MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

गेल्या 46 वर्षात केवळ 13वर्षेच दादा घराणे विधानसभेत

 


..

 दिनेशकुमार ऐतवडे

सध्या सर्वच पक्ष 2024 मध्ये येणार्‍या लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकाही लोकसभेबरोबरच होतील, असे संकेत मिळत आहेत. काँग्रेसने मुंबईमध्ये राज्यातील सर्वच लोकसभा उमेदवारीसाठी आढावा बैठक घेतली. सांगलीची बैठक सुरू असतानाच जयश्री पाटील यांनी आपण सांगलीतून विधानसभेसाठी इच्छुक आहोत, असे सांगितले. गेल्या वेळी मी इच्छुक होते, परंतु मला डावलले असे त्या म्हणाल्या, दादा घराण्यावर अन्याय नको, असेही त्या म्हणाल्या. त्यातून वेगवेगळ्या चर्चेला उत आला. परंतु दादा असतानाही आणि त्यांच्या पश्चातही गेल्या 46 वर्षात केवळ 13 वर्षेत आपल्या घरात आमदारकी ठेवण्यात दादा घराण्याला यश आले आहे. 

महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री, राजस्थानचे राज्यपाल आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणिस राहिलेल्या सांगलीच्या डॉ. वसंतदादा पाटील यांनी राज्यात मोठी झेप घेतली होती. वसंतदादा पाटील यांचे दिल्लीत मोठे वजन होते. इंदिरा गांधी यांच्या खुनानंतर राजीव गांधींना पंतप्रधान करण्यात वसंतदादांचा मोठा वाटा होता. दादांच्या पश्चात दादा घराण्याने म्हणावी तशी कात टाकली नाही. दादांच्या नावावर त्यांच्या वारसांना खासदार होता आले परंतु सांगलीची विधानसभा  मात्र दादा घराण्याच्या नशिबात कमीच राहिली.  

वसंतदादांनी 1952, 1957 आणि 1962 या तीन निवडणुका जिंकून हॅट्रीक केली होती. त्यानंतर विधानसभेला ते थेट 1978 मध्ये उतरले. 1980 च्या निवडणुकीत शालिनीताई पाटील आणि 2004 च्या निवडणुकीत मदन पाटील यांनी आमदारकी भोगली. त्यामुळे 1978 पासून 2024 पर्यंत दादांनंतर केवळ दोघांनाच विधानसभेवर जाण्याची संधी मिळाली.

1967 पर्यंत 15 वर्ष आमदार राहिलेल्या वसंतदादा दरम्यानच्या काळात लोकसभा आणि विधानपरिषदेवर होते. 1978 साली झालेल्या निवडणुकीत सांगलीतून पुन्हा एकदा वसंतदादा विजयी झालेे. त्यांनी जनता पक्षाच्या भरमगोंडा खोत यांचा पराभव केला. दोन वर्षातच पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्र सरकार बरखास्त केले आणि 1980 मध्ये पुन्हा राज्याच्या निवडणुका लागल्या.

1980 मध्ये दादा लोकसभेवर खासदार असल्याने त्यांनी सांगलीतून शालिनीताई पाटील यांना संधी दिली. शालिनीताई पाटील यांनी समाजवादी काँग्रेसच्या पै.नामदेवराव मोहिते यांचा पराभव केला.

1985 मध्ये दादा पुन्हा एकदा सांगलीतून निवडून आले. त्यांनी हरिपूरच्या पै.नामदेवराव मोहिते यांचा दुसर्‍यांदा पराभव केला. सत्ता आल्यानंतर दादांना मंत्रीपद मिळाले नाही. केवळ आमदार म्हणून राहणे त्यांना पसंत पडले नाही. राजीव गांधींनी त्यांची नेमणूक राजस्थानच्या राज्यपालदी नेमणूक केली. एक वर्षातच 1986 मध्ये सांगलीची पोटनिवडणूक लागली आणि येथूनच पै. संभाजी पवारांचा काळ सुरू झाला.

दादा हयात असताना सांगलीची जागा गेली

दादा राज्यपाल असताना 1986 मध्ये दादांचे पुतणे विष्णुअण्णा पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. परंतु नवख्या असलेल्या बिजलीमल्ल संभाजी पवारांनी त्यांचा पराभव केला. 1952 पासून दादांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला विजयाचा सिलसिला येथे थांबला. 1989 मध्ये वसंतदादांचा मृत्यू झाला. त्यानंतर 1990 मध्ये पुन्हा एकदा विष्णुअण्णांचा पराभव झाला. 1995 मध्ये काँग्रेसची उमेदवारी प्रकाशबापुंना मिळाली. मदन पाटील यांनी बंडखोरी केली. एकाचवेळी संभाजी पवारांनी दोघांचा पराभव केला. संभाजी पवारांनी विष्णुअण्णा, प्रकाशबापू आणि मदन पाटील याां तिघांचाही पराभव केला आहे.

1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली होती. विष्णुअण्णा घराणे राष्ट्रवादीत होते. प्रकाशबापू काँग्रेसमध्ये होते परंतु ते खासदार होते. त्यामुळे विधानसभेचे तिकीट सांगलीवाडीच्या दिनकर पाटील यांना मिळाले आणि ते निवडून आले. त्यानंतर 2004 मध्ये मदन पाटील यांनी बंडखोरी केली आणि निवडून आले. 1986 नंतर 18 वर्षानंतर दादा घराण्याला आमदारकीची संधी मिळाली.

त्यानंतर पुन्हा 18 वर्षे झाली तरी अजून दादा घराण्याला आमदारकीची संधी मिळाली नाही. 2009 मध्ये पुन्हा एकदा संभाजी पवार, 2014 आणि 2019 मध्ये भाजचे सुधीर गाडगीळ यांनी बाजी मारली आहे.

आता पुन्हा एकदा दादा घराण्यातील जयश्र्रीताई पाटील यांनी आमदारकीसाठी इच्छुक आहेत. त्यांना तिकीट मिळणार की नाही हे अजून गुलदस्त्यात आहे. जरी उमेदवारी मिळाली तरी  गेल्या 18 वर्षापासून सुरू असलेला दादा घराण्याचा दुष्काळ ते संपविणार की नाही हे 2024 च्या विधानसभा निवडणुकीतच कळेल.

सहकार महर्षी म्हणून ख्यातनाम असलेल्या स्व. विष्णुअण्णा पाटील यांचा जिल्ह्यात तसाच राज्यात मोठा दबदबा होता. परंतु आयुष्यात त्यांना विधानसभेवर जाता आले नाही. अखेरपर्यंत त्यांना ही सल बोचत होती. 1995 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मानणारे 5 अपक्ष आमदार जिल्ह्यात निवडून आले होते. परंतु सांगलीची जागा त्यांना मिळाली नाही. एकेकाळी राज्याचे राजकारण सांगलीतून चालायचे राज्यात कुणाला उमेदवारी द्यायचे हे सांगलीतील दादा घराण्यात ठरले जायचे. परंतु दादांच्या पश्चात राज्याचे दूरच सांगलीची जागा टिकविण्यात दादांच्या वारसांना यश आले नाही.

दादांची राजकारण करण्याची पध्दत आणि त्यांच्या नंतर त्यांच्या वारसांची राजकारण करण्याची पध्दत यात जमीन आसमानचा फरक होता. वाड्यावस्त्यावर जावून दादा सर्वसामान्य लोकांशी हितगुज करीत असत. त्यांच्या सुखदुखात ते सामिल होत असत. अगदी त्याच्या उलट नंतर घडत गेले. दादांनी स्थापन केलेल्या संस्थां जरी आज सुरू असत्या तर कार्यकर्त्यांची रिघ दादा घराण्यापुढे लागली असती. परंतु आजच्या घडीला एकही संस्था सुरू नाही. कारखानाही दुसर्‍याला चालवायला दिले आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि दादा घराणे यांची नाळ तुटली आहे. केवळ सोनरी टोळीच्या जिवावर त्यांचे राजकारण सुरू आहे.

72 वर्षात दादा घराणे 28 वर्षे विधानसभेवर

वसंतदादा पाटील 1952 ते 67, पुन्हा 1978 ते 80 आणि 1985 ते 86 असे एकूण 18 वर्षे विधानसभेवर होते. शालिनीताई पाटील 1980 ते 85 पाच वर्षे विधानसभेवर तर मदन पाटील 2004 ते 2009 असे पाच वर्षे विधानसभेवर होते. अशा तर्‍हेने दादा घराणे 1952 पासून आजअखेर 72 वर्षात केवळ 28 वर्षेच विधानसभेवर आहेत. दादांच्या पश्चात पाहिले तर 1986 पासून दादा घराण्याला 2004 चा अपवाद सोडला तर विधानसभा गाठता आले नाही, याला जनता नाही तर बर्‍यापैकी ते स्वत:च जास्त कारणीभूत आहेत.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी