MY POSTS
अभिमानास्पद... चांद्रयान मोहिमेत सांगलीकरांचा वाटा : यानाच्या सुट्या भागांचे कोटिंग बनवले सांगलीतील कारखान्यात.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
देशाला अभिमान वाटावा अशा ‘चंद्रयान अभियानात सांगलीच्या उद्योजकानेही हातभार लावला. यानाच्या सुट्या भागांचे कोटिंग सांगली औद्योगिक वसाहतीतील संदीप सोले यांनी केले आहे.. गेली तीस वर्षे केवळ संरक्षण आणि अंतराळ संशोधन केंद्रासाठी लागणारे सुटे भाग तयार करण्याचे काम सोले यांच्या कंपनीमध्ये होत आहे.
शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास श्रीहरीकोटा येथील केंद्रामधून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या इस्रोच्या चांद्रयान-३ चे यशस्व प्रक्षेपण करण्यात आले. या यशस्वी कामगिरीबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे जगभरातून कौतुक करण्यात आले. या जीएसएलव्ही यानाचा एक भाग माधवनगरमध्ये असलेल्या सोले यांच्या डॅझल डायनाकोटस कंपनीमध्ये हे कोटिंग करण्यात आले. आतापर्यच्या तीनही मोहिमा, मंगळ मोहीम यांच्या सुट्या भागांचे कोटिंगही त्यांनीच केले होते. संदीप सोले व त्यांचे सुपुत्र निहार सोले यांनी कामगिरी पार पाडली. ‘चंद्रयान मोहिमेचे सुटे भाग तीन वर्षांपूर्वी कोटिंगसाठी त्यांच्याकडे आले होते. इस्त्रोने काढलेल्या टेंडरद्वारे त्यांना हे काम मिळाले. सांगलीकरांना अभिमान वाटावा अशी कामगिरी त्यांनी केली. यान अवकाशात सोडले जाते, तेव्हा त्यासाठी प्रचंड उर्जा निर्मिती केली जाते. जमिनीवर दाब देऊन यान आकाशात फेकले जाते. या प्रक्रियेत सोले यांची कोटींग केलेली उत्पादने वापरली जातात. आजवर पृथ्वी, अग्नी, त्रिशूल, ब्राह्मोस, आकाश आदी क्षेपणास्त्रांसाठीही त्यांनी कामे केली आहेत. सध्या गगनयानमध्ये वापरण्यात येणार्या उपकरणाची निर्मिती सुरू आहे. यापुर्वी पीएसएलव्ही अंतराळ यानासाठीही याच ठिकाणी हा सुटा भाग तयार करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगीकरणाच्या धोरणानुसार अंतराळ संशोधनामध्येही खासगीकरण सुरू आहे. यानुसार एका खासगी कंपनीसाठीही उपकरण तयार करण्यात आला आहे. यामुळे अंतराळ यानाच्या उत्पादन खर्चातही कपात झाली असल्याचे सोले यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा