MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

सीमा भागातील विजयाने सांगली,कोल्हापुरातील भाजपला इशारा



जनप्रवास । दिनेशकुमार ऐतवडे

कर्नाटकमध्ये एक्झिटपोलच्या  अंदाजानुसार काँग्रेसने एकमुखी सत्ता बळकावली आहे. 224 पैकी  130 जागावर काँग्रेसने बाजी मारत एकहाती सत्ता काबीज केली आहे. काँग्रेसच्या या विजयाने सांगली, कोल्हापूर, सोलापूर या सीमोलगतच्या जिल्ह्यामध्ये भाजपला जबर धक्का बसला असून, काँग्रेसला हत्तीचे बळ आले आहे.

सांगली, कोल्हापूर, सोलापूर  आणि बेळगाव ही लगतची जिल्हे आहेत. बेळगाव जरी कर्नाटकात असले तरी सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील मोठा व्यापार या जिल्ह्यात दररोज होत असतो. बेळगाव जिल्हा महाराष्ट्रात यावा यासाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून पहिल्यापासूनच जोरदार लढा सुरू आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव या तिन्ही जिल्ह्याचे एक वेगळेच नाते आहे. बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघापैकी सुमारे 11 जागांवर काँग्रेसचे बाजी मारली आहे. भाजपच्या अनेक मात्तबरांना येथे पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसच्या या यशाने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपला सूचक इशारा मिळाला आहे. तर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. 

बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघात सांगली जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेते प्रचारासाठी गेले होते. यामध्ये शेखर इनामदार, आमदार गोपीचंद पडळकर, तमण्णगौंडा रवी पाटील, सांगलीचे सुरेश पाटील यांचा समावेश होता. निपाणी मतदार संघात राष्ट्रवादीने उमेदवार केल्याने या मतदार संघात आमदार जयंत पाटील यांनी आपली फौजच तिथे उतरवली होती. निपाणीमध्ये अगदी थोडक्या मताने  राष्ट्रवादीचा पराभव झाला. 

कागवाड, अथणी, हुक्केरी, सदलगा, निपाणी, बेळगाव, कुडची हे मतदार संघ सांगली, कोल्हापूरच्या संलग्न असल्यासारखी आहेत. तेथील वातावरण समानच आहे. सांगली, कोल्हापूरच्या अनेक नेत्यांनी येथे मुक्काम ठोकला होता. भाजपने येथे जोरदार तयारी केली होती. अमित शहाही या भागात लक्ष ठेवून होते. कारण अथणीतील लक्ष्मण सवदी यांनी भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा पराभव करणे हेच भाजपचे टारगेट होते. सांगलील अनेक भाजप नेते तेथे तळ ठोकून होतेे. परंतु लक्ष्मण सवदी सर्वांना पुरून उरले. 

अथणी मतदार संघातही श्र्रीमंत पाटील यांचे सांगलीशी जवळचे संबंध आहेत. त्यांनी गेल्या निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या विजयासाठीही भाजपने रान उठविले होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे राजू कागे होते. काँग्रेसचे अनेक नेते कागेंच्या विजयासाठी धडपडत होते. 

बेळगावमध्ये काँग्रेसची मुसंडी 

बेळगाव जिल्ह्यामध्ये 18 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये तब्बल 11 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे, तर सात जागांवर भाजपला समाधान मानावे लागले आहे. या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुसरीकडे काँग्रेसने तब्बल अकरा जागा जिंकत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. बेळगावसह सीमाभागात महाराष्ट्रातील नेत्यांची 

मांदियाळी उतरली होती. 

सांगली कोल्हापूरला सूचक इशारा

सीमावर्ती भागात काँग्रेसला मिळालेलं यश हे नक्कीच सांगली, कोल्हापुरातील राजकीय चिंता वाढवणारे आहे यात काही शंका नाही. सीमावर्ती भागाला कोल्हापूर, सांगली, सोलापूर ते तीन जिल्हे जोडले गेले आहेत. त्यामुळे या निकालाचा परिणाम या जिल्ह्यामध्ये होणारच नाही असं म्हणणं निश्चितच राजकीय धाडसाचे ठरेल. 

सांगली लोकसभा मतदार संघात अगोदरच सर्व काही आलबेल आहे, असे नाही. संजयकाकांच्या विरोधात जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. काँग्रेसने जर जोर लावला तर भाजपची ही सीट धोक्यात येवू शकते. कोल्हापुरात शिवसेनेच्या संजय मंडलीक यांनी धनंजय महाडिक यांचा पराभव केला होता. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात प्रकाश आवाडे हे एकमेव आमदार भाजपचे आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांमध्ये धडकी भरली आहे. 

बेळगाव ग्रामीण, यमकनमर्डी, चिकोडी, कागवाड कुडची, कारवार या सहा विधानसभा सीमावर्ती मतदारसंघात काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव करत विजय खेचून आणला आहे. त्यामुळे या निकालाचे पडसाद सांगली, कोल्हापूरमध्ये नक्की उमटणार आहेत. महाराष्ट्रातील सत्ताधारी मंडळी सीमावर्ती भागामध्ये प्रचार करण्यात आघाडीवर होती. 

महाराष्ट्र एकीकरण समितीने या महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याने सीमाभागात प्रचारासाठी येऊ नये, असं आवाहन सुद्धा करण्यात आलं होतं. मात्र, शिवसेना ठाकरे गट वगळता सर्वांकडून प्रचार करण्यात आला. बेळगाव जिल्ह्यातील सात मतदारसंघांमध्ये जरी भाजपचा विजय झाला असला, तरी तर त्या ठिकाणी विरोधकांना पडलेली मते ही सुद्धा निश्चित

सांगली, कोल्हापूरकरांना विचार करायला लावणारी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज संस्थां निवडणुका, लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत या निकालाचा नक्की राहील असे बोलले जात आहे.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी