ.जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजकारण करत आहे. येथून पुढे देखील त्यांचेच नेतृत्व मानून काम करणार आहे. कौटुंबिक संबंध आणि राजकारण हे वेगळे असते. काहींनी मध्यस्थी केली म्हणून वावड्या उठत आहेत. आम्हाला मध्यस्थीची गरज नाही. आमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे खोट्या बातम्या पसरवू नये, असा खुलासा त्यांनी केला. शिवाय भविष्यात महापालिका विकास कामांसाठी आवश्यक असणार्या निधीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेणार आहे. शिवाय शंभर कोटींचा प्रलंबित निधी मिळावा म्हणून देखील उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेऊन प्रयत्न करणार असल्याचे महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा