MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

एनी टाईम जयंत पाटील चर्चेतच


...


जनप्रवास । दिनेशकुमार ऐतवडे

सांगली : राजकारणात प्रवेश झाल्यापासून माजी मंत्री जयंत पाटील सतत चर्चेतच आहेत. गेल्याच आठवड्यात  मुख्यमंत्री पदावरून ते चर्चेत आले. त्याचे प्रतिसाद अखंड महाराष्ट्रभर उमटवले. त्यानंतर गेल्या दोन दिवसात जयंत पाटील पुन्हा एकदा राज्याच्या पटलावर चर्चेत आले. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या अध्यक्षपदाचे राजीनामा व माघार मेलोड्रामा प्रकरणात चर्चेत जयंत पाटलांना डावलले अशा वावड्या उठल्या. त्यातून त्यांचे कथीत नाराजी नाट्य मिडियाने रंगवले, त्याचा खुलासाही झाला. याच दरम्यान चर्चा आता दुसर्‍या पक्षात प्रवेश करण्यापयर्र्ंत पोहोचली. एकूणच एनकेन प्रकारे जयंत पाटील चर्चेत राहिले. 

शरद पवारांनी आपला अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेताना पत्रकार परिषद बोलाविली होती. त्यावेळी अजून जयंत पाटील आले नव्हते, जयंत पाटील येईपयंर्ंत शरद पवारांनी पत्रकार परिषद थांबवली. या बातमीचे क्लिप आता सर्वत्र फिरत आहेत. 

सन 1984 मध्ये अमेरिकत शिकत असलेल्या जयंत पाटलांना अचानक राजकारणात यावे लागले. राजारामबापुंच्या         अकाली निधनानंतर त्यांना पहिल्यांदाच कारखान्याचे चेअरमनपद मिळाले. तेथून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. 1985 साली विधानसभेच्या निवडणुका लागल्या परंतु जयंत पाटील यांनी गडबड केली नाही. वाळव्याच्या डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांना निवडून आणले. पाच वर्षे मतदार संघाचा पूर्ण अभ्यास केला आणि 1990 च्या विधानसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 1995, 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग सात वेळा ते वाळवा, इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिनिधत्व करीत आहेत. 

10 जून 1999 रोजी राष्ट्रवादीची स्थापना झाली. त्या अगोदर 1990 आणि 1995 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर जयंत पाटील आमदार झाले होते. 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता. सांगली जिल्ह्यातही बरेच मोठे राजकारण झाले होते. 1995 च्या निवडणुकीत सांगली जिल्ह्यात शिराळ्यातून शिवाजीराव नाईक, आटपाडीमधून राजेंद्रअण्णा देशमुख, पलूस कडेगावमधून संपतराव देशमुख,कवठेमहांकाळमधून अजितराव घोरपडे आणि जतमधून मधूकर कांबळे हे पाच आमदार अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यामुळे 1999 मध्ये राष्ट्रवादीमध्ये कोणकोण जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष होते ते सांगलीच्या दादा घराण्यावर आणि वाळव्याच्या जयंत पाटील यांच्यावर. त्यावेळी जयंत पाटील हेही जिल्ह्यावर लक्ष ठेवून होते. दादा घराण्यातील प्रकाशबापू पाटील काँग्रेसमध्येच राहणे पसंत केलेे. तर विष्णुअण्णा पाटील राष्ट्रवादीत जाणे पसंत केले. जयंत पाटील यांनीही राष्ट्रवादीते जाणे पसंत केले. सांगली जिल्ह्यात  त्यावेळी आर. आर. पाटील, मदन पाटील आणि जयंत पाटील हे तीन दिग्गज राष्ट्रवादीत होते. तिघांचेही गट वेगळे होते. त्या परिस्थितीत जयंत पाटील यांनी आपला दबदबा तयार केला. राष्ट्रवादी ज्या ज्या वेळी सत्तेत आली त्या प्रत्येक वेळी जयंत पाटील यांनी पहिल्या फळीतील नेते म्हणून मंत्रीपदाची शपथ घेतली. कायम त्यांना चांगले मंत्रीपद मिळाले. त्यांना जी काही खाती मिळाले त्या प्रत्येक खात्यावर त्यांनी आपले नाव कोरले. राज्याचा सलग 9 वेळा त्यांनी अर्थसंकल्प मांडला. अर्थमंत्री, ग्रामीण विकासमंत्री, गृहमंत्री अशा महत्वाच्या मंत्रीपदीवर ते विराजमान झाले.

राष्ट्रवादीमध्ये राहूनही इतर पक्षात त्यांनी आपली माणसे पेरली आहेत. सांगली जिल्ह्यात तर बीजेपीचे कमळ त्यांच्याच जोरावर उमलले, रूजले हे जगजाहीर आहे. एवढेच नव्हे तर भाजपला भाजप नव्हे तर जेजेपी म्हणून ओळखले जात होते. जिल्ह्याच्या भाजपवर त्यांचे एवढे वर्चस्व होते. जिल्हा परिषद, जिल्हा बँक, महापालिका, जिल्यातील विविध बाजार समित्यांवरही त्यांनी आपली सत्ता काबिज केली. चार कारखाने चालविण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रध्यक्ष बिल क्लिटंन यांनीही त्यांच्या कामाचे कौतुक केले होते. 

दरम्यान, शरद पवारांचा राजीनामा अन् राष्ट्रवादी नव्या अध्यक्षांची निवड यातही ते चर्चेत राहिले. शरद पवारांनी अध्यक्षपद सोडले तर अजितदादा की सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व असा वाद रंगला. यावेळी या वादात सेफ पॉलिटिक्स अन् बॅनरवरील भावी मुख्यमंत्री सत्यात उतरविण्यासाठी ते काँग्रेसचा पत्करतील अशा चर्चा रंगल्या.  यातून काँग्रेसलाही सक्षम नेतृत्व मिळेल, अशा आडाखे काहींने बांधले. पण राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेत जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या माघारीतही मोठा रोल बजावला. एकंदरीत राज्यात असूदे किंवा जिल्ह्यात कोणताही विषय असूदे, जयंत पाटील सध्या चर्चेत आल्याचे दिसत आहे.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी